कसलं भारी…! 111 वर्षांपूर्वीच्या Titanic मधील मेन्यूकार्ड समोर, काही पदार्थांची नावंही उच्चारताना बोबडी वळतेय

Titanic : ‘टायटॅनिक’ (Titanic Movie) हा हॉलिवूड चित्रपट अनेकांनीच पाहिला असेल. काहींनी त्या चित्रपटांबद्दल ऐकलं असेल. हो, पण या चित्रपटाहूनही या आलिशान आणि अवाढव्य जहाजाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न जवळपास सर्वांनीच केला असेल. इतिहासातील एका भीषण अपघातामुळं (Titanic Accident) लुप्त झालेल्या या जहाजाला जलसमाधी मिळाली आणि या जाहाजाशी संबंधीत अनेक गुपितं समुद्राच्याच पाण्यात कुठेकरी हरवली. असं असलं तरीही Titanic आणि त्याबाबतच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरं आज, तब्बल 111 वर्षांनंतरही मिळतच आहेत. 

Titanic मधून कोणी प्रवास केला, या जहाजातलं कोणीच हयात राहिलं नाही का? हे जहात आतून कसं होते असे एक ना अनेक प्रश्न आजवर उपस्थित झाले. संशोकांनीही त्या धर्तीवर शोधमोहिमा घेतल्या आणि शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्नही केला. त्यातच आता या आश्चर्यकारक आणि तितक्याच देखण्या जहाजाबाबतची रंजक माहिती समोर आली आहे. रंजक म्हणण्यापेक्षा चवीष्ट माहिती म्हटलं तर हरकत नाही. कारण, ही माहिती आहे जहाजावरच्या मेजवानीबाबतची. 

15 एप्रिल 1912 ला या जहाजाला उत्तर अटलांटिक महासागरात येथे जलसमाधी मिळाली. त्या दुर्दैवी घटनेला यंदाच्या वर्षी 111 वर्षे पूर्ण झाली. याच दिवसाला आठवत tasteatlas या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक अतिशय खास माहिती प्रसिद्ध करण्यात आली. ही माहिती होती टायटॅनिकवर दिल्या गेलेल्या खाद्यपदार्थांबाबतची. 

हेही वाचा :  'ठरलंय तेवढं बोलायचं अन्...' CM शिंदेंनी जरांगेंसमोर पुन्हा तेच शब्द उच्चारले! पिकला जोरदार हशा

जहाजाइतकाच Food Menu सुद्धा देखणा… 

‘टेस्ट अॅटलास’च्या माहितीनुसार आणि शेअर करण्यात आलेल्या फोटोंनुसार चिकन करी, बेक्ड फिश, स्प्रिंग लॅम्ब, रोस्ट टर्की असे पदार्थ या जहाजाच्या Common Menu चा भाग होते. तर, इथं गोडाचा पदार्थ म्हणून पुडींग देण्यात आलं होतं. ज्या रात्री या जहाजाची टक्कर होऊन त्याला जलसमाधी मिळाली तेव्हा काही तासांपूर्वीच पाहुण्यांना रात्रीच्या जेवणात प्लम पुडींग म्हणजेच ख्रिसमस पुडींग हा गोडाचा पदार्थ देण्यात आला होता. 

तिन्ही वर्गांसाठी खास मेन्यू… 

टायटॅनिकमध्ये ब्रेकफासट, दुपारचं जेवण (Lunch) आणि रात्रीचं जेवण (Dinner) अशा पदार्थांची रेलचेल होती. यामध्ये प्रथम श्रेणीनं (First Class) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी egg a l’argenteuil, chicken a la maryland, कॉर्न्ड बीफ- वेजिटेबल डम्पलिंग्स, ग्रिल्ड मटन चॉप्स, सॅमन मेयोनिज, पॉटेड श्रिंप्स आणि बहुविध पद्धतींच्या चीजसह अनेक पदार्थांची मेजवानी होती. 

द्वितीय श्रेणी (Second Class) प्रवाशांसाठी रोल्ड ओट्स, फ्रेश फिश, अमेरिकन ड्राय हॅश, ग्रिल्ड सॉसेज, फ्राईड पोटॅटो या आणि अशा पदार्थांची गर्दी होती. तर, तृतीत श्रेणी (Third Class) प्रवाशांसाठी ओटमिल पॉरिज आणि दूध, जॅकेट पोटॅटो, हॅम, फ्रेश ब्रेड, ब्राऊन ग्रेव्ही आणि अशा कित्येक पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. 

जहाजावरील मेजवानीत असणारे अनेक पदार्थ आपल्यापैकी कित्येकांनी पहिल्यांदाच ऐकले असतील किंवा काहींना त्याची नावंही उच्चारणं कठीण जाईल. हो पण, नावं वाचून डोळ्यांसमोर टायटॅनिकचा तो साज, सजलेलं जेवणाचं भलंमोठं टेबल आणि त्या काळातले प्रवासी असं चित्र नक्कीच उभं राहील! 

हेही वाचा :  धर्म आणि वयाची बंधनं झुगारून केले होते मराठमोळ्या उर्मिलाने लग्न, करतेय सुखाचा संसार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …