Viral Video : खड्ड्यात पडलेल्या पिल्लासाठी हत्तीणीचा जीव कासावीस, 3 दिवस 2 रात्र ती…आईचा श्वास थांबला अन् मग…

Elephant Viral Video : आई ही देवाचं रुप मानलं जातं. असं म्हणतात देव प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकतं नाही, म्हणून त्याने आई बनवली आहे. आपल्या पोटच्या लेकाला संकटात पाहून प्रत्येक आईचा जीव हा कासावीस होतो. अगदी माणसांपासून प्राण्यांपर्यंत आई आपल्या पिल्ला संटकात पाहू आपला जीव धोक्यात घालते. असाच एक हत्ती आणि बेबी हत्तीचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

हो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. ज्यामध्ये हत्तीचं एक पिल्लू खड्ड्यात पडत आणि त्याला वाचविण्यासाठी स्थानिकांचा प्रयत्न सुरु आहे. हत्तीचं बाळ भीतीने जोरजोरात ओरडताना दिसतं आहे. आपल्या लेकाची किंकाळी ऐकून मादी हत्ती पिल्लाकडे धाव घेते. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिखलात पडलेल्या पिल्ला पाहून हत्ती खड्ड्यात शिरण्याचा प्रयत्न करते. जवळपास तीन दिवस आणि दोन रात्री ती त्या अवस्थेत आपल्या पिल्लाला दूध पाजते. 

खड्ड्याची जागा कमी असल्याने अशा परिस्थितीत हत्तीचा श्वास गुदमरतो आणि तिची प्रकृती बिघते. त्यानंतर स्थानिक क्रेनच्या साहाय्याने हत्तीची सुटका करतात. मात्र उशीर झालेला असतो, हत्तीचा श्वास थांबलेला असतो. काही लोक हत्तीच्या हृदयाला पंप करतात. दरम्यान हत्तीच्या बाळालाही खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश मिळतो. (Viral Video mother elephant risking her life to save her baby elephant Trending Video on social media trends)

हेही वाचा :  ही चोरी बघून तुम्ही 'धूम'मधले स्टंट विसराल, चालत्या ट्रकमधून काही सेकंदात उतरवलं सामान

असं वाटलं सगळं संपलं…हत्ती पिल्लाने आईला गमावलं असंच सगळ्यांना वाटलं. तो पिल्लू आईच्याजवळ घुटमळत होता. अन् हे काय चमत्कार म्हणायलाच हवं. हत्ती पुन्हा श्वास घायला लागतो. हा भावूक व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

आतापर्यंत हा व्हिडीओ 1.2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर @TansuYegen अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …