Shraddha Murder Case : हत्या ते पुरावे मिटवण्यापर्यंत संपूर्ण घटनेचा अखेर उलगडा, अंगावर शहारे आणणारी कहाणी

Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणातील चार्जशीटमधून (Charge Sheet) आरोपी आफताब पुनावालाचे (aftab amin poonawalla) काळे कारनामे समोर येत आहेत. हत्येपासून पुरावे मिटवण्यापर्यंतची संपूर्ण घटनेचा पोलिसांनी उलगडा केला आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने प्लॅटच्या बाथरुममध्ये मृतदेहाचे तुकडे केले. रक्ताचे डाग नष्ट करण्यासाठी आफताबने काही सामान ऑनालाइन शॉपिंग (Online Shopping) केली होती.

18 मे 2022
या दिवशी श्रद्धा आपल्या गुरुग्राममधल्या (Gurugram) मित्राला भेटून पुन्हा आपल्या छतरपुर इथल्या घरी परतली. यावेळी आफताबने श्रद्धाला तिच्याकडे नव्या मित्राबद्दल चौकशी केली. यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर काही काळ वातावरण शांत होतं, दोघांनी बाहेरुन जेवण मागवलं. जेवण झाल्यानंतर श्रद्धाने आफताबला वसईला (Vasai) जाण्याबाबत विचारणा केली. वसईच्या घरात असलेलं काही सामान त्यांना दिल्लीला आणायचं होतं. मुंबईला जाण्यासाठी आफताबंच तिकिटही बूक करण्यात आलं. पण तब्येत ठिक नसल्याचं सांगत आफताबने मुंबईला जाणं टाळलं.

याच गोष्टीवरुन दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं. संतापाच्या भरात आफताबने श्रद्धाला जमिनीवर आपटलं आणि दोन्ही हातांनी तिचा गळा दाबला. यातच श्रद्धा हिचा मृत्यू झाला. श्रद्धाची काहीच हालचाल होत नसल्याने आफताब घाबरला. त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट आखला. 

हेही वाचा :  पतीने दिवसरात्र मुलीच्या शरिराचे लचके तोडले, पत्नीने दिल्या गर्भनविरोधक गोळ्या; दिल्लीतील उच्चभ्रू दांपत्याचं कृत्य

1200 रुपयात बॅग विकत घेतली
मृतदेह एका मोठ्या बॅगेत टाकून ती बॅग हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) जाऊन फेकायची असा कट सुरुवातीला आफताबने रचला होता. यासाठी त्याने 1200 रुपयांत काळ्या रंगाची एक बॅग विकत घेतली. हिमाचलला जाण्यासाठी त्याने एका ट्रॅव्हल एजंटकडे कार बुक करण्याबाबतची माहिती घेतली. पण रस्त्यात ठिक-ठिकाणी तपासणी झाली तर अडचणीत येऊ असा विचार करुन आफताबने तो प्लान रद्द केला.

श्रद्धा मृतदेह त्याने बाथरुममध्ये लपवला. हिमाचलचा प्लान रद्द केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करण्याचं ठरवलं. म्हणजे ते बॅगमध्ये टाकून फेकणं सोपं होईल, असा त्याने विचार केला. यासाठी त्याने एक करवत आणि तीन ब्लेड विकत घेतले. त्यानंतर त्याच रात्री त्याने श्रद्धाच्या हाताचे तुकडे केरत ते पॉलिथीन बॅगेत टाकले. पण यादरम्यान भरपूर रस्त सांडलं. 

19 मे 2022
हत्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मे रोजी त्याने छतरपूर इथून कचऱ्याची पिशवी, एक चाकू आणि एक चॉपर विकत घेतला. त्यानंतरत्याने छतरपूरमधल्याच एका दुकानात नवा कोरो फ्रीज विकत घेतला. सिटी बँक क्रेडिट कार्डवरुन यासाठी त्याने 25 रुपये चुकते केले. दुकानदाराने 19 मे रोजीच संध्याकाळी फ्रिज त्याच्या घकी पाठवला.

