अरबाज खानमुळेच 19 वर्षांचा संसार संपवावा लागल्याची मलायका अरोराला खंत, समस्त पुरूष जातीला दिला एक प्रेमळ सल्ला

Malaika Arora ही बॉलिवूडची ती अभिनेत्री आहे जी चित्रपट न करता सुद्धा सर्वाधिक चर्चेत असते. Shahrukh Khan स्टार ‘दिल से’ मधील ‘चल छैया छैया’ या गाण्याने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती, तेव्हापासून ती नेहमी पेज थ्रीमध्ये असते. पण अनेकदा ती तिचा एक्स हजबंड Arbaaz khan आणि बॉयफ्रेंड Arjun Kapoor सोबतच्या नात्यामुळे सुद्धा चर्चेत असते. तुम्हाला देखील माहित असेलच की मलायका अरोराने लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये अरबाजपासून घटस्फोट घेतला होता.

असे करण्यामागचे कारण स्पष्ट करताना ती करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये म्हणाली होती की, ‘जेव्हा तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसाल, तेव्हा तुम्ही तुमच्या सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी वेगळा मार्ग निवडला पाहिजे आणि तुम्ही ते करू शकता. जर तुम्हाला वाटते की तुमची पत्नी सुद्धा तुमच्या बाबत हाच विचार करत असेल तर मलायकाने सांगितलेल्या या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे. (फोटो सौजन्य :- Instagram malaikaaroraofficial, weddingsutra, arbaazkhanofficial, iStock)

मलायकाने सर्व पतींना दिला हा सल्ला

मलायकाने सर्व पतींना दिला हा सल्ला

अलीकडेच मलायका अरोराने 7 व्या नॅशनल समिट ऑफ यंग इंडियन्स ‘टेक प्राइज 2023’ मध्ये सहभाग नोंदवला होता. ह्या कार्यक्रमात बोलताना तिने सर्व विवाहित पुरुषांना सल्ला दिला की, ‘मी येथे उपस्थित असलेल्या सर्व पतींना सांगू इच्छितो की, जर तुमची पत्नी तुमच्यासोबत असेल किंवा घरी तुमची वाट पाहत असेल तर तिच्याकडे जा. तिला पूर्ण आदर द्या कारण तुमची पत्नी तुमच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. जर तुमची पत्नी आनंदी असेल तर ती तुमचे जीवन सुधारण्यासाठी सर्व प्रकारे मदत करेल.” आज आम्ही तुम्हला सांगत आहोत 5 असे मार्ग ज्या माध्यमातून तुम्ही तुमचे तुटणारे नाते सांभाळू शकता.

हेही वाचा :  मलायकाच्या मॉर्निंग रूटीनमध्ये आहे या खास ड्रिंकचा समावेश, परफेक्ट फिगरसाठी रोज प्यावे

(वाचा :- Sleep Divorce: घटस्फोट घेण्याचा काळ गेला आताचे कपल्स घेतात थेट स्लीप डिवोर्स, संकल्पना ऐकून हलेल डोक्याची नस.!)​

आपल्या पार्टनरशी बोला

आपल्या पार्टनरशी बोला

कोणतेही नाते हे कम्युनिकेशन व संवादावर अवलंबून असते. जेवढा तुमच्या नात्यात संवाद असतो तेवढे तुमचे नाते अधिक घट्ट असते. जितका संवाद कमी तेवढे ते नाते कमकुवत समजले जाते. अशा वेळी जर तुमची पत्नी किंवा प्रियकर एखाद्या गोष्टीवर तुमच्यावर रागावत असेल तर त्यामागचे त्यान्हे कारण समजून घ्या. तुम्ही सुद्धा त्यांच्याशी थेट भांडायला जाऊ नका. ते तसेच आहेत असा विचार करून दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि पार्टनरच्या भावना समजून घ्या.

(वाचा :- मी बहिणीच्या लग्नात अप्सरेसारखी सजून पोहचली अन् समोर बघते तर काय..! ज्यामुळे आम्हा दोघींचं आयुष्य झालं बेचिराख)​

पार्टनरच्या प्रयत्नांची स्तुती करा

पार्टनरच्या प्रयत्नांची स्तुती करा

बहुतेक पती आपल्या पत्नीच्या प्रयत्नांचे कौतुक करणे आवश्यक मानत नाहीत. पतीची सेवा करणे हे पत्नीचे कर्तव्य आहे असे ते मानतात. यात पुरुषांचाही दोष नसला तरी आपल्या समाजात या गोष्टी लहानपणापासूनच मनात भरल्या जातात. पण ही चूक तुम्ही करू नका, जर तुमची पत्नी तुमच्यासाठी दिवसभर काम करत असेल तर तिच्या प्रयत्नांचे कौतुक करा. स्त्रियांना कौतुक केलं की खूप चांगलं वाटतं आणि त्यांना अधिक हुरूप येतो.

हेही वाचा :  मध्य रेल्वेची खास भेट; होळी स्पेशल 112 ट्रेन चालवणार

(वाचा :- जमिनीवर नको त्या अवस्थेत पडलेल्या पतीला बघून मी घाबरले व अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली,नंतर जे सत्य समजलं ते हादरवणारं)​

आपल्या पार्टनरचं म्हणणं मनापासून ऐकून घ्या

आपल्या पार्टनरचं म्हणणं मनापासून ऐकून घ्या

जर तुम्हाला सतत बडबड करायची सवय असेल तर तुम्ही पत्नी तुमच्या ह्या सवयीला कंटाळू शकते. व केवळ तुम्हीच बोलता म्हणून तुमच्यावर नाराज होऊ शकते. तिलाही बोलण्याची संधी द्या. आपले म्हणणे मांडू द्या. ती काही ससांगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बहुतेक बायका तक्रार करतात की त्यांचा पती त्यांचे म्हणणे ऐकतच नाही. तुम्हीही असे करत असाल तर नात्यात दुरावा आणि भांडण सुरू होण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचे ऐकणे सुरू करा, त्यांचे मत जाणून घ्या.

(वाचा :- लाखो हृदयांची क्रश Kiaraचं sidharth कडून पर्मनंट बुकिंग, ज्योतिषांकडून वैवाहिक जीवनाची उत्कंठावर्धक भविष्यवाणी)​

आपल्या चुकांची जबाबदारी घ्या

आपल्या चुकांची जबाबदारी घ्या

कोणतेही नाते तुटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या कृती आणि चुकांची जबाबदारी न घेणे. समोरच्या व्यक्तीला दोष देणे. पण विश्वास ठेवा, ज्या दिवसापासून तुम्ही तुमच्या चुकांची आणि कृत्यांची जबाबदारी घेण्यास सुरुवात कराल, तेव्हापासून तुमचे नाते केवळ तुमच्या जोडीदारासोबतच नाही तर सर्वांसोबत सुधारण्यास सुरुवात होईल. तुम्ही एक उत्तम व्यक्ती म्हणून गणले जाल. जो व्यक्ती वादापेक्षा वाद संपवण्यावर भर देतो त्याला अधिक आदर मिळतो हे लक्षात ठेवा.

हेही वाचा :  अरबाज आणि मलायकाच्या नात्यात या कारणाने आला दुरावा

(वाचा :- आयुष्यात सर्वच वाईट व निगेटिव्ह लोक भेटतात म्हणून आहात चिंतीत? मग असं होण्यामागची ही कारणं तुम्हाला माहितच हवी)​

नात्यांतील समस्यांवर लक्ष द्या

नात्यांतील समस्यांवर लक्ष द्या

पुरुष आपल्या पत्नीच्या तक्रारींना अनावश्यक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की काही दिवसात सर्वकाही स्वतःहून ठीक होईल. पण जेव्हा तुम्ही असे काही करता तेव्हा तुम्ही स्वत:च तुमचे नाते बिघडवण्याकडे पहिले पाऊल टाकता. त्यामुळे ही सवय सोडून द्या आणि पुढच्या वेळी जेव्हा तुमचा पार्टनर काही बोलेल तेव्हा ते समजून घ्या आणि एकत्र समस्या सोडवा.

(वाचा :- गडगंज श्रीमंत अंबानी घराण्याची सून होण्यासाठी श्लोका व राधिकाने दिल्या या परीक्षा, मगच मिळाली कुटुंबात एंट्री)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर… अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज

Ajit Pawar vs Anjali Damania:  पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री …

पुणे अपघात प्रकरणात पोराला वाचवण्यासाठी बापाचे प्रताप, 2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स

Pune Porsche Accident : 19 मे 2024… पुण्याच्या कल्याणीनगर भागात पोर्श कार दोघांना चिरडते. या …