मराठमोळ्या तेजस्वीचे साडीतील तेजस्वी रूप, डोळ्यांचे पारणे फिटेल असा लुक

बिग बॉसचा १५ वा सीझन जिंकल्यानंतर तर तेजस्वीची घोडदौड चालूच आहे. नागिन ६ मध्ये अप्रतिम परफॉर्मन्स आणि आता दादासाहेब फाळके पुरस्कार असा तेजस्वीचा प्रवास थक्क करणारा आहे. तेजस्वीने या पुरस्कार सोहळ्यासाठी नेसलेली साडी ही अत्यंत सुंदर असून तिच्या साडीची आणि लुकची सगळीकडे चर्चा आहे. आपल्या सोशल मीडियावर तेजस्वीने हा साडी लुक शेअर केला असून पाहूया याची झलक. (फोटो सौजन्य – @tejasswiprakash Instagram)

​गॉर्जस बिंज साडी​

​गॉर्जस बिंज साडी​

या पुरस्कार सोहळ्यासाठी तेजस्वी प्रकाशने अत्यंत सुंदर अशी बिंज पारदर्शी साडी नेसली होती. साडीच्या बॉर्डरला हँडवर्क करण्यात आले असून अतिशय आकर्षक दिसत होते. लहान लहान मोतीफ साडीवर वर्क करण्यात आले आहे. तेजस्वीच्या स्किन टोनला या साडीचा रंग परफेक्ट मॅच होत असून कोणत्याही पार्टीसाठी तुम्हीही अशी साडी नेसू शकता.

​स्लीव्हलेस डीप प्लंजिंग ब्लाऊज​

​स्लीव्हलेस डीप प्लंजिंग ब्लाऊज​

या साडीसह तेजस्वीने घातलेल्या डिझाईनर स्लीव्हलेस ब्लाऊजकडेही तितकेच लक्ष जात आहे. डीप प्लंजिंग नेकलाईन असणारा हा ब्लाऊज लक्षवेधी असून त्यावर सगळीकडे सजविण्यात आले आहे. साडी हलकी असली तरीही ब्लाऊजमुळे त्याची शोभा अधिक वाढली आहे.

हेही वाचा :  रशिया गरम, झेलेन्स्की नरम; युक्रेनची युद्धाच्या मूळ कारणाला तिलांजली

(वाचा – अभिनेत्री मानवी गागरूचे ‘शुभमंगल सावधान’, कॉमेडियन कुमार वरूणशी बांधली लग्नगाठ)

​रेड पेंडंट आणि रिंग​

​रेड पेंडंट आणि रिंग​

तेजस्वीने या साडीसह रेड पेंडंट आणि रेड रिंग तसंच हातात बारीक ब्रेसलेट घालून लुक पूर्ण केला आहे. साडी नेसल्यावर मिनिमल दागिन्यांध्येही सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही तेजस्वीच्या या लुककडून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

(वाचा – घटस्फोटाच्या चर्चेनंतर साडीच्या अनारकलीत मानसी नाईकचा खास अंदाज, हातभर चुड्याने वेधले लक्ष)

​वेव्ही हेअरस्टाईल​

​वेव्ही हेअरस्टाईल​

या साडीसह तेजस्वीने केस मोकळे ठेवले असून वेव्ही हेअरस्टाईल केली आहे. तिच्या गोल चेहऱ्याला साजेशी ही हेअरस्टाईल तिच्या सौंंदर्यात भर घालत आहे.

(वाचा – अरूंधतीचा वेगळाच मराठमोळा साज, पुरस्कार सोहळ्यासाठी शिवला लग्नातील साडीचा खास ड्रेस)

​ग्लॉसी मेकअप​

​ग्लॉसी मेकअप​

बिंज साडीसह तेजस्वीने न्यूड मात्र ग्लॉसी मेकअप केला आहे. ग्लिटरी पुरस्कार सोहळ्यासाठी हा लुक परफेक्ट आहे. तर साडीच्या रंगानुसार तिने हायलायरचा वापर करत लुक पूर्ण केला आहे. याशिवाय आयलॅशेसचा वापर करत डोळ्यांना सुंदर लुक मिळवून दिला आहे.

​रोझ पिंक लिपस्टिकचा जलवा​

​रोझ पिंक लिपस्टिकचा जलवा​

सर्व मेकअपमध्येही सर्वात जास्त लक्ष वेधून घेत आहे ती रोझ पिंक लिपस्टिक. पेंडंटला मॅचिंग अशी रोझ पिंक लिपस्टिक तेजस्वीच्या ओठांचा परफेक्ट शेप दाखवून देत आहे.

हेही वाचा :  छोटा टॉप घालून तेजस्वी प्रकाशने लावला हॉटनेसला तडका, फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

तुम्हीही तेजस्वीच्या या मॉडर्न लुकवरून प्रेरणा घेऊन साडीचा असा पार्टी लुक नक्कीच कॅरी करू शकता.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या …