वीणा जगतापचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून हरखून जाल

वीणा जगताप हे नाव घराघरात पोहचले ते ‘राधा ही बावरी’ मालिका आणि बिग बॉस मराठी २ पर्वातून. वीणाच्या नावाची नेहमीच चर्चा असते आणि तिची फॅशनही चर्चेत असते. वीणाने नुकतेच नऊवारी साडीतील लुक मराठी दिनानिमित्त शेअर केले असून हे फोटो व्हायरल होत आहे. नऊवारी साडी म्हणजे मराठमोळा साज. हाच मराठमोळा साज घेऊन वीणाने अनेकदा फोटोशूट केले आहे. त्यातील काही निवडक फोटो वीणाने सोशल मीडियावर पोस्ट केले असून नऊवारी साडीत वीणाचे सौंदर्य खूपच सुंदर दिसत असून तिची ही फॅशन जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – @veenie.j Instagram)

​डिझाईनर ब्लाऊजचे वेधले लक्ष​

​डिझाईनर ब्लाऊजचे वेधले लक्ष​

वीणाने शेअर केलेल्या या फोटोमधील क्रिम डिझाईनर ब्लाऊजने अधिक लक्ष वेधले आहे. यासह वीणाने मोती आणि सोन्याचे कानातले घातले असून गळाबंद मोठा चोकर घातला आहे. तर त्यासह घातलेली मोत्याची लाल खड्याची मोठी नथ लक्ष वेधून घेत आहे. वीणाचा हा लुक खूपच आकर्षक असून चेहऱ्यावरील हावभावही सुंदर आहेत.

हेही वाचा :  भारतीय मुस्लिमांबद्दल ओबामांचं सूचक विधान! म्हणाले, "मी मोदींबरोबर संवाद साधला असता तर..."

​सिल्व्हर बॉर्डरची निळी नऊवारी​

​सिल्व्हर बॉर्डरची निळी नऊवारी​

वीणाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये निळ्या रंगाची बारीक पट्टे असणारी नऊवारी साडी नेसली आहे. तर त्यावर सिल्व्हर बॉर्डर असून स्टायलिंग करताना वीणाने मिसमॅच ऑफ व्हाईट हेव्ही एम्ब्रॉयडेड ब्लाऊज घातला आहे. तर ऑक्सिडाईज्ड दागिन्यांनी हा लुक पूर्ण केला आहे. केसांचा आंबाडा घालून एका बाजूला भांग काढत करण्यात आलेली हेअरस्टाईल खूपच सुंदर दिसत आहे.

(वाचा – लाल लेहंग्यात सजली शार्दुल ठाकूरची नवरी, मितालीचा मराठमोळ्या नवरीच्या लुकला डच्चू)

​गुलाबी रंगातील मराठमोळा साज​

​गुलाबी रंगातील मराठमोळा साज​

डोळ्यांना सुखद अनुभव देणारा अशा गुलाबी रंगातील नऊवारी साडी वीणाने नेसली आहे. गोल्डन बॉर्डर आणि त्यावर बुट्टी असा या साडीचा साज आहे. या साडीसह वीणाने लेअर्ड राणी हार आणि चोकर नेकलेस परिधान केला असून हातात जाड कड्याप्रमाणे बांगड्या घातल्या आहेत. तर वेव्ही हेअरस्टाईलचा अंबाडा घालून लुक पूर्ण केला आहे. कोणत्याही सणासाठी हा लुक उत्तम ठरतो.

(वाचा – मितालीने शेअर केला आंघोळीचा फोटो, स्टाईलच्या बाबतीत देतेय बॉलीवूड अभिनेत्रींनाही टक्कर)

​हिरव्या खड्याची मोत्याची नथ​

​हिरव्या खड्याची मोत्याची नथ​

नथीशिवाय मराठमोळा साज पूर्णच होत नाही. वीणाने घातलेली ही मोत्याची नथ वेगळी असून यात हिरवा खडा गोवण्यात आला आहे. यासह कपाळावर चंद्रकोर आणि मिनिमल मेकअप केल्यामुळे वीणाच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाहीये. आयलॅशेससह आयशॅडो, हायलायटर, काजळ आणि लिपस्टिकचा मेकअप करत वीणाचा हा लुक परफेक्ट सणाचा लुक देतोय.

हेही वाचा :  ओव्हर पझेसिव्हनेसमुळे नात्यात दुरावा आलाय, आवडती व्यक्ती दूर जाताना दिसतेय, तर आताच ही कामं करा​

(वाचा – ईशाच्या घरी जाताना नातू पृथ्वीचा हात पकडून मुकेश अंबानींनी दिली पोझ, तर नीता अंबानी आणि श्लोकाचा पारंपरिक गुजराती लुक)

​नववधूचा साज​

​नववधूचा साज​

नववधूची पिवळी साडी असावी अशीच नऊवारी वीणाने नेसली आहे. त्यावर पैठणी शेला अधिक सौंदर्य वाढवत आहे. हिरव्या बांगड्या आणि त्यात मध्येच सोन्याच्या बांगड्या, गळ्यात मोठा नेकलेस आणि गळाबंद नेकलेस तर हिरवे झुमके घातल्याने वीणाच्या सौंदर्यात भरच पडली आहे. व्हेवी हेअरस्टाईलने अधिक सौंदर्य खुलून आले आहे.

​कोल्हापुरी चपलांसह हिरव्या साडीतील सौंदर्य​

​कोल्हापुरी चपलांसह हिरव्या साडीतील सौंदर्य​

वीणाने यामध्ये ब्राम्हणी पद्धतीची नऊवारी नेसली असून तिच्या चेहऱ्यावरील निरागसता फॅशनला चारचाँद लावत आहे. तर तिने या साडीसह थ्री फोर्थ ब्लाऊज घातला आहे. तिचा हा लुक तिच्याकडे पाहातच राहावा असा आहे.

वीणाच्या या लुकवरून प्रेरणा घेऊन तुम्ही आताच गुढीपाडवा यात्रेच्या तयारीही लागू शकता. मनात भरून राहील असे हे नऊवारी लुक तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोप

पुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक तरुण …

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …