हळदीचा कार्यक्रम रंगात असतानाच बिग बॉस फेम दादुसने थेट बंदुक काढली अन्…; VIDEO व्हायरल

Dadus Firig Viral Video: आगरी, कोळी गीतकार आणि बिग बॉस फेम दादूस उर्फ संतोष चौधरी (Dadus alias Santosh Chaudhary) सध्या चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे संतोष चौधरी यांनी हळदीच्या (Haldi) कार्यक्रमात हवेत गोळीबार केला आहे. शिवडी (Sewri) येथे हा हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यानंतर पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. 

कोळी गीतांचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे गायक संतोष चौधरी उर्फ दादूस हे नाव बिग बॉसनंतर आता प्रत्येकाच्याच ओळखीचं झालं आहे. त्यांची प्रसिद्धी लक्षात घेता अनेक कार्यक्रमांना त्यांना आमंत्रित केलं जातं. त्यातही हळदीच्या कार्यक्रमात त्यांच्या नावाला पसंती असते. नुकतंच संतोष चौधरी वादक सचिन भांगरे याच्या हळदी समारंभात सहभागी झाले होते. यावेळीही त्यांनी आपल्या गाण्यांनी सगळ्यांना थिरकायला भाग पाडलं होतं. पण यावेळी त्यांनी केलेल्या एका कृत्यामुळे ते चर्चेत असून अडचण वाढण्याची शक्यता आहे. 

नेमकं काय झालं? 

वादक सचिन भांगरे याच्या हळदीनिमित्त संतोष चौधरी यांना गाण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. शिवडीमधील चाळीत हा हळदीचा कार्यक्रम होता. हळदीसाठी ऑर्केस्टाचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी स्टेजवर संतोष चौधरी यांनी आपल्या कोळीगीतांनी माहोल तयार करत सर्वांना आपल्या तालावर नाचवलं. 

हळद ऐन रंगात आलेली असतानाच सचिन भंगारेही स्टेजवर येऊन डान्स करु लागला होता. यावेळी काही तरुणीही एकदम जोशात नाचत होत्या. पण त्याचवेळी अचानक दादुसने खिशातून बंदूक काढली आणि हवेत गोळीबार केला. यावेळी मंचावरील एक तरुणी आवाज ऐकून मागे पळत जाते. तर इतरजण त्यानंतर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

आर के मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलीस याप्रकरणी संतोष चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. पोलीस संतोष चौधरी यांनी पोलीस ठाण्यात बोलावू शकतात. जर यामध्ये काही गैर आढळलं तर त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. 

हेही वाचा :  जिम जॉईन करण्याआधी Health Checkup केल्यामुळे टळू शकतो Heart Attack चा धोका

पोलिसांनी तपास सुरु केला असून सचिन भांगरे यांच्या घरी गेले होते. पण कुटुंबीय घरी नसल्याने ते मागे परतले. पोलीस सचिन भांगरेच्या कुटुंबाकडे चौकशी करणार आहे. दरम्यान पोलिसांनी फोनवरुन संपर्क साधला असता सचिन भांगरेच्या कुटुंबाने ही बंदक खेळण्यातील असल्याचा दावा केला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर… अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज

Ajit Pawar vs Anjali Damania:  पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री …

पुणे अपघात प्रकरणात पोराला वाचवण्यासाठी बापाचे प्रताप, 2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स

Pune Porsche Accident : 19 मे 2024… पुण्याच्या कल्याणीनगर भागात पोर्श कार दोघांना चिरडते. या …