Workout Mistakes In Gym : जीममध्ये व्यायाम करताना ‘या’ चुका करु नका, डॉक्टरांनी पाहा काय दिलाय सल्ला?

मुंबई : आपण फिट आणि अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामावर भर देतो.  (Workout ) अनेकवेळा जीमध्ये (Gym ) जाऊन व्यायाम करतात. मात्र, काही चुकीमुळे मोठा अनर्थ ओढवतो. (Workout Mistakes In Gym)  जीममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याची वृत्त आपल्याला वाचायला मिळत आहे. अशावेळी जीमध्ये कोणत्या चुका टाळायळा हव्यात याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. (What Mistakes To Avoid In The Gym To Build Fast Body)

दरम्यान, जिममध्ये व्यायाम करताना एका 24 वर्षीय पोलिसाचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने या पोलिसाचा मृत्यू झाला. तेलंगणाच्या हैदराबादमधील ही घटना आहे. विशाल असे या पोलिसाचं नाव आहे. 2020 मध्ये तो पोलीस दलात भरती झाला होता. जिममध्ये पुश-अप्स मारल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली. त्याने लगेच एका मशीनला पकडले. त्यानंतर तो खाली कोसळला. त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशाल असिफ नगर पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर होता. या घटनेनंतर जीमध्ये व्यायाम करताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. पण नेमकी काय काळजी घ्यावी, हे माहित नसते.

हेही वाचा :  IRCTC वर मिळेल Confirm Ticket! केवळ Railway Booking करताना करा 'या' पर्यायावर क्लिक

डॉक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला

याबाबत 68 वर्षीय डॉक्टरांनी सांगितले की, जीममध्ये व्यायाम करताना कोणत्या चुका करु नयेत हे स्पष्ट केले आहे. फोर्टिज एस्कॉट्स हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी डॉ. अशोक सेठ यांनी चुका टाळण्याबाबत माहिती दिली आहे. व्यायाम करताना जास्त प्रेशन देऊन व्यायाम करु नये. जेवढे झेपेल तेवढाच व्यायाम करावा. अधिकचा व्यायाम करु नये जेणे करुन तुमच्या शरीरावर ताण येईल. तसेच सप्लिमेंट किंवा औषध घेऊ नयेत.

तुम्ही  जास्त व्यायाम करु नका. ईसीजी, इको आणि ब्लडप्रेशर टेस्ट एकदा करुन घ्या. जास्त व्यायाम करु नका, थकले असाल तर थांबा. स्नायू बळकट करताना हृदयावर जास्त परिणाम होतो. मसल्ससाठी बरेच लोक टोकाला जात असतात. बरेच लोक औषधे घेणे सुरू करतात, ही एक वाईट गोष्ट आहे, असे डॉ. शोक सेठ म्हणालेत.

जीममध्ये कोणत्या चुका करतो?

आपण जीममध्ये व्यायाम करताना दोन दिवसांचा व्यायाम एकदाच करतो. म्हणजे जास्त व्यायाम करतो. त्यामुळे ताण येतो. सुरुवातीला कमी प्रमाणात व्यायाम करा. हळूहळू वाढवत जा. ज्यावेळी वेट लिफ्टिंग करतो. पण मी हळू हळू वजन वाढवले ​​पाहिजे. तासनतास उभे राहून 7 किलो लीड कोटमध्ये प्रक्रिया करावी लागते, त्यामुळे पाठीची काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा :  शाहरुखने नव्या संसदेच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर NCP चा टोला; म्हणाले "नेमकी कसली भीती..."

डॉक्टरांकडून सावधगिरीचे आवाहन

कोणत्याही कारणाशिवाय श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ट्रेडमिलवर कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हेही आपण पाहिले पाहिजे. त्याचा वेग अचानक वाढवू नका. ट्रेडमिल करत असताना जर दोन वाक्ये बोलता आली आणि नंतर दम लागला तर ठीक आहे. 

जर तुम्हाला अजिबात बोलता येत नसेल तर ते खूप धोकादायक आहे. तुम्ही असं काही करु नका. जर तुम्ही ट्रेडमिल करत असताना आरामात बोलत असाल आणि तुमचा श्वास अजिबात सुटला नसेल तर याचा अर्थ तुम्ही काहीच करत नाही आहात, अशावेळी धोका फारच कमी आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …