सत्यजित तांबेंचं लेकीकडून कौतुक, बाप-लेकीचं नातं असावं तर असं

नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदार शुभांगी पाटील यांना थेट लढत देत विजय पटकावला आहे. या विजयानंतर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना लेकीच्या मोजक्या शब्दांनी बापाची छाती फुलून आली आहे.

सत्यजित तांबे यांची मुलगी अहिल्या तांबे हिने विजयानंतर संपूर्ण मीडियासमोर वडिलांच कौतुक केलं आहे. या व्हिडीओनंतर बाप आणि लेक यांच्यातील घट्ट नातं दिसून येतं. तुम्हालाही तुमच्या मुलीसोबत इतकं स्पेशल आणि घट्ट नातं तयार करायचं असेल. तर काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. (फोटो सौजन्य – Satyajeet Tambe / iStock)

काय म्हणाली अहिल्या

काय म्हणाली अहिल्या

अहिल्या तांबेने वडिल सत्यजित तांबे यांचं भरभरून कौतुक केलं आहे. मी खूप खूष आहे.. I am very Proud Of Baba… मला माझ्या बाबाचा अभिमान आहे. माझा बाबा खूप चांगलं काम करणार, असा विश्वास अहिल्याने आपल्या वडिलांबद्दल शेअर केला.

हेही वाचा :  तुम्ही आणि उद्धव ठाकरे युती करणार का? राज ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले "महाराष्ट्राची स्थिती पाहता..."

(वाचा – पायलट लेकीने वडिलांचा आशिर्वाद घेत उडवलं विमान, तरूणीच्या व्हिडीओने सगळ्यांचेच पाणावले डोळे)​

सत्यजित तांबे यांचं गोड कौतुक

सत्यजित तांबेंसाठी खास शब्द

सत्यजित तांबेंसाठी खास शब्द

बाप-लेकीचं नातं हे कायमच खास असतं. या नात्याला अगदी जुना इतिहास आहे. लेकीला बापाच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक असतं. तर बापालाही लेकीकडून मिळालेल दोन गोड शब्द हे अतिशय खास असतात. आतापर्यंत सत्यजित तांबेचे अनेकांनी कौतुक केले. पण अहिल्याकडून झालेलं हे कौतुक त्यांच्यासाठी खास असेल.

​ (वाचा – मुलगीच हवी होती मला…सोनाली कुलकर्णीने उलघडलं मायलेकीच्या नात्यातील गुपित)​

लेकीसोबत घालवा खास क्षण

लेकीसोबत घालवा खास क्षण

लेकीचा बापाकडून त्याचा वेळ हवा असतो. आपण पाहतो कामानिमित्त अनेकदा वडील घराबाहेर असतात. अशावेळी फार कमी भेटणारा बाबा लेकीला हवाहवासा वाटतो. त्यामुळे मुलीसोबत प्रत्येक बापाने खास क्षण घालवावा.

​(वाचा – पुण्यातील शिवन्या जन्माच्यावेळी अवघ्या ४०० ग्रॅमची, डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण पुढे जे घडलं तो एक चमत्कारच)​

बापाने आणलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक

बापाने आणलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक

लेकीला बापाने आणलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक असते. मग वडिलांनी आणलेली एखादी छोटी गोष्ट का असेना. म्हणून वडिलांनी देखील मुलीला छोट्या छोट्या गोष्टी गिफ्ट्सच्या रुपात द्याव्यात. मग एखादं पुस्तक किंवा छान बार्बी डॉल. यामुळे तुमचं आणि मुलीचं नातं बघा कसं बदलतं.

हेही वाचा :  Nashik News : आयकर विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई

(वाचा – याचसाठी मुली बाबासाठी असतात खास, लेकीने वडिलांना वाढदिवसाला दिलं सगळ्यात भारी गिफ्ट, तुम्हीलाही येईल गहिवरून)

मुलीसाठी बाबा असतो ‘सुपरहिरो’

मुलीसाठी बाबा असतो सुपरहिरो

मुलीसाठी तिचा बाबा हा जगातील सर्वात मोठा व्यक्ती असतो. ज्याला सर्व काही येत, आपल्यासाठी तो काहीही करू शकतो, हा विश्वास मुलींना असतो. अशावेळी वडील म्हणून जबाबदारी वाढते. मुलगी तुम्हाला बघत असते तेव्हा तुम्ही तिच्याशी कसे वागता हे महत्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही सांभाळून शब्द वापरणे गरजेचे असते.

(वाचा – मुलांना नम्रपणा शिकवायचा असेल तर सुधा मूर्तींनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा)​

बाबाने मुलीला शिकवाव्यात खास गोष्टी

बाबाने मुलीला शिकवाव्यात खास गोष्टी

लहान मुलं घरी असलं की, ते घरच्या लोकांनाच पाहून शिकत असतं. अशावेळी तिला एखादी खास पद्धत शिकवायची असेल तर त्याची जबाबदारी बाबाने घ्यावी. कारण बाबाचे शब्द लेकीसाठी खास असतात. बाबाने मुलीला काही नियम लावावेत, जसे की, मोबाईलची वेळ, खेळण्याची वेळ किंवा अनोळखी व्यक्तींशी बोलू नये, यासारख्या….

(वाचा – CBSE, ICSE आणि IB यापैकी कोणत्या बोर्डच्या शाळेत मुलांना प्रवेश घ्यायचा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर)​

बाबाने राहावं सोबत

बाबाने राहावं सोबत

बाबा-लेकीचं नातं ती वयात येईपर्यंत खास असतं. पण एकदा का मुलगी वयात आली की, बाबा आपसूकच लेकीपासून लांब जातो. असं न करता वडिलांनी तिच्या त्या दिवसांमध्येही खंबीरपणे सोबत राहावं. कारण वडील हा तिच्या आयुष्यात येणारा पहिला पुरूष असतो.

हेही वाचा :  Weather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट; ‘इथं’ अनपेक्षित गारठा, राज्यापासून मान्सून किती दूर?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानात मोठे चढ- उतार …

मी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर… अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज

Ajit Pawar vs Anjali Damania:  पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री …