उंदराची हत्या करणे पडले महागात… पोलिसांनी दाखल केले 30 पानांचे आरोपपत्र

Shocking News : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) उंदराची हत्या केल्याचे प्रकरण (Rat Murder Case) सध्या देशभरात गाजत आहे. उंदराला मारणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर उंदराचे शवविच्छेदन केल्यानंतर आता उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) कोर्टात 30 पानी आरोपपत्र (chargesheet) दाखल केले आहे. सोमवारी न्यायालयाने आरोप मान्य करत आरोपपत्र दाखल करुन घेतले आहे. त्यामुळे आता कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शवविच्छेदनाच्या अहवालात प्राण्यासोबत क्रूरता झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोपीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या बदायुमध्ये पानबरिया येथील रहिवासी मनोज कुमार याने घरात उंदीर पकडला होता. त्यानंतर मनोजने उंदराच्या शेपटीला एक दगड बांधला आणि त्याला घराबाहेरील नाल्यात बुडवायला सुरुवात केली. यावेळी तिथून प्राणीप्रेमी विकेंद्र शर्मा जात होते. विकेंद्र यांनी मनोजला असे करण्यापासून रोखले असता त्याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यातच उंदराचा मृत्यू झाला. 

विकेंद्रने याचा व्हिडीओ काढला आणि पोलिसांना तिथे बोलावून घेतले. विकेंद्रने आरोपी मनोजविरुद्ध एफआयआर दाखल केला आणि कारवाईची मागणी केली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच दिवशी आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात नेले. मात्र उंदराचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्ह्यात ती तशी सोई नव्हती. पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. मात्र विकेंद्र यांनी हे प्रकरण लावून धरले कायदेशीर कारवाईसाठी शवविच्छेदन करण्याचा निश्चय केला. त्यानंतर उंदराचे शवविच्छेदनासाठी आयव्हीआरआय बरेली येथे नेण्याचे ठरवले. त्यानंतर विकेंद्र पोलिसांसह उंदराचा मृतदेह घेऊन तेथे पोहोचले आणि शवविच्छेदन पार पडले.

हेही वाचा :  भयंकर! 90 पेक्षा जास्त वेळा बलात्कार; हैवान पती पत्नीला बेशुद्ध करुन अनोळखी पुरुषांना बोलवायचा आणि...

उंदराचा शवविच्छेदनाचा अहवाल आला तेव्हा त्यामध्ये उंदराचे यकृत आणि फुफ्फुस खराब झाल्याचे सांगण्यात  आले होते. मात्र नाल्याच्या पाण्यात बुडून उंदराचा मृत्यू झाला नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्याचा मृत्यू गुदमरल्याने झाला असून तो आधीच अनेक आजारांनी त्रस्त होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे आरोपी मनोजला पोलीस ठाण्यातूनच जामीन मंजूर झाला.

त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी सुमारे पाच महिन्यांच्या तपासाअंती उंदराच्या हत्या प्रकरणात आरोपी मनोजविरुद्ध 30 पानी आरोपपत्र तयार केले. सीओ सिटी आलोक मिश्रा यांनी सांगितले की, उंदीर मारणाऱ्या आरोपीवर प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोर्टात याप्रकरणी खटला चालवला जाणार आहे.

उंदराच्या हत्येप्रकरणी किती शिक्षा होऊ शकते?

अशा प्रकरणांमध्ये प्राणी क्रूरता कायद्यात 10 ते 2 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. कलम 429 अन्वये पाच वर्षांचा कारावास आणि दंड अशा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. मात्र याआधी अशा प्रकारचे प्रकरण समोर आले नसल्याने कोर्ट मनोजला कोणती शिक्षा सुनावते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

हेही वाचा :  भिकारी बनून रेकी केली, संधी मिळताच लांबवलं तब्बल 200 तोळे सोनं; पुण्यात फिल्मी स्टाईल चोरीचा थरार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …