रहस्यमयी जगातील 460 कोटी वर्ष जुनी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू; पण पृथ्वीवर ही सापडली कशी?

Meteoroid : या पृथ्वीतलावर सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान धातू आणि खनिजे सापडतात. मात्र, संशोधना दरम्यान संशोधकांना असा मौल्यवान दगड सापडला जो 460 कोटी वर्ष जुना असल्याचा देवा केला जात आहे. हा दगडाचा तुकडा सोन्यापेक्षा जास् त मौल्यवान आहे, विशेष म्हणजे हा दगड पृथ्वीवरुन नसून हा अवकाशून पडला आहे. यामुळे हा दगड दुसऱ्याच एका रहस्यमयी जगातील असल्याचा संशोधकांचा दावा आहे. 

2015 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मेरीबरो रिजनल पार्कमध्ये हा रहस्यमयी दगड सापडला आहे. डेव्हिड होल या संशोधकाला हा दगड सापडला आहे. डेव्हिड होल हे मेटल डिटेक्टरसह पुरातन वस्तू आणि खनिजे शोधत होते. तेव्हा त्यांना एक लाल रंगाचा दगड सापडला. या दगडाचे आवरण लाल रंगाचे होते. मात्र, या दगडाच्या आतमध्ये पिवळ्या रंगाची चमक दिसत होती. डेव्हिड यांनी हा दगड उचलला असता तो वजनाला अतिशय जड होता. डेव्हिड यांनी हा दगड स्वच्छ धुतला असता हा दगड  सोन्यासारखा चमकू लागला. 

या दगडाचे नेमके रहस्य काय?

१९व्या शतकात मेरीबरोमध्ये सोन्याच्या अनेक मोठ्या खाणी होत्या. अजूनही येथे अनेकदा सोन्याचे छोटे मोठे दगड सापडतात. यावेळी डेव्हिड यांना हा दगड सापडला आहे. डेव्हिड यांनी हा दगड  कापण्यासाठी, तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अथक प्रयत्न करुनही हा दगड फुटला नाही. हा दगड म्हणजे सोनं आहे हे तपासण्यासाठी डेव्हिड यांनी दगडाला ऍसिडने जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा दगड म्हणजे सोने अजिबात नव्हते. अनेक वर्ष डेव्हिड यांनी हा दगड फोडण्याचा प्रयत्न केला. दगड काही फुटला नाही. अखेरीस डेव्हिड यांनी हा दगड मेलबर्न संग्रहालयात नेला. येथे या दगडाची तपासणी करण्यात आली. यावेळी  हा दगड म्हणेज दुर्मिळ उल्का असल्याचे उघडकीस आले. ही उल्का दुसऱ्या जगातून ऑस्ट्रेलियावर पडली. हा खूपच मौल्यवान दगड आहे. याची किंमत सांगता येत नाही. कारण त्यातील धातू पृथ्वीवर आढळत नाहीत. उपलब्ध नसलेल्या धातूंचे मूल्य कसे शोधायचे? असे  मेलबर्न म्युझियमचे भूगर्भशास्त्रज्ञ डरमोट हेन्री यांनी सांगितले. 

हेही वाचा :  KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी, थेट मुलाखतीतून होणार निवड

460 कोटी वर्ष जुन्या दगड 

460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक उल्का पडली होती. या दगडाचे नमुने हे  460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पडलेल्या या उल्काशी मिळते जुळते आहेत. यामुळे हा दगड 460 कोटी वर्ष जुना असल्याचा दावा केला जात आहे. या दगडाचे वजन 17 किलो आहे.  हा कापण्यासाठी डायमंड सॉची मदत घ्यावी लागली. या दगडात मोठ्या प्रमाणात लोह आहे. हा H5 ऑर्डिनरी कॉन्ड्रिट आहे. हा दगड कापल्यावर आतमध्ये छोटे स्फटिक दिसले, जे वेगवेगळ्या खनिजांचे होते. त्यांना कॉन्डरुल्स म्हणतात. उल्का अवकाशाविषयी अचूक माहिती देतात. यामध्ये ताऱ्यांचे चमकणारे कण असतात. सूर्यमालेत कॉन्ड्राईट दगडांची अनेक वर्तुळे आहेत. मंगळ आणि गुरू या ग्रहांमध्ये फिरणाऱ्या उल्कापिंडांच्या समूहातून हा दगड पृथ्वीवर पडला असावा असा संशोधकांचा अंदाज आहे. 2003 मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या याच भागात सर्वात मोठी उल्का सापडली होती. याचे वजन 55 किलो होते. व्हिक्टोरिया परिसरात आतापर्यंत 17 उल्का सापडल्या आहेत. या उल्कापिंडाचा अभ्यास जर्नल  प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ व्हिक्टोरियामध्ये प्रकाशित झाला आहे.
    
  

 

हेही वाचा :  लाखोंचे जॅकेट आणि पर्स घेऊन, Kareena Kapoor ची लंडन स्वारी, पर्सची किंमत ऐकून म्हणाल यात तर एक घर येईल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …