Rahul Gandhi : “राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापून टाकू”; काँग्रेस नेत्याची धमकी

Rahul Gandhi Disqualification : मोदी आडनावावरून (Modi Surname) केलेल्या टिप्पणीच्या प्रकरणात 23 मार्चला सुरतच्या कोर्टाने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचे लोकसभा (Lok Sabha) सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. कोर्टाने (Court) राहुल यांचा जामीन मंजूर करताना शिक्षेला स्थगिती दिली आहे. सूरत कोर्टाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईवरुन देशभरात आंदोलनं केली आहेत. अशातच आता एका काँग्रेस नेत्याने थेट राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्या न्यायाधिशांना शिक्षा सुनावली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने काँग्रेसच्या एससी/एसटी शाखेने याच्या निषेधार्थ आंदोलन केले. तामिळनाडूतील दिंडीगुल येथे शुक्रवारी निषेध नोंदवण्यात आला. यामध्ये काँग्रेसच्या एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या आंदोलनादरम्यान पक्षाचे जिल्हाप्रमुख मणिकंदन यांनी आपल्या भाषणात काँग्रेसची सत्ता आल्यास राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापून टाकू, असे म्हटले आहे.

23 मार्च रोजी सुरत न्यायालयाने आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती एच वर्मा, ऐका, काँग्रेस सत्तेवर आल्यावर तुमची जीभ कापून टाकू, अशी थेट धमकी मणिकंदन यांनी दिली आहे. या प्रकरणाची दखल घेत स्थानिक पोलीस ठाण्यात मणिकंदनविरुद्ध तीन कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दिंडीगुल उत्तर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :  Viral Video : 'या' महिलेचा नागिन डान्स पाहिला का? जमिनीवर लोळत तिने...

कोणत्या प्रकरणात राहुल गांधींना शिक्षा झाली?

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकातील कोलार येथे एका जाहीर सभेत मोदी आडनावावरून एक टिप्पणी केली होती. यानंतर भाजपच्या पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. याप्रकरणात सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तसेच दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरले होते.

कोण आहेत पूर्णेश मोदी?

गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सूरत सेशन कोर्टात ही याचिका दाखल केली होती. राहुल यांच्या वक्तव्यामुळे पूर्ण मोदी समाजाचा अपमान झाल्याची तक्रार त्यांनी आपल्या याचिकेत केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पूर्णेश मोदी गुजरात राज्यातील सूरत शहरातील अदजान परिसरात राहातात. 2013 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते पहिल्यांदा आमदार झाले होते. 2013 मध्ये तत्कालीन आमदार किशोरभाई यांचा आजारपणामुळे निधन झाल्याने पोटनिवडणूक पार पडली होती. यामध्ये भाजपकडून पूर्णेश मोदी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होते. पूर्णेश मोदी मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. 

त्यानंतर 2017 विधानसभा निवडणुकीत पूर्णेश मोदी यांनी पुन्हा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला आणि पूर्णेश मोदी पुन्हा एकदा विजयी झाले. गुजरात सरकारमध्ये पूर्णेश मोदी यांनी स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण समिती सदस्य म्हणून 12 ऑगस्ट 2016 ते 25 डिसेंबर 2017 महत्त्वाची भूमिका सांभाळली होती.

हेही वाचा :  Loksabha Election 2024: आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? 'मविआ'च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …