मराठमोळ्या मितालीने शार्दुल जवळ हटके स्टाईलने व्यक्त केलं होत प्रेम, जाणून घ्या फिल्मी लव्हस्टोरी

Shardul Thakur Mitali Parulkar Love story : मराठमोळ्या क्रिकेटर शार्दुल ठाकूरने मिताली परूळकरसह लग्नगाठ बांधली. गेले दोन-तीन दिवस हळद, संगीत असा हा सोहळा रंगला होता. पालघरसारख्या लहानशा जिल्ह्यातून दमदार कामगिरी करणारा भारताचा दमदार क्रिकेटर म्हणजे शार्दुल ठाकूर आपल्या कामगिरीने मोठा झाला आहे. सध्या बॉलिवूडसोबतच भारतीय संघातील खेळाडू एकापाठोपाठ एक आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करताना दिसत आहे. अशा परिस्थिती शार्दुल ठाकूरने मिताली परूळकरसह लग्नगाठ बांधली. या शाही लग्नात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद भरभरून दिसत आहे. शार्दुलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट केले असून तुफान व्हायरल होत आहेत. या दोघांचा लव्हस्टोरी देखील खूपच फिल्मी आहे. (फोटो सौजन्य – @shardul_thakur Instagram)

लग्न करणाऱ्या मंडळींच्या क्लबमध्ये शार्दुलची एन्ट्री

लग्न करणाऱ्या मंडळींच्या क्लबमध्ये शार्दुलची एन्ट्री

आता लग्न करणाऱ्या मंडळींच्या क्लबमध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर देखील सामील झालाय. 27 फेब्रुवारी हा त्याच्या आयुष्यातील खास क्षण ठरला. शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकर सोबत आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करतोय.
(वाचा :- लाइफ पार्टनरला भूतकाळातील EX च्या आठवणी सांगताय ? थांबा! या गोष्टी वाचून निर्णय घ्या) ​

हेही वाचा :  तरुण मुलांना का व्हायचंय दादा, भाई, डॉन? तरुणांमध्ये वाढतेय 'दुर्लभ गँग'ची क्रेझ

कोण आहे मिताली

कोण आहे मिताली

शार्दुल आणि मिताली परुळकर यांच्यात गेले अनेक वर्षांची मैत्री आहे. यांची लव्हस्टोरी देखील खूपच फिल्मी आहे. अनेक वर्ष डेट केल्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये दोघांनी साखरपु्डा केला होता. आधी मैत्री मग प्रेम अन् त्यानंतर लाईफ पार्टनर होऊन आयुष्यभर एकमेंकाना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मिताली परुळकर ही एक बिझनेस वुमन असून ती ठाणे शहरात ‘ऑल द बेक्स’ नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. ‘ऑल जॅझ लक्झरी बेकर्स’ नावाचा स्टार्टअप मितालीने फेब्रुवारी 2020 मध्ये सुरु केला. स्वतःची बेकिंग कंपनी सुरू केल्यानंतर मिताली बेकरी आणि त्याच्याशी संबंधित वेबसाइट दोन्हीची जबाबदारी पाहते.

शार्दुलचा हळदी कार्यक्रमात झिंगाट डान्स

या आधी काय करायची मिताली?

या आधी काय करायची मिताली?

स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मिताली एक कंपनी सेक्रेटरीच्या रुपात काम करायची. तिने ब्लू स्टार डायमंड्स, चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड आणि जेएसडब्ल्यूसारख्या अनेक नामांकित कंपन्यांसोबत काम केले आहे.
(वाचा :- बॉयफ्रेंडला लागले दुसऱ्या बाईचे वेड, क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं!) ​

असं व्यक्त केलं होत प्रेम

असं व्यक्त केलं होत प्रेम

मराठमोळी मिताली परुळकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती सोशल मीडियावरुन काही खास पोस्ट शेअर करत असते. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी अल्बम ‘बॉयफ्रेंड पक्का सेल्फीश हाय’ (Boyfriend Pakka Selfish Hay) गाणं शेअर करत तिने आपलं प्रेम व्यक्त केलं होते. बॉयफ्रेंड सेल्फीश असला हे असलं तरी तिने शेअर केलेले फोटो आणि कॅप्शन दोघांच्यातील प्रेमाची साक्ष देणारं होते.

हेही वाचा :  'लॉर्ड' शार्दूल लवकरच अडकणार लग्नबंधणात! कर्जतमध्ये होणार विवाह सोहळा

(वाचा :- कोण आहेत मिसेस महिंद्रा? पाहताच क्षणी प्रेमात पडले आनंद महिंद्रा, आजीची अंगठी घेऊन केलं प्रपोज)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

वीज, पाणीटंचाई अन् उन्हाचे चटके, इरसालवाडी दरडग्रस्तांची परवड सुरूच; पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेशाचे स्वप्न हवेतच?

प्रफुल्ल पवार, झी मीडिया  Irshalwadi landslide: 19 जुलै 2023 रोजी रायगडमधील इरसाल वाडी या आदिवासी …

बालसुधार गृह म्हणजे काय, तिथे मुलांना काय सुविधा मिळतात? सर्व काही समजून घ्या!

Pune Accident News:  पुणे अपघात प्रकरणातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा जामीन बालहक्क न्यायालयाने फेटाळला आहे. …