हेही वाचा :  Navy Recruitment Notification Out: नौदलात 1500 पदांच्या भरतीची अधिसूचना जारी, या तारखेपासून 10वी पास करु शकतात अर्ज

ऑनलाईन मागवलं साफसफाईचं सामान
फ्रिज घरी आल्यानंतर आफताबने श्रद्धाच्या पायांचे तुकडे केले आणि ते कचऱ्याच्या पिशवीत ठेवले. मृतदेहाचे तुकडे करताना भरपूर रक्त साडलं. रक्ताचे डाग मिटवण्यासाठी त्याने हार्पिकक टॉयलेट  क्लिनरच्या दोन बाटल्या, ब्लिचिंग पाऊडर, एक चॉपिंग बोर्ड, ग्लास क्लिनरच्या दोन बाटल्या आणि एक गोदरेज हँडवॉशची ऑनलाईन ऑर्डर केली. याचं बिलही त्याने सिटी बँक क्रेडिट कार्डमार्फत भरलं. 19 मेरोजी रात्री उशीरा सर्व सामान आल्यावर त्याने बाथरुन स्वच्छ केलं.

20 मे 2022
श्रद्धाच्या हत्येनंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 20 मे रोजी आफताबने महरौली मार्केटमधून लाल रंगाची एक मोठी बॅग विकत घेतली. यासाठी त्याने गुगल पेवरुन दोन हजार रुपये दिले. या बॅगेत मृतदेहाचे तुकडे टाकून ती बॅग फेकण्याच्या तो विचार होता. पण बॅग मोठी आणि वजनदार असल्याने पकडले जाऊ याची त्याला भीती वाटली. त्यानंतर त्याने आपला इरादा बदलला. त्याने मृतदेहाचे आणखी छोटे तुकडे करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे ते कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये टाकून वेगवेगळ्या ठिकाणी टाकता येतील.

मृतदेहांच्या तुकड्याची विल्हेवाट
हत्येच्या तिसऱ्या दिवशी आफताबने श्रद्धाचा मृतेदहाचे आणखी छोटे तुकडे केले. ते सर्व त्याने वेगवेगळ्या पॉलिथीन बॅगमध्ये टाकले. श्रद्धाच्या हाताची बोटं त्याने ब्लो टॉर्चने जाळली आणि रस्त्याच्या कडेला फेकून दिली. काही तुकडे त्याने घरापासून काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीजवळच्या नाल्यात फेकले. काह तुकडे उत्तर-पूर्व एनक्लेव्हच्या मागे जंगलात फेकले. तर काही तुकडे एमजी रोडवरच्या रेड लाईट परिसराजवळ टाकले.

हेही वाचा :  आईच्या प्रियकरानेच केला बलात्कार, घरी एकटी असताना गाठलं अन् धमकावत...; कुटुंब हादरलं

हाडांची अशी लावली विल्हेवाट
मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकल्यानंतर हाडांचं काय करायचं असा प्रश्न त्याला पडला. हाडं सापडली तर आपण पकडले जाऊ याची त्याला कल्पना होती. त्यामुळे त्याने आधी हाडं जाळली त्यानंतर मार्बल घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्राइंडरने त्या हाडांची पावडर केली. ती पावडर त्याने शंभर फूट रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी टाकली.

सप्टेंबर 2022
श्रद्धाच्या हत्येला तीन ते चार महिने उलटून गेले होते. पण श्रद्धाचं शिर आणि धड अजूनही त्याच्या फ्रिजमध्ये ठेवलं होतं. अखेर सप्टेंबर महिन्यात त्याने ब्लो टॉर्चने श्रद्धाचा चेहरा जाळला आणि केस कापून टाकले. त्यानंतर धड तो मेहरौली जंगलात फेकून आला. तर श्रद्धाचे कपडे आणि केस छतरपूर डोंगरावरील कचरापेटीत टाकले. म्हणजे श्रद्धाच्या हत्येनंतर तब्बल चार महिने आफताब तिच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …