Udayanraje Bhosale: “राजकारणी मुग गिळून गप्प बसतात, विचारांचा कडेलोट…”, उदयनराजेंचं शिवरायांना भावनिक पत्र!

Chhatrapati Shivaji Maharaj: काही दिवसांपासून राज्यातील राजकारण्यांकडून आणि महत्त्वाच्या पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून बेताल वक्तव्य (Maharastra Politics) केली जात आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. अशातच वादग्रस्त वक्तव्यावर (Controversial statements) आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांनी चौफेर टीका केली होती. त्यावर आता उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निर्धार शिवसन्मानाचा मेळावा घेतला. त्यानंतर आता उदयनराजे यांनी एक भावनिक पत्र (Udayanraj’s emotional letter to Chhatrapati Shivaji Maharaj) सोशल मीडियावर शेअर केलंय.

उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र (emotional letter) लिहिलं. त्यात उदयनराजेंनी आपल्या व्यथा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. फेसबूकवर पोस्ट (Udayanraje Bhosale) केलेल्या पत्रात उदयनराजे म्हणतात, “महाराज… आज खुप गरज वाटते आपल्याशी बोलायची. आम्ही आपल्याशी अंश-वंश म्टशन नाही तर आपला एक सर्वसामान्य मावळा म्हणून एक शिवभक्त म्हणून बोलतोय.”

आपण रयतेसाठी इतकं मोठं स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य म्हणजेच आपला महाराष्ट्र आपला हिंदुस्थान, आपण घालून दिलेल्या आदर्शांवर चालवला जात होता किंवा तसा आभास तरी होत होता. अलिकडच्या काळात ते बंद झालंय. विचारांचा कडेलोट होण्याची परिस्थिती उद्भवतीये की काय अशी रास्त भीती निर्माण झाली आहे. अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांना घेऊन निर्माण केलेल्या स्वराज्याची आणखी शकले होणार की काय असा विचार येऊन मन विषण्ण झालंय, असं उदयनराजे म्हणतात.

हेही वाचा :  नवर्‍याची फसवणूक करण्याआधी सत्य कळले असते तर माझी इतकी वाईट स्थिती झाली नसती

आणखी वाचा -‘चला कर्नाटक नव्याने पाहूया’ कर्नाटक पर्यटन विभागाकडून चक्क नागपुरात पोस्टरबाजी

आता कुठल्या गटाचा असो किंवा कुठल्या जाती-पातीचा असो. जो कोणी आपला मावळा आहे तो आपल्यासाठी एकत्र येणारच. आणि या मावळ्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला शिरसावंद्य असेल. पण इथून पुढं आपल्या बद्दल एक वाक्य काय, एक शब्द जरी कोणी चुकीचा बोलायची हिंमत केली तर त्याचा आम्ही मुलाहिजा देवणार नाही.

राजकारणात सतत आपल्या नावाचा वापर केला जातोय, आपल्या नावाने घोषणा दिल्या जातात, पण आपल्याबद्दल अपशब्द बोलल्यावर राजकारणी मुग गिळून गप्प बसतात तेव्हा वाईट वाटतं. उठसुठ आपली तुलना कोणाशीदी करणाऱ्यांना इतिहासाचा घडा शिकवावाच लागेल, असा इशारा देखील उदयनराजे यांनी यावेळी दिला आहे.

वाचा पुर्ण पत्र –

दरम्यान, आपल्या माणसावर वार करायचा नसतो पण चुकत असेल, शिवद्रोह होत असेल तर आता अश्यांना कठोर शासन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे आणि महाराज, आम्ही आपल्याला वचन देतो की, कोणत्याही महापुरुषांचा कोणत्याही प्रकारचा अवमान आता सहन केला जाणार नाही, असंही उदयनराजे पत्रात (Udayanraje Bhosale latter) म्हणतात.

हेही वाचा :  Sheena Bora Murder Case : मोठी बातमी! शीना बोरा अजूनही हयात?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …