रक्तात साचलेल्या Uric Acid ला खेचून बाहेर काढतात या २ भाज्या

Uric Acid Without Medicine: तुमच्या हाता पायांना मुंग्या येत असतील किंवा तुमच्या शरीरात, सांधे, बोटांनी, पायाची बोटे, पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होतात का? ही समस्या युरिक अ‍ॅसिड पातळी वाढण्याचे लक्षण असू शकते. सांधेदुखी किंवा स्नायू क्रॅम्प हे केवळ सांधेदुखीमुळेच नाही तर युरिक अ‍ॅसिडच्या वाढीमुळेही होतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय? खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बैठी जीवनशैली किंवा जास्त ताण यासारख्या कारणांमुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते.
वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडचे तोटे काय आहेत? युरिक अ‍ॅसिड तुमच्या मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाच्या कार्यामध्ये बिघाड करू शकते. यामुळे शरीर आणि स्नायू दुखणे वाढू शकते. रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला हायपरयुरिसेमिया, किडनी स्टोन, संधिवात यांसारख्या गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा तुम्हाला काही खास ज्यूसबद्दल सांगत आहेत, जे युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यात मदत करू शकतात. (फोटो सौजन्य :- Istock)

हेही वाचा :  किडनी स्टोन, मुतखडा, गुडघेदुखी, हाडांचा चुरा होणं या समस्या झटक्यात होतील दूर,हा पदार्थ ठरेल चमत्कार

​युरिक अ‍ॅसिड कसे कमी करावे?

​युरिक अ‍ॅसिड कसे कमी करावे?

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत, पण युरिक अ‍ॅसिड दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे खाण्या-पिण्यात बदल करणे. सर्व प्रथम, तुम्ही अनेक प्रकारचे मासे, बिअर, अल्कोहोल, लाल मांस, केळी, ब्रोकोली इत्यादीसारखे प्युरीनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.

(वाचा :- How To Lower Cholesterol: रक्तातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल गाळून बाहेर फेकतात हे ५ पदार्थ, LDL रक्तात पोहचत नाही) ​

काकडीचा रस

काकडीचा रस

काकडीचा रस लिंबाच्या रसात मिसळून प्यायल्याने यकृत, मूत्रपिंड डिटॉक्स करण्यास मदत होते आणि रक्तप्रवाहात युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होते. हे पोटॅशियम आणि फॉस्फरसच्या उपस्थितीमुळे आहे, जे किडनी डिटॉक्स करण्यास मदत करतात. हे मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

गाजर रस

गाजर रस

गाजराच्या ताज्या रसात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवता येते. कारण गाजराच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, फायबर, बीटा कॅरोटीन, मिनरल्स असतात जे युरिक अ‍ॅसिड वाढल्याने होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतात. तसेच, लिंबूमध्ये अँटिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी असते, जे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

हेही वाचा :  हे पदार्थ हाडांत भरतात युरिक अ‍ॅसिड, चुकूनही खाऊ नका

(वाचा :- Dengue Fever Home Remedies डेंग्यूसारख्या महाभयंकर आजारावर रामबाण उपाय, झटपट वाढतील प्लेटलेट्स) ​

आले चहा

आले चहा

आल्याचा चहा प्यायल्याने युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. आल्याच्या जंतुनाशक, दाहक-विरोधी आणि उपचार गुणधर्मांमुळे हे शक्य आहे. याव्यतिरिक्त, आल्यामधील अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे नैसर्गिकरित्या जळजळ, सांधेदुखी आणि शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करतात.

ग्रीन टी​

ग्रीन टी​

ग्रीन टी केवळ तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करत नाही तर युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास देखील मदत करते. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि बायोएक्टिव्ह संयुगे काही दिवसांतच नैसर्गिकरित्या युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करू शकतात.
(टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

इथं जाणारा कधीच परत येत नाही, भारतातील रहस्यमयी बेट; इथले लोकं जगाला का घाबरतात? 145 वर्ष जुनं रहस्य

North Sentinel Island Andaman Islands Tribe : अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट हे संपूर्ण जगासाठी …