झटक्यात पोट साफ होते,चिंता-स्ट्रेस मुळापासून उपटून अंथरूणात पडताच सुखाची झोप देतात हे 5 उपाय

मंडळी, तुम्हाला माहित आहे का जर तुम्हाला नीट झोप लागत नसेल ब्वा तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्ही वेळेपूर्वीच म्हातारे होऊ शकता. झोपेच्या दरम्यान, शरीरातील सर्व प्रकारचे विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे शारोराचे चक्र चालू असते. त्याच वेळी, शरीर सर्व पदार्थ संतुलित करून नवीन दिवसासाठी स्वत:ला तयार करत असते. चांगल्या झोपेमुळेच तुम्हाला उत्तम निरोगी जीवनशैली आणि आरोग्य मिळते. फिटनेस गुरू आणि होलिस्टिक एक्सपर्ट मिकी मेहता यांच्या मते, चुकीची जीवनशैली आणि वाढत्या कामाचा ताण यामुळे अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही.

झोप न मिळण्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. नॅशनल स्लीप फाऊंडेशनने जी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत त्यातून सुद्धा अशी शिफारस करण्यात आली आहे की संपूर्ण विकासासाठी दररोज 7 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

चांगल्या झोपेसाठी करा योगासन

चांगल्या झोपेसाठी करा योगासन

मिकी मेहता यांच्या मते, जर तुम्हाला रात्री गाढ झोप येत नसेल तर याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जेवणाची चुकीची वेळ होय. कॅफिनचे अतिसेवन, मोबाईल किंवा लॅपटॉपचा अतिवापर, औषधांचे सेवन यामुळे झोपेवर परिणाम होतो. रात्री लवकर जेवायला हवे जेणेकरुन झोपण्यापूर्वी अन्नाचे पचन होईल. रात्री पचन मंदावते हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला झोपेची समस्या येत असेल, तर पुढील योगासने करण्याचा अवश्य प्रयत्न करा.
(वाचा :- Amitabh Bachchan यांना झाला Callus आजार, तळव्याच्या या आजाराने आहेत भयंकर वेदनेत, यामागची 5 कारणं आणि उपाय काय)​

हेही वाचा :  नखांवरील होळीचे हट्टी रंग निघत नसल्यास ट्राय करा हे जबरदस्त उपाय

बालासन

बालासन

बालासन किंवा बाल मुद्रा छातीतील तणाव दूर करण्यास मदत करते, पाठ आणि मणक्याला आराम देते आणि खांदे आणि हातांचा ताण कमी करते.

(वाचा :- Liver Damage: पोटाच्या या भागावर स्पर्श करून ओळखा लिव्हर झालं खराब, ही 9 लक्षणं दिसल्यास ताबडतोब करा हे 5 उपाय)​

शवासन

शवासन

शवासन किंवा शव मुद्रा मज्जासंस्थेला शांत करते, पचन आणि रोगप्रतिकारक प्रणाली सुधारण्यास मदत करते, तणाव, डोकेदुखी, थकवा आणि चिंता कमी करते आणि वाढलेला रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

(वाचा :- भारतावर H3N2 व COVID-19 चा डबल अटॅक, डॉक्टरांची चेतावणी – 5 पद्धतींनी लक्षणांतील फरक ओळखून लगेच करा हे 8 उपाय)

पादहस्तासन

पादहस्तासन

पादहस्तासन किंवा स्टँडिंग फॉरवर्ड बॅंड पोझ पाचन अवयवांची मालिश करते, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि अपचन या पोट साफ न होण्याशी निगडीत समस्या कमी करते, चयापचय क्रिया सुधारते आणि नाक आणि घशाच्या आजारांमध्ये मदत करते.
(वाचा :- डायबिटीजचे दुश्मन आहेत नैसर्गिक इन्सुलिन वाढवणारी ही 5 ड्रिंक्स, कितीही गोड खाल्लं तरी वाढतच नाही Blood Sugar)​

बद्ध कोणासन

बद्ध कोणासन

बद्धकोणासन किंवा बाऊंड अँगल पोज अंतर्गत मांड्या, कंबर आणि गुडघ्यांमधील लवचिकता सुधारते, मासिक पाळीच्या वेदनेत आराम देते आणि पचनाशी निगडीत समस्या बरी करते.
(वाचा :- हार्ट अटॅक येण्याआधी कोलेस्ट्रॉल व ट्राईग्लिसराईड एका झटक्यात फेकतं गाळून बाहेर, खा हे बाराही महिने मिळणारं फळ)​

हेही वाचा :  मुसळधार पाऊस अन् सोसाट्याचा वारा; नंदूरबारमध्ये चालत्या कारवर झाड कोसळले, एक ठार

एक पाद उत्तानपादासन

एक पाद उत्तानपादासन

एक पाद उत्तानपादासन किंवा सिंगल लेग राइज्ड पोज पोटाच्या स्नायूंना बळकट करते, पाठीच्या खालच्या स्नायूंना बळकट करते आणि पाचक अवयवांचे कार्य सुधारते.
(वाचा :- सावधान, XBB 1.16 च्या रूपात पुन्हा आला कोरोना,महाराष्ट्र-गुजरातमध्ये 754 लोक आजारी, 9 लक्षणांवर ठेवा बारीक नजर)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …