Israel-Palestine War: इस्रायलसमोर बेचिराख होणार हमास; विनाशकारी फॉस्फरस बॉम्ब असतो कसा?

Israel-Palestine conflict : पॅलेस्टीन आणि इस्त्रायलमध्ये (Israel vs Palestine) सुरु असलेलं युद्ध अधिक विध्वंसक होतंय. दहशतवादी हमास संघटनेला इतर दहशतवादी संघटनांकडून युद्धासाठी रसद पुरवठा होत असल्याचा आरोप एकीकडे होतोय. तर दुसरीकडे पॅलेस्टिननं इस्त्रायलवर गंभीर आरोप केलेत. इस्त्रायल पॅलेस्टिनच्या रहिवासी भागात फॉस्फरस बॉम्ब (Phosphorus Bomb) डागत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या गंभीर आरोपांनंतर चर्चा होतेय ती फॉस्फरस बॉम्बची…

फॉस्फरस बॉम्ब घातक का ?

फॉस्फरस बॉम्ब हवेतील ऑक्सिजन शोषून घेतो. फॉस्फरस बॉम्बची आग पाण्यानं सहज विझत नाही. बॉम्ब पडलेल्या जागी लोकांचा गुदमरुन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संपर्कात येणाऱ्या लोकांची हाडं देखील वितळतात. बहु अवयव निकामी करणारा विनाशकारी बॉम्ब म्हणून फॉस्फरस बॉम्बकडे पाहिलं जातं.

पांढरा फॉस्फरस बॉम्ब 1300 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाळू शकतो, म्हणून तो आगीपेक्षा जास्त जळतो. यामुळेच त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची हाडंही वितळतात. त्याचवेळी, जे लोक त्याच्या संपर्कात आल्यानंतर जिवंत राहतात, ते गंभीर संसर्गजन्य रोगांना बळी पडतात. पांढऱ्या फॉस्फरसच्या संपर्कात आलेली व्यक्ती अकाली वृद्ध होते. बॉम्ब पडलेल्या परिसरातील व्यक्ती संपर्कात आल्यानं हृदय, यकृत आणि मूत्रपिंड निकामी होते.

हेही वाचा :  'इंडिया'ला निरोप देत 'या' पत्रकाराने उचललं हमासविरोधात शस्त्र, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

दुसऱ्या महायुद्धात पांढऱ्या फॉस्फरस बॉम्बचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता.अमेरिकन सैन्यानं जर्मनीवर असे असंख्य बॉम्ब त्यावेळी डागल्याचा आरोप आहे. अमेरिकेनं मुद्दाम सैन्यतळांव्यतिरिक्त रहिवाशी भागांवर असे बॉम्ब डागल्याचे आरोप अमेरिकेवर करण्यात आले. बॉम्बच्या विनाशकारी परिणामांनंतर 1980 साली जिनिव्हा कन्व्हेंशनमध्ये बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्यात आली होत. त्यावेळी 115 देशांनी बॉम्बच्या कमीतकमी वापराबाबत करारावर स्वाक्षरी केली.

आणखी वाचा – खरी ठरतीये बाबा वेंगाची मुस्लिम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी? इस्त्रायल-हमास संघर्षामुळे पुन्हा चर्चा

दरम्यान, जिनिव्हात करार करण्यात आल्यानंतरही अमेरिका, इस्त्रायलसारखे देश या बॉम्बचा वापर करत राहीले. त्यामुळे आता पॅलेस्टीननं थेट इस्त्रायलवर रासायनिक हल्ल्याचा वापर केल्याचा आरोप केलाय. आगामी काळात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहेच. मात्र अशा रासायनिक हल्ल्यांमुळे केवळ इस्त्रायल पॅलेस्टिन नव्हे तर जगच महायुद्धाकडे खेचलं जाण्याची भीती आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …