Breaking News

Kareena Kapoor ने पिंक साडीत केला कहर, ब्लाऊजची डिझाईन पाहून सर्वांनी श्वासच रोखला

Valentine Day च्या आठवड्यात लव्ह इन द एअर म्हणतं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये रॉयल पद्धतीने लग्न केले. आता काही दिवसांनी मुंबईत त्यांनी ग्रँड रिसेप्शन सोहळा ठेवला होता. या सोहळ्याला बॉलिवूडचे सगळे स्टार्स पाहायला मिळाले. या रिसेप्शनला बेबोने म्हणजेच करीना कपूरने साडीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतेल. या सुंदर शिमरी साडीमध्ये करीना खूपच छान दिसत होती. यावेळी करीनाच्या बॅकलेस ब्लाऊजने सर्वांचे लक्ष वेधून. तिचा हा लुक पाहून करीना दोन मुलांची आई आहे या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसणार नाही. तिच्या या फिगरसाठी करीना खूप मेहनत घेते. (फोटो सौजन्य :- योगेन शाह)

असा होता बेबोचा लुक

असा होता बेबोचा लुक

रिसेप्शनला बेबोने व्हाईट आणि पिंक रंगाची शिमरी पॅर्टनची साडी नेसली होती. या साडीवर सिल्वर रंगाचे नक्षी काम करण्यात आले होते. ताऱ्यांप्रमाणे चमकणाऱ्या या साडीमध्ये बेबो खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या भन्नाट लुकने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा :  नक्की कोण आहे ही? करिनाच्या कार्बन कॉपीचा 'नगाडा' गाण्यावर डान्स

(वाचा :- Kiara-Sid Reception : शिमरी ड्रेसमध्ये दिशा पटानीच्या काटाकिर्र अदा, चाहते म्हणतात ही तर उर्फी 2.0) ​

ब्लाऊजच्या डिझाईनने वेधले लक्ष

ब्लाऊजच्या डिझाईनने वेधले लक्ष

शिमरी पॅर्टनच्या सुंदर साडीवर बेबोने बॅकलेस ब्लाऊज परिधान केला होता. गोल नेकलाईन आणि स्लिव्हलेस असणाऱ्या या ब्लाऊजमध्ये बेबो खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या लुकसाठी नेटकरी तिला लेडी इन पिंक … बेबो मैं बेबो अशी कमेंट करत आहेत. एकंदरीत करीनाच्या चाहत्यांना तिचा हा लुक खूपच आवडला आहे.

(वाचा :- ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये मल्होत्रांच्या सुनेचा रॉयल अंदाज,कियाराच्या पाचूच्या दागिन्यांनी वेधले सर्वांचे लक्ष) ​

मेकअपने वाढवली शान

मेकअपने वाढवली शान

यावेळी बेबोने सिंपल पण ग्लॅसी असा मेकअप केला होता. तिच्या या मेकअपने तिच्या लुकला चारचाँद लागले होते. यावेळी मस्करा काजळ लावून तिने तिचा लुकपूर्ण केला. त्यातप्रमाणे तिने केसांचा अंबाडा घातला होता. तुम्ही देखील अशी साडी नेसणार असाल तर असा लुक कॅरी करु शकता.

अशी घेते स्वत:ची काळजी

मिनिमल दागिने वापरुन लुक केला पू्र्ण

मिनिमल दागिने वापरुन लुक केला पू्र्ण

या सुंदर संध्याकाळी बेबोने मिनिमल दागिने वापरुन तिचा लुक पूर्ण केला. यावेळी बेबोने कानामध्ये मोठे अफगाण कानातल्यांनी तिचा लुक पूर्ण केला. एखाद्या पार्टीला तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता.

हेही वाचा :  वहिणी अनिशाच्या डोहाळे जेवणाला अगदी नवाबी थाटात गेली करीना, पण भरजरी साडीतील आईसमोर पडली फिकी

(वाचा :- Bigg Boss फेम निक्की तंबोळीचा डीपनेक ब्लाऊजमध्ये जलवा, त्या एका गोष्टीने वेधून घेतले चाहत्यांचे लक्ष)

शिल्पाने दिली टक्कर

शिल्पाने दिली टक्कर

Kareena Kapoor च्या या लुकला शिल्पा शेट्टीने मजबूत टक्कर दिली आहे. यावेळी शिल्पाने सुद्धा शिमरी पॅर्टनची साडी परिधान केली होती. तर शिल्पाने ट्युब पॅर्टनमध्ये ब्लाऊज परिधान केला होता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे दरम्यान 28 मे ते 2 जूनपर्यंत अनेक ट्रेन रद्द होणार, वाचा संपूर्ण लिस्ट

Mumbai-Pune Train cancelled List: मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 28 …

‘मातोश्रीचे ‘लाचार श्री’ होणाऱ्यांची हकालपट्टी करा’, शिशिर शिंदेंच्या पत्राला कीर्तिकरांनी दिलं उत्तर, ‘कोणीतरी चुगली करणारं…’

Shishir Shinde Letter to Eknath Shinde:  शिवसेना उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी गजानन कीर्तिकर …