Water Heater Geyser: गिझर वापरताना ही काळजी घ्या, अन्यथा एक चूक पडू शकते महागात

Take Care Of Using Water Heater Geyser: हिवाळा सुरु असून सकाळी सकाळी झटपट पाणी गरम करण्यासाठी घरोघरी गिझरचा वापर केला जातो. गॅसवर पाणी तापवण्यापेक्षा अनेक जण बाथरुमध्ये गिझर लावून घेतात. हिवाळ्यात गिझरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. वीज आणि गॅसवर चालणारा अशा दोन प्रकारचे गिझर सध्या बाजारात आहेत. या दोन्ही गिझरबाबतीत एक चूक चांगलीच महागात पडू शकते. त्यामुळे गीझर वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे. अनेकदा घरात असं होतं की गीझर सुरु करतो आणि विसरून जातो. त्यामुळे गीझर चांगलंच तापतं आणि ब्लास्ट होण्याची शक्यता असते. कधी कधी पाण्यात वीज उतरण्याचा धोकाही असतो. अशी घटना तुमच्या बाबतीत घडू नये, यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

– गिझर लावताना आणि ते बंद करण्याची जबाबदारी घरातील प्रत्येक व्यक्तीची आहे. प्रत्येक गिझरमध्ये ठरावीक वेळेनंतर पाणी तापतं. अशावेळी बादलीत आवश्यक पाणी मिळालं की गिझर बंद करा. हल्ली ऑटोमेटिक गिझर आले असून पाणी तापल्यानंतर आपोआप बंद होतात. मात्र जुन्या गिझरमध्ये अशी सोय नाही. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.

हेही वाचा :  "Free मध्ये मिळतय Twitter Blue Tick..." तुम्हालाही असा मेसेज आला तर सावधान!

– तुमच्या घरातील गिझर थेट पाण्याच्या टाकीशी जोडलेले असेल आणि टाकी रिकामी झाली तर गिझर जास्त तापू शकतो. कारण पाणी नसताना आणि गिझर चालू असेल तेव्हा जास्त गरम होते. दाब वाढून त्याचा स्फोटही होतो. टाकीत पाणी आहे की नाही याची शहनिशा करा.

– गिझर विकत घेतल्यानंतर इलेक्ट्रिशियनकडून बसवून घ्या. तसेच आयएसआय मार्क असलेला गिझर घ्या. स्वस्त गिझरमुळे आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं. 

बातमी वाचा- Tyre Tips: गाडीच्या टायरची अशी घ्याल काळजी, या स्टेप्स फॉलो कराल

– गॅस गिझरसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. यात ब्यूटेन आणि प्रोपेन गॅस असतो. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साइडची निर्मिती होते. त्यामुळे बाथरुममध्ये एग्जॉस्ट फॅन जरूर लावा. 

– घरात लहान मुलं असतील तर गिझरपर्यंत हात पोहोचणार नाही याची काळजी घ्या. तसेच घरात ट्रिपर लावून घ्या. एखादी घटना घडल्यास ट्रिप होऊन लाईट बंद होईल. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …