या 3 चुकांमुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी होतं विषारी, पिताच सर्व अवयवांत पसरतात अनेक रोग व होतात भयंकर वेदना

तांब्याच्या भांड्यात (Copper Water) ठेवलेले पाणी शरीरासाठी एखाद्या औषधासारखे काम करते. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांत हे पाणी अमृत ठरते, कारण तांब्याचा गुणधर्म गरम असतो. यामुळे शरीराला ऊब मिळण्यासोबतच ऊर्जा, हलकेपणा आणि ताजेपणा जाणवतो. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती मजबूत होते. याशिवाय वजन कमी करणे, सांधेदुखी, कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर यावरही हे पाणी फायदेशीर आहे.

पण हे सर्व फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर करता. न्युट्रिशनिस्ट किरण कुकरेजा सांगतात की, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शरीरासाठी तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर कराल. अशा परिस्थितीत तांब्याच्या भांड्यात किंवा बाटलीतील पाणी पिताना या 3 प्रकारच्या चुका टाळणे आवश्यक आहे. अन्यथा, शरीरात वेदनांसह अनेक गंभीर आजार वाढण्याचा धोका असतो. (फोटो सौजन्य :- istock, pexels.com)

तांब्याच्या भांड्यात पाणी पिताना करू नका या चुका

हेही वाचा :  नेटची काळीभोर साडी,हि-यांची भरजरी नक्षी,ऑफशोल्डर ब्लाऊज,काळीकुट्ट नेलपेंट,हुमा कुरेशीचंं मंत्रमुग्ध करणारं रूप

दिवसभर तांब्याच्या बॉटलमधील पाणी पिणे

दिवसभर तांब्याच्या बॉटलमधील पाणी पिणे

जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बाटलीत किंवा भांड्यात ठेवलेले पाणी पीत असाल तर तुमच्या शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते. यामुळे लिव्हर आणि किडनी निकामी होण्याच्या धोक्यासोबतच गंभीर मळमळ, चक्कर येणे, पोटात दुखणे या समस्या देखील होऊ शकतात.

(वाचा :- पोट, मांड्या, कंबरेची चरबी झटक्यात जाईल जळून, फॉलो करा एक्सपर्टने सांगितलेला 7 दिवसांचा Weight Loss Diet Plan)​

तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले पाणी पिणे

तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले पाणी पिणे

हे अगदी खरे आहे की सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले हे पाणी प्यायल्यावर ते विषासारखे काम करते. वास्तविक, लिंबूमध्ये आढळणारे अॅसिड तांब्यासोबत मिक्स होऊन शरीरात अॅसिड तयार होते, ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलट्या होण्याचा धोका असतो.

(वाचा :- व्यायाम व योग करण्याआधी चुकूनही करू नका ही 3 कामे, मजबूत होणं सोडाच शरीराचा सांगडा बनवतील या भयंकर चुका..!)​

तांब्याचे भांडे किंवा बॉटल रोज धुणे

तांब्याचे भांडे किंवा बॉटल रोज धुणे

तांब्याची भांडी नियमित धुवू नयेत. ही भांडी दररोज धुतल्याने त्यातील फायदेशीर किंवा आरोग्यासाठी उपयुक्त असणारे गुणधर्म कमी होऊ लागतात. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि महिन्यातून एकदा मीठ आणि लिंबू वापरून पूर्णपणे स्वच्छ करा.

हेही वाचा :  'जिंकलेल्या जागेवर बोलायचं नाही', संजय राऊतांनी काँग्रेसला स्पष्ट सांगितलं, 23 जागा लढण्यावर ठाम

(वाचा :- हे 5 पदार्थ करतात इम्युनिटी लोखंडाइतकी मजबूत, कोरोना ते कॅन्सर कोणताच भयंकर आजार करू शकणार नाही शरीरावर हल्ला)​

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानंतर

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानंतर

या भांड्यात साठवलेले पाणी खूप उपयुक्त असले तरीही ते प्यायल्यानंