Teddy Day 2023: मुलींना आवडतात ‘या’ रंगांचे टेडी, नातं टिकवण्यासाठी रंगाचे महत्त्व जाणून घ्या

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जातो. आपल्या भावना आपल्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ मानला जातो. व्हॅलेंटाईन्स वीकमधील Valentines Week टेडी डे Teddy Day हा खास एकमेकांना टेडी गिफ्ट करण्यासाठी साजरा केला जातो. पाश्चात्य देशातील साजरे होणारे हे दिवस आज काल भारतामध्ये देखील मोठ्याप्रमाणात साजरे होतात. आज टेडी डे साजरा करण्यात येतो. अशा परिस्थिती तुम्ही तुमच्या जोडीदाराला कोणत्या रंगाचा टेडी देता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रंग आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जाणून घेऊयात तुमच्या जोडीदाराला तुम्ही कोणत्या रंगाचा टेडी गिफ्ट कराल. (फोटो सौजन्य :- Istock)

गुलाबी रंगाचा टेडी

गुलाबी रंगाचा टेडी

मुलींना गुलाबी रंग आवडतो असे म्हटलं जाते. गुलाबी रंगातच अनेक शेड तुम्हाला मिळू शकतात. गुलाबी रंग रोमान्स आणि प्रेम दर्शविण्यासाठी वापरण्यात येतो. गुलाबी रंगाचा टेडीमुळे जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल भावना निर्माण होऊ शकता.

(वाचा :- कौटुंबिक हिंसाचार अन् घटस्फोटाची कोर्ट केस; संकटांवर मात करून Shivangi Goyal बनल्या IAS)​

हेही वाचा :  पाडलं, फोडलं...तरी येणार भाजपच! महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फोडल्याचा फायदा होणार?

लाल रंगाचा टेडी

लाल रंगाचा टेडी

लाल रंग हा प्रेमाचे प्रतिक मानला जातो. त्यामुळे तुमचे तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम असेल तर तुम्ही त्याला लाल रंगाचा टेडी गिफ्ट करू शकता. यामुळे ती व्यक्ती तुमच्यावर खूश तर होईलच पण तुमचे प्रेम देखील वाढण्यास मदत होईल.

पांढऱ्या रंगाचा टेडी

पांढऱ्या रंगाचा टेडी

पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक मानला जातो. जर तुमचा जोडीदार तुमच्यावर रागवला असेल तर तु्म्ही त्याला पांढऱ्या रंगाचा टेडी गिफ्ट करु शकता. तुमचे नाते किती खरे आणि अतूट आहे हे दर्शवण्यासाठी तुम्ही पांढऱ्या रंगाचा टेडी गिफ्ट करु शकता. या रंगाच्या टेडीमुळे तुमच्या नात्यात विश्वास निर्माण होऊ शकतो.

(वाचा :- प्रिया बापटने घेतली उमेशच्या प्रेमाची सत्वपरीक्षा, शून्य डिग्री तापमानात केलं असं काही की तुम्हीही हैराण व्हाल) ​

चॉकलेटी रंगाचा टेडी

चॉकलेटी रंगाचा टेडी

Teddy म्हटलं की आपल्यासमोर फक्त चॉकलेटी रंगाचा टेडी येतो. पण चॉकलेटी रंगाचा टेडी समोरचा व्यक्ती आपल्यावर नाराज आहे असे दर्शवतो. त्यामुळे जर तुम्ही जोडीदाराल चॉकलेटी रंगाचा टेडी गिफ्ट म्हणून देणार असाला तर दोनवेळी नक्की विचार करा.

(वाचा :- कोणी गोंदवलं हातावर नाव तर कोणी प्रेमासाठी धर्मच बदलला, बॉलिवूड स्टार्सनी जोडीदारांना भन्नाट स्टाईलमध्ये केलं propose)​

हेही वाचा :  व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय पण तुमचा जोडीदार सतत ex बद्दल बोलत राहतो? चिडचिड करु नका अशा प्रकारे करा हॅंडल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …