खेड रेल्वे स्टेशनवर राडा, ट्रेनमधे चढण्यासाठी संघर्ष; कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल

Konkan Ganeshotsav : गणेशोत्सावसाठी कोकमात गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही प्रचंड हाल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर, रेल्वेही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गणपती स्पेशल ट्रेनही उशिराने धावत असल्याने हजारो प्रवासी खोळंबले आहेत. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा जोरदार राडा झाला. प्रवाशांनी एकमेकांना मारहाण केल्याची माहितीही समोर आली आहे.  

खेड रेल्वे स्टेशनवर राडा

खेड रेल्वे स्टेशनवर प्रवशांचा तुफान राडा झाला. प्रवाशांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोरल आलेय. ट्रेनमधे चढण्यासाठी प्रवाशांना मोठा संघर्ष करावा लागतोय. रिजर्वेशन डब्यात घुसण्यासाठी प्रवाशांमध्ये चढओढ पहायला मिळाली.  रेल्वे पोलिसांसमोर प्रवाशांमध्ये राडा झाला.  रेल्वे स्टेशनंवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांमध्ये बाचाबाचू होवून हाणामारी देखल झाली. रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिस देखील येथे दाखल झाले. 

ट्रेन पकडण्यासाठी कोकणातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी

पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय. मात्र, रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. ट्रेन पकडण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी मोठी गर्दी केलीय. कोकण कन्या, गणपती स्पेशल, तुतारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांमधून चाकरमानी परतीचा प्रवास करतायत. मात्र, गणपती स्पेशल 4 तास उशिरा तर तुतारी एक्स्प्रेस दीड तास उशिराने धावत असल्याने असल्याने रेल्वेचं टाईमटेबल बिघडलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बस स्थानके आणि रेल्वे स्थानके सध्या गर्दीने फुलून गेली आहेत. मात्र कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. 

हेही वाचा :  धर्माची भिंत तोडून सलमानच्या आई-वडिलांनी केले लग्न, सुशीलाच्या प्रेमासाठी सलीम खान झाले शंकर

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय. माणगावजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. लोणेरे, वडपाले इथेही वाहतूक कोंडी झालीय. कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. कोकणातील गणेशोत्सव आटोपून चाकरमानी परतीच्या मार्गावर आहेत, त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढलीय. त्यामुळे कोकणातून परतणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकलेत. 

पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर उसळला

पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आज गणेश भक्तांचा महासागर उसळलाय.  गौरी विसर्जनानंतर पुणेकर बाप्पाच्या दर्शनासाठी तसंच मंडळांचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यातच आज रविवारची सुट्टी आहे. हा योग साधत पुण्यासह पुण्याबाहेरचेही लोक गणपतीच्या दर्शनासाठी आले आहेत. त्यामुळे दगडूशेठ गणपती परिसरासह मध्यवर्ती पेठांमध्ये प्रचंड गर्दी झालीय. पावसाळी वातावरण असून देखील लोक मोठ्या संख्येने घराबाहेर बाहेर पडले आहेत.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Megablock: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 24 डब्यांच्या मेल एक्स्प्रेससाठी छत्रपती …

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा …