अभिनेत्री मानवी गागरूचे ‘शुभमंगल सावधान’, कॉमेडियन कुमार वरूणशी बांधली लग्नगाठ

बॉलीवूडमधील लग्नाचा सीझन संपतच नाहीये असं वाटतंय. राहुल – आथिया, सिद्धार्थ कियाराच्या लग्नानंतर आता अभिनेत्री मानवी गागरूने आपला बॉयफ्रेंड स्टँड अप कॉमेडियन कुमार वरूणसह लग्नगाठ बांधली आहे. २३ फेब्रुवारी रोजी अगदी जवळचे नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थित कोर्ट मॅरेज केले असून आपल्या लग्नाचे फोटो तिने पोस्ट केले आहेत. त्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. पाहुया मानवीचा लग्नातील लुक कसा होता खास. (फोटो सौजन्य – @maanvigagrooInstagram)

​रेड एम्ब्रॉयडरी साडीमधील सौंदर्य​

​रेड एम्ब्रॉयडरी साडीमधील सौंदर्य​

मानवीने आपल्या लग्नासाठी लाल रंग निवडला होता. सध्याच्या ट्रेंडिंग पेस्टल रंगापेक्षा वेगळा रंग असून तिने यावर मॅचिंग दुपट्टाही घेतला होता. नव्या नवरीचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होता. लाल रंगाच्या या साडीमध्ये मानवीचे सौंदर्य खुलून आले होते.

​साधे पण एलिगंट दागिने​

​साधे पण एलिगंट दागिने​

अत्यंत साधा पण तरीही एलिगंट आणि क्लासी लुक मानवीचा दिसून येत आहे. तिने आपल्या या साडीसह पोलकी दागिने घातले असून अगदी साधा मांगटिका लावला आहे. बोजड दागिने न घालता अगदी कमी दागिन्यांमध्ये मानवीने लुक पूर्ण केला आहे.

हेही वाचा :  Accident: ST बसला भीषण अपघात; 32 प्रवासी जखमी

(वाचा – घटस्फोटाच्या चर्चेनंतर साडीच्या अनारकलीत मानसी नाईकचा खास अंदाज, हातभर चुड्याने वेधले लक्ष)

​मॉडर्न ब्रायडल लुक​

​मॉडर्न ब्रायडल लुक​

मानवीने आपले केस मोकळे ठेऊन त्यासह अत्यंत मिनिमल मेकअप केला आहे. नैसर्गिक मेकअपमुळे मानवीचे सौंदर्य अधिक आकर्षक दिसत आहे. इतकंच नाही तर लग्नाच्या आनंदामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमकही पाहायला मिळत आहे.

(वाचा – अरूंधतीचा वेगळाच मराठमोळा साज, पुरस्कार सोहळ्यासाठी शिवला लग्नातील साडीचा खास ड्रेस)

​कुमार वरूणचा साजेसा लुक ​

​कुमार वरूणचा साजेसा लुक ​

मानवीच्या ब्रायडल लुकला साजेसा असा लुक कुमार वरूणने केला होता. आयव्हरी शेरवानी आणि व्हाईट पँट त्यावर मोत्याचे दागिने असा रूबाबदार लुक होता. दोघांनीही एकमेकांकडे प्रेमाने पाहात दिलेली पोझ खूपच सुंदर दिसत आहे.

(वाचा – सिद्धार्थची कियारावरून नजरच हटेना, कियारा म्हणतेय काहीतरी वेगळी अशी विशेष होती ती रात्र)

​वॅलेंटाईनच्या दिवशी केली होती घोषणा​

​वॅलेंटाईनच्या दिवशी केली होती घोषणा​

आपण कुमार वरूणला डेट करत असल्याची घोषणा सोशल मीडियावर वॅलेंटाईनच्या दिवशी मानवीने केली होती. तर एकाच आठवड्यानंतर कोर्ट मॅरेज करत तिने आपल्या चाहत्यांना नक्कची सुखद धक्का दिला आहे. मानवीची ही फॅशन अत्यंत मनमोहक असून तिच्यावरून नजर हटत नाहीये.

हेही वाचा :  उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …

VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक …