Eknath Shinde Birthday: अमेरिकेतील Times Square वर शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर्स; Unstoppable CM असा उल्लेख

CM Eknath Shinde Birthday Supports Banners At New York Times Square: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस (CM Eknath Shinde Birthday). मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच वाढदिवस. जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीपासून फारकत घेत शिंदेंनी भाजपाबरोबर राज्यात नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. देशभरातील प्रसारमाध्यमांबरोबरच परदेशातील प्रसारमाध्यमांनीही या घडामोडींची दखल घेतली.

टाइम्स स्वेअरवर बॅनर

मुख्यमंत्री शिंदेंनी अनेकदा जाहीर भाषणांमध्ये 33 देशांनी आपल्या बंडाची दखल घेतल्याचा दावाही केला. यावरुन शिंदेंच्या विरोधकांनी त्यांना टोलेही लगावले. शिंदेंच्या बंडाची आंतरारष्ट्रीय दखल सुद्धा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या वादाची चर्चा ठरल्याचं पहायला मिळालं असतानाच शिंदेंचा मुख्यमंत्री म्हणून पहिला बर्थ डे थेट अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील जगप्रसिद्ध टाइम्स स्वेअरवर साजरा करण्यात आला.

कोणी झळकावलं हे बॅनर

अमेरिकेत राहाणाऱ्या काही भारतीय तरुणांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स थेट टाइम्स स्वेअरमध्ये झळकावल्याचं पहायला मिळालं. युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य नितील लांडगेंच्या पुढाकाराने थेट अमेरिकेमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवर ‘हॅपी बर्थ डे अनस्टॉपेबल सीएम… एकनाथ शिंदे साहेब’ अशा ओळी लिहिण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023: शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प; विरोधक आक्रमक तर सत्ताधारीही प्रतिहल्ल्याच्या तयारीत

शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त छापलेले विशेष बॅनर टाइम्स स्वेअरमधील ग्रॅण्ड सेंट्रल परिसरामध्ये झळकावण्यात आले. या बॅनर्सचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर तयार करून ते टाईम्स स्क्वेअर आणि ग्रँण्ड सेंट्रल येथे झळकवण्यात आले.

फडणवीसांनी घरी जाऊन घेतली भेट

राज्याच्या वेगवगेळ्या भागांमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे येथील निवासस्थानी गेले होते. फडणवीस यांनी फोटो पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली होती. 

चांदीचा धनुष्यबाण

शिंदे यांना ओवळा-माजीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी चांदीचा धनुष्यबाण भेट दिला. एकीकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं यासंदर्भातील लढाई सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि निवडणूक आयोगासमोर सुरु असतानाच दुसरीकडे सरनाईक यांनी अशी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणेकरांना कोपरी पूलाचं उद्घाटन करुन एक अनोखी भेट दिली. कोपरी पुलामुळे ठाण्यातून मुंबईत येणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. 

हेही वाचा :  शरद पवारांचं CM शिंदे, फडणवीस, अजित पवारांना पत्र! केंद्राच्या अहवालाचा उल्लेख करत म्हणाले, "महाराष्ट्राच्या..."



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut on Friday : उन्हाचा तडाखा वाढत असताना आता पुणेकरांच्या नळाचं पाणी गूल …

EVM ठेवलेल्या गोदामात घुसखोरी! ट्रीपल लेअर सिक्योरिटी भेदत प्रवेश; समोर आला धक्कादायक Video

EVM Godown CCTV Tampering Attempt Video: लोकसभेच्या निवडणुकीतील पाचव्या टप्प्यामध्ये ईव्हीएम मशीनमधील गोंधळ आणि संथ गतीने …