सोनम कपूरला व्हायचंय आपल्या सासूसारखी आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत व्यक्त केली इच्छा

सोनम कपूर अहुजा लग्न करून लंडनला सेटल झाली मात्र मुलगा वायुच्या जन्मानंतर पुन्हा एकदा सोनम इंडस्ट्रीत सेट होतेय. नुकतेच सोनमने आपल्या सासूबाईंचा वायुसह आणि स्वतःसह फोटो शेअर केले आहेत. सासूच्या वाढदिवसानिमित्त तिने ही पोस्ट केली असून आपल्यादेखील त्यांच्यासारखंच वायुला वाढवायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला योग्य संस्कार देणं आणि त्याला मोठं करणं हे खरं तर मोठं जबाबदारीचं काम आहे आणि ते काम लिलया आपल्या सासूने पेलले असल्याचं मत सोनमने व्यक्त केले आहे आणि त्यांच्या मुलांप्रमाणेच वायुदेखील उत्तम व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. जाणून घेऊया नक्की कसे द्यायला हवेत बाळाला संस्कार (फोटो सौजन्य – @sonamkapoor Instagram)

​मुलींचा आदर करावा​

​मुलींचा आदर करावा​

आपल्याकडे आजही अनेक घरांमध्ये मुलगा आणि मुलगी मतभेद केला जातो. मात्र हल्ली मुलांनाही तितकेच संस्कार देणे आणि गोष्टी शिकविणे महत्त्वाचे झाले आहे. मुलींचा आदर कसा ठेवावा हा त्यातील सर्वात मोठा संस्कार मुलगा मोठा होताना द्यावा लागतो.

हेही वाचा :  किडनीचा मुळापासून नाश करण्यासाठी इतकं थंड पाणी आवश्यक, हे आहे Drinking Water चे परफेक्ट तापमान

​दयाळूपणासह समतोल राखावा​

​दयाळूपणासह समतोल राखावा​

मुलांनी दयाळू असणे गरजेचे आहे मात्र त्याचवेळी तितकेच प्रोग्रेसिव्ह आणि कणखर राहून निर्णय घेणेही गरजेचे आहे. मुलांना लहानपासूनच याबाबत योग्य दिशा दाखवणे हे प्रत्येक आईवडिलांचे कर्तव्य आहे. सोनमने सासूकडून हेच संस्कार आपल्याला मिळावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

(वाचा – गरोदरपणादरम्यान पोटावर येणारी काळी रेषा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या Linea Nigra विषयी)

​प्रेमळ आणि जपणारी मुलं​

​प्रेमळ आणि जपणारी मुलं​

स्वतःची प्रगती करताना कुटुंब जपणे हेदेखील महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी लहानपणापासून मुलांना याबाबत नेहमी संस्कार द्यायला हवेत. कुटुंब हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि आपल्यासाठी जे आई-वडील लहानपणापासून झटतात त्यांची साथ कधीही मुलांनी सोडू नये.

(वाचा – सोनम कपूरने दाखवली ६ महिन्याच्या वायुची पहिली झलक, नव्या आईने काय आहार सुरू करावा)

​आई म्हणून उदाहरण सेट​

​आई म्हणून उदाहरण सेट​

प्रत्येक आई वेगळी असते आणि त्या आईचे मूलही वेगळे असते. मात्र तरीही लहानपणापासूनच आपल्या मुलाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्याचे काम आजही अधिक प्रमाणात आईच करते आणि त्यामुळे कितीही मोठ्या हुद्द्यावरील आई असो तिच्याकडे नेहमीच एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिलं जातं ते तिच्या मुलांच्या वागण्यातून. हेच संस्कार मिळणं गरजेचे आहे.

हेही वाचा :  Ajit Pawar : तुम्हाला वाटतं तर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्र्यांना अजित पवार यांचे प्रत्युत्तर

(वाचा – Parenting Tips: लहान वयातच मुलांना द्या शिकवण, शिवाजी महाराज जयंतीची माहिती द्यावी अशी)

​मुलांना मोकळीक देणे​

​मुलांना मोकळीक देणे​

मुलांना काय हवं काय नको अथवा काय चूक काय बरोबर हे सांगताना त्यांना निर्णय घ्यायला मोकळीकही द्यावी लागते. प्रत्येक गोष्टीत एका विशिष्ट मर्यादेनंतर लुडबूड करणे योग्य नाही. त्यामुळे लहानपणापासूनच आईने ही सवय स्वतःला लावून घेतलेली बरी. याच सवयी पुढे मुलांनी लग्न केल्यानंतर उपयोगी ठरतात आणि सुनेसह सासू म्हणून नातं उत्तम होते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …