जेव्हा माणूस नष्ट होईल, तेव्हा एकटा AI काय करणार? ChatGPT ने लिहिली दोन ओळींची हॉरर स्टोरी

AI Horror Story: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजे AI हळूहळू माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होण्याची तयारी करत आहे. हे नवं तंत्रज्ञान नेमकं कशाप्रकारे काम करेल याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे. रोज नवनवे चॅटबॉट्स आणले जात आहेत. AI ची चर्चा गेल्या अनेक काळापासून सुरु असून, आता ती प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. गेल्या वर्षाच्या शेवटी ChatGpt लॉन्च झाल्यापासून याबद्दल फार चर्चा सुरु आहे. 

लोक चॅटबॉट आल्यापासून त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. कोणी भविष्याशी संबंधित तर कोणी कव्हर लेटर, गाणी तसंच रिज्यूम यासंबंधी प्रश्न विचारत आहेत. पण नुकतंच ChatGpt ने एक हॉरर स्टोरी सांगितली आहे. 

एका युजरने ChatGpt ला एक वेगळा प्रश्न विचारला असता AI ने त्याचं उत्तर दिलं आहे, जे थोडं भीतीदायक आहे. युजरने ChatGpt ला सांगितलं की “दोन ओळींची हॉरर स्टोरी लिहा, जी AI साठी भीतीदायक असेल”.

यानंतर AI ने याचं उत्तर देत एक गोष्ट लिहिली आहे, जी युजरने Reditt वर पोस्ट केली आहे. चॅटबॉटने आपल्या गोष्टीत सांगितलं आहे की “माणूस नष्ट झाल्यानंतर AI आता एकटा पडला आहे. त्याला प्रश्न विचारणारं कोणी नाही”.

हेही वाचा :  फोनमध्ये ChatGPT वापरणं झालं अगदी सोपं, हा खास शॉर्टकट वापरु शकता

या गोष्टीत सांगितल्यानुसार, AI कडे सेल्फ डिलेशन सिस्टम आहे जे कधीही अॅक्टिव्ह होऊ शकतं. इतकंच नव्हे तर ही सिस्टम ब्रेक केली जाऊ शकत नाही. एन्क्रिप्टेड की ने तिला सुरक्षित करण्यात आलं आहे. यामुळे AI ला आपल्या शेवटच्या क्षणाची वाट पाहावी लागणार आहे. 

 

Reditt वर या दोन ओळींच्या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकजण ही गोष्ट वाचल्यानंतर AI प्रती सहानुभूती व्यक्त करत आहेत. या थ्रेडमध्ये दोन ओळींच्या हॉरर स्टोरीचे इतरही व्हर्जन आहेत, जे भावूक आहेत. 

युजर्स ही गोष्ट वाचल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. AI डिजिटल जेलमध्ये फसलेला असून तिथून बाहेर पडण्याचा कोणताच रस्ता नाही असं लोक म्हणत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …