How to Improve Wifi speed : तुमच्या घरातील Wifi चं स्पीट वाढवायचंय? या ८ सोप्या टीप्स ठरतील फारच फायद्याच्या…

Know tips to Improve Wifi Speed : आजकाल स्मार्टटीव्हीच्या युगात प्रत्येकाच्या घरातच जवळपास स्मार्ट-टीव्ही दिसू लागले आहेत. त्यामुळे स्मार्टटीव्हीच्या स्मार्ट वापरासाठी घरोघरी WiFi कनेक्शन देखील असल्याचं आता दिसून येत आहे. त्यात आता आयपीएलसारख्या (IPL 2023) दमदार लीगचे सामनेही JioCinema सारख्या ॲपवर सर्व युजरसाठी अगदी मोफत लाईव्ह स्ट्रिम होत असतात. पण हे सामने टीव्हीवर पाहण्यासाठी मोबाईल इंटरनेट नाही तर Wifi कनेक्शन अधिक सोयीस्कर ठरतं आणि त्यामुळे प्रत्येकाला घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन मूव्हीज, टीव्ही शोज आणि मॅचेसचा विनाअडथळित अनुभव घ्यायचा असल्यास त्यांचं Wifi कनेक्शन स्ट्राँग असणं गरजेचं आहे. दरम्यान यासाठीच घरातील Wifi चं स्पीड काही सोप्या स्टेप्स करुन कसं वाढवता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

Wifi राउटर आणि मॉडेम रीस्टार्ट करा

wifi-

तर Wifi ची स्पीड वाढवायची असल्यास त्यासाठी एक सोपी स्टेप्स सर्वात आधी करता येईल. दिवसभर आपण Wifi वापरत असल्याने कधी-कधी Wifi चं कव्‍हरेज किंवा स्पीडच्या समस्‍या येऊ लागतात. अशात सर्वात आधी आपण राउटर आणि मॉडेम रीस्टार्ट करण्‍याचा प्रयत्न करु शकतो. यामुळे त्याती ऑनलाईन कॅशे साफ होण्यास मदत मिळते. ज्यामुळे नेटवर्क कनेक्शन पुन्हा अधिक चांगल्याप्रकारे मिळू लागते.

हेही वाचा :  डायबिटीज करतो किडनी, डोळे, लिव्हरसारखे महत्त्वाचे अवयव कायमचे निकामी, लगेच घरीच करा 'हे' एक काम

​वाचा: Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!

खराब नेटवर्कसाठी तुमच्या सर्व्हिस प्रोवायडरशी बोलून घ्या

खराब नेटवर्कसाठी तुमच्या सर्व्हिस प्रोवायडरशी बोलून घ्या

इंटरनेट स्लो होण्यामागील आणखी एक सामान्य कारण म्हणजे तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडरच्या (ISP) सिस्टीममधील बिघाड. त्यामुळे तुमच्या सर्व्हिस प्रोवायडररडून डाउनटाइम आहे का ते तपासण्यासाठी कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करा. त्यानंतर सर्व्हिस प्रोवायडरशी बोलून त्याच्या सिस्टीमध्ये सगळं ठीक काम करत असल्याची खात्री करा.
​वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स

WiFi राउटर फर्मवेअर अपडेट करा

wifi-

आता आपण सगळेच स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरत असतो. जसं आपल्या या सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये अपडेट येत असतो. त्याप्रमाणे, राउटर देखील आपलं काम सुधारण्यासाठी आणि अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये आत्मसात करण्यासाठी नवीन फर्मवेअर अपडेट्स प्राप्त करतात. त्यामुळे तुमचा राउटर लेटेस्ट उपलब्ध फर्मवेअरवर चालत असल्याची खात्री करा.

​5GHz वर स्विच कर

5ghz-

बहुतेक राउटरमध्ये ड्युअल-बँड सेटअप असते. यामध्ये 5GHz आणि 2.4GHz अशा दोन पर्यायांचा समावेश असतो. दरम्यान 2.4GHz च्या तुलनेत 5GHz अधिक वेगवान आहे. त्यामुळे, जर तुम्हाला स्पीड समस्या येत असतील, तर तुमच्या ड्युअल-बँड राउटरमध्ये 2.4GHz ऐवजी 5GHz हा ऑप्शन निवडून तुम्ही पाहू शकता.

हेही वाचा :  तुमच्या घरातला Wifi स्लो चालतोय, मग 'ही' ट्रिक्स वापरून पाहा

Wifi राउटर ठेवण्याची जागा तपासा

wifi-

खराब Wi-Fi कव्हरेजमागील सर्वात मोठे कारण म्हणजे राउटरचे चुकीचे प्लेसमेंट असू शकते. जर राउटर चूकीच्या जागी ठेवला तर त्याचा चालू असूनही काही फायदा होत नाही आणि Wifi डेड झोन तयार होतात. यावर मात करण्यासाठी, संपूर्ण घरामध्ये सर्वोत्तम सिग्नल कव्हरेजसाठी राउटर घराच्या मध्यभागी ठेवा. तसंच, तुमचा राउटर जाड भिंतीभोवती नसल्याची खात्री करा, कारण यामुळे कव्हरेजमध्ये अडथळा येऊ शकतो

​आसपास इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठेवणं टाळा

​आसपास इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठेवणं टाळा

घरातील मायक्रोवेव्ह, रेफ्रिजरेटर, बेबी मॉनिटर आणि इतर वायरलेस उपकरणांसारखी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे राउटरच्या वायरलेस सिग्नलमध्ये व्यत्यय आणतात. हे होण्यापासून रोखण्यासाठी, या गोष्टींपासून दूर कुठेतरी मध्यभागी राउटर ठेवण्याचा अधिक प्रयत्न करा.

बजेट फ्रेंडली Wifi Extender वापरा

-wifi-extender-

अनेक पर्याय करुनही अनेकदा काही काही घरात Wifi मिळत नाहीच अशावेळी हे सर्व तुमच्यासाठी काहीही काम करत नसल्यास, एखादा परवडणारा Wifi Extender तुम्ही कव्हरेज वाढवण्यासाठी घराच्या Wifi सेटअपमध्ये जोडू शकता. याने नक्कीच नेटवर्कमध्ये फरक पडण्याची शक्यता आहे.

​802.11a, 802.11b, 802.11g डिव्हाइसेस 802.11n वर स्विच करा

802-11a-802-11b-802-11g-802-11n-

Wifi चे मॉडेम/राउटर यामध्येही बरेच प्रकार असतात. अशात Wireless-N तंत्रज्ञान वायरलेस-G आणि B आणि A च्या तुलनेत नवीन आणि चांगले आहे. विशेष म्हणजे Wireless-N इतर Wireless आवृत्त्यांच्या तुलनेत दुप्पट वेगवान आहे. याचा अर्थ, Wireless-N वर तुम्ही स्विच केल्यास चांगला वेग आणि कव्हरेज तुम्हाला मिळू शकतो.

हेही वाचा :  घरी WiFi बसवायचा विचार करताय? हे स्वस्तात मस्त Broadband Plan एकदा पाहाच!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …