खिलाडी कुमारचा ‘Selfiee’ सुपरफ्लॉप!; जाणून घ्या कमाई…

Akshay Kumar Selfiee Box Office Collection : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाशमीचा (Emraan Hashmi) ‘सेल्फी’ (Selfiee) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाची कथा आणि कलाकारांपेक्षा सिनेमा सुपरफ्लॉप झाल्यामुळे चर्चेत आहे. ‘सेल्फी’ या सिनेमाकडून खिलाडी कुमारच्या चाहत्यांची खूप अपेक्षा होती. पण बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. 

‘सेल्फी’ बॉक्स ऑफिस कलेक्शन (Selfiee Box Office Collection) 

‘सेल्फी’ हा बहुचर्चित सिनेमा 24 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने फक्त 3.13 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 1.30 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 1.80 कोटींची कमाई केली आहे. ‘सेल्फी’ हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत होता. पण आता या सिनेमाच्या कमाईचे आकडे खूपच निराशाजनक असल्याचं दिसत आहे. 


‘सेल्फी’ या सिनेमाचं दिग्दर्शन राज मेहताने केलं आहे. राजने याआधी अक्षयसोबत ‘गुड न्यूज’ या सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा 2019 साली सुपरहिट ठरला होता. त्यामुळे ‘सेल्फी’ प्रदर्शित होण्याआधी राज मेहता आणि खिलाडी कुमारची जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करेल असे म्हटले जात होते. पण तसे काहीही घडलेले नाही. या सिनेमाकडे सिनेरसिकांनी आणि अक्षयच्या चाहत्यांनी पाठ फिरवली आहे. 

हेही वाचा :  'हर हर महादेव' बाबत राज ठाकरेंचे मनसेच्या प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश

‘सेल्फी’ या सिनेमाचं कथानक काय? (Selfiee Movie Story) 

‘सेल्फी’ या सिनेमात अक्षय कुमार सुपरस्टार विजय कुमारच्या भूमिकेत आहे. तर इमरान हाशमीने त्याच्या चाहत्याची भूमिका साकारली आहे. सेलिब्रिटीसोबत एक सेल्फी मिळवण्यासाठी वेड्या झालेल्या एका चाहत्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. इमरान हाशमी हा आरटीओ ऑफिसर असून तो अडचणीत सापडलेल्या अक्षय कुमारची म्हणजेच विजय कुमारची कशी मदत करतो याचा गंमतीशीर प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे. पण त्यानंतरही विजय चाहत्याला एक ‘सेल्फी’ देतो का हे प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमात अक्षय आणि इमरानसह नुसरत भरुचा आणि डायना पेंटीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राज मेहताने या सिनेमात दिग्दर्शन केलं असून करण जौहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

संबंधित बातम्या

Selfiee Box Office Collection : अरेरे! अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ रिलीजच्या पहिल्याच दिवशी सुपरफ्लॉप; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …