Stocks to Buy: जमवा आणि कमवा! ‘या’ 5 जबरदस्त Stocks मध्ये वेळीच पैसे गुंतवा

Stocks to Buy: सध्या बाजारात आपल्याला अनेक तऱ्हेचे शेअर्स (Shares) उपलब्ध झालेले पाहायला मिळतील. जागतिक बाजारात एकीकडे मंदीचं (Recession) सावट फिरताना दिसत आहे. त्यामुळे शेअर बाजारातही गेल्या काही दिवसांपुर्वी उतार-चढाव दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी शेअरबाजारात मोठी घसरण (Share Market Down) पाहायला मिळाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात नक्की काय काय बदल होत आहेत हे पाहणं गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं ठरत आहे. सध्या अमेरिकेत (US Share Market) शेअर बाजारात मंदी पाहायला मिळाली आहे. डाऊ जोन्स 0.13 टक्के, S&P 500 0.39 टक्के आणि Nasdaq 1.09 टक्क्यांनी घसरले आहे तर निक्केईमध्ये 214 अंकांची म्हणजेच 0.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. (stocks to buy these are the 5 stocks that can give unexpected returns)

काय सांगताय शेअर बाजारातील आकाडे? (What the Share Market Update Today) 

SGX निफ्टी (Nifty) 22 अंकांनी वाढताना दिसतो आहे त्यामुळे सध्या मार्केटमध्ये चांगली वाढही होते आहे. प्रामुख्यानं सोमवारी देशांतर्गत बाजारपेठा या बंद होत्या. आता कंपन्या आपल्या तिसऱ्या तिमाहीत निकाल प्रसिद्ध करत आहे. ज्यात कंपनीच्या कमाईपासून ते कुठले शेअर्स ओपन झाले आहेत याची व्यवस्थित महिती तुम्हाला मिळू शकते. सध्या बाजारात ब्रोकरेज हाऊसनं काही दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment) करण्याचा सल्ला दिला आहे. आज आलेल्या माहितीनुसार आयटी सेक्टरमध्ये (IT Sector) सर्वात वाईट शेअरचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो आहे. परंतु तुम्ही खाली काही दिलेल्या काही स्टॉक्सचा (Stocks) विचार करू शकता. या शेअर्समधून तुम्हाला 36 टक्क्यांपर्यंत मजबूत चांगला परतावा (Returns) मिळू शकतो. 

हेही वाचा :  Explainer : आज Niftyचा नवा उच्चांक? जाणून घ्या शेअर बाजारात कुठून आलीय तेजी

काय आहेत शेअर्स? (Today’s Stocks to Buy)

सायएंट लि (Ciyent Ltd)
टार्गट प्राईझ (Target Price) – 910 रूपये 
21 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) – 802 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 108 रुपये किंवा 13 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.

टिमकेन इंडिया (Timken India Pvt Ltd)
टार्गट प्राईझ (Target Price) – 3750 रुपये 
21 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) – 3,599 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 151 रुपये किंवा 4 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.
(नुवामा वेल्थने (Nuwama Weath) या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.)

कॅम्पस ऍक्टिव्हवेअर (Campus Activewear) 
टार्गट प्राईझ (Target Price) – 565 रुपये 
21 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) – 424 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 141 रुपये किंवा 33 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.
(जेएम फायनान्शियलने या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.) 

बर्जर पेंट्स (Berger Paints) 
टार्गट प्राईझ (Target Price) – 821 रुपये 
21 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) – 604 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 217 रुपये किंवा 36 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.

हेही वाचा :  Senthil Balaji: राज्यपालांनी केली थेट आमदाराची मंत्रिमंडळातून हकालपट्टी; मुख्यमंत्री आक्रमक, राजकारण तापणार!

किम्स (KIMS) 
टार्गट प्राईझ (Target Price) – 1,740 रुपये 
21 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) – 1,489 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 251 रुपये किंवा 17 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.

कोणी गमावलं, कोणी कमावलं? (Today’s Gainers and Losers in Share Market)

बॅकिंग क्षेत्र शेअर मार्केटमध्ये चांगली उसळी दाखवतो आहे तर आयटी क्षेत्र जोरात पडलं आहे. विर्पो, रिलायन्स आणि एचसीएल टेक तसेच टाटा स्टिल सारख्या कंपन्या खाली कोसळल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …