वर्कआउटनंतर स्टीम बाथमुळे बॉडीबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू, कारण वाचून बसेल धक्का!

Mr Tamil Nadu Dies : ‘मिस्टर तामिळनाडू’चा (Mr Tamil Nadu) किताब पटकावणारा बॉडी बिल्डर योगेशच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. योगेशच्या आकस्मित मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय बॉडी बिल्डर योगेश यांचा रविवारी जिममध्ये (Gym) हृदयविकाराच्या झटक्याने (Herat Attack) मृत्यू झाला. प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू आणि नऊ वेळा इव्हेंट चॅम्पियन योगेश याचा आकस्मिक मृत्यूने फिटनेसमधील जगताला मोठा धक्का बसला आहे. योगेश यांनी गेल्या वर्षीच मिस्टर तामिळनाडूचा किताब पटकावला होता.

चेन्नई कोरट्टूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश (41) हे महात्मा गांधी स्ट्रीट, ज्ञानमूर्ती नगर, अंबत्तूर मेनमपेडू एक्स्टेंशन येथे राहणारा होते. शरीरसौष्ठवपटू म्हणून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि अनेक पदके जिंकली होती. योगेशने 2021 मध्ये 9 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये भाग घेतला होता. ‘मिस्टर तामिळनाडू’चा किताबही त्यांनी पटकावला होता.

रविवारी तासाभराच्या व्यायामानंतर योगेश जिममधून बाहेर आले आणि त्यांनी आपल्या मित्राला सांगितले की मला थकवा जाणवत आहे आणि स्टीम बाथ करून आराम करायचा आहे. त्यानंतर योगेश स्टीम बाथसाठी निघून गेले. अर्धा तास उलटूनही बाथरूममधून बाहेर न आल्याने मित्राने काळजीने बाथरूमचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. आत पाहिले असता योगेश जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. योगेशला ताबडतोब जवळच्या सरकारी किलपॉक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये  नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा :  iPhone Fake Check : बाजारात आला फेक आयफोन, तुमच्या हातातील आयफोन बोगस तर नाही? असं करा चेक...

2021 मध्ये त्यांनी वैष्णवी (28) सोबत लग्न केले आणि त्यांना 2 वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर त्यांनी बॉडी बिल्डिंगमधून ब्रेक घेतला आणि विविध जिममध्ये ट्रेनर म्हणून काम केले. ते गेल्या काही वर्षांपासून कोरट्टूर बस स्थानकाजवळील जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होते. मात्र रविवारी त्यांनी जिममध्ये आलेल्या मुलांना ट्रेनिंग देऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी संध्याकाळी त्यांनी स्टीम बाथ घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

कशामुळे झाला मृत्यू?

पोलिसांच्या प्राथमिक तपासात योगेशचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी त्याचा वैद्यकीय माहिती तपासली जात आहे. योगेशच्या मृत्यूच्या संभाव्य कारणांबाबत हृदयरोगतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला आधीपासून हृदयरोगाची समस्या होती आणि जास्त व्यायाम केल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. डॉक्टरांच्या मते दुसरी शक्यता अशी आहे की त्याला वर्कआउट आणि स्टीम बाथमुळे डिहायड्रेशन झाले असावे ज्यामुळे त्याचे इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडले असावे. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, जे प्राणघातक ठरू शकते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …