फोनमध्ये ChatGPT वापरणं झालं अगदी सोपं, हा खास शॉर्टकट वापरु शकता

नवी दिल्ली:OpenAI ChatGPT : प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी OpenAI ने चॅट जीपीटी (Chatgpt) हे AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लॉन्च केलं आणि तेव्हापासून जगभरातील नेटकऱ्यांची याला तुफान पसंती मिळू लागली. आता या जबरदस्त टेक्नोलॉजीचा फायदा भविष्यात सर्वत्रच होणार असून गुगल स्वत:ही Google Bard च्या रुपात स्वत:चं AI सुरु करु शकते. दरम्यान आता हेच भविष्य असल्याने प्रत्येकाला याचा वापर कसा करायचं हे कळायला हवं, तसंच आपण सर्वाधिक वापरणारं उपकरणं म्हणजे आपला स्मार्टफोन तर त्यात याचा वापर कसा कराल हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.सध्यातरी आम्ही देत असलेल्या शॉर्टकटमुळे ॲपल डिव्हाईसेसवर ChatGPT वापरता येऊ शकतं. तर ते कसं हे देखील आम्ही सांगत आहोत. सद्यस्थितीला ChatGPT वापरण्याकरता कोणतंही डेडिकेटेड ॲप नाही आहे. पण ॲपलच्या आयफोनवर किंवा इतर IOS डिव्हाईसेसवर ChatGPT वापरता येऊ शकतं. यासाठी एक खास शॉर्टकट आहे. तर नव्या रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार हा AI पावर्ड चॅटबॉट अगदी सोप्या पद्दतीने ॲपल डिव्हाईसेसवर वापरता येईल. सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेक एक्सपर्ट Federico Viticci याने ॲपल डिव्हाईसेससाठी एक खास असा ChatGPT चा शॉर्टकट तयार केला आहे. ज्यामुळे iOS, MacOS, iPadOS आणि WatchOS अशा प्लॅटफॉर्मवर ChatGPT सहज वापरता येईल.

कसा तयार कराल ChatGPT चा शॉर्टकट?

सर्वात आधी तुम्हाला OpenAI च्या साईटवर अकाउंट तयार करावं लागेल.
त्यानंतर अकाउट सेटिंगमसमध्ये जाऊन ChatGPT API Key मध्ये जाऊन Crate a new secret key या सेक्शनमध्ये जावं लागणार आहे.
त्यानंतर icloud.com/shortcuts/882c9a2870c0431098905445a5f1511e या लिंकवर जावं लागेल. त्यानंतर S-GPT हा शॉर्टकट डाऊनलोड करावा लागेल आणि त्याचं सेटअप करावं लागे.
त्यानंतर स्क्रिनवर असणाऱ्या सूचनाचं पालन करुन API Key पेस्ट करावी लागले. जी OpenAI अकाउंटच्या सेटिंग्जमध्ये मिळेल.
त्यानंतर S-GPT इनकोडर डाउनलोड केल्यावर तु्म्ही या शॉर्टकटच्या मदतीनं लगेचच ChatGPT चा वापर करु शकता. Siri या वॉईस असिस्टंटनेही तुम्ही हा शॉर्टकट अॅक्सेस करु शकता.

हेही वाचा :  Booster Dose घेणे सुरक्षित आहे की नाही? रिसर्चचा दावा, आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत सत्य समोर

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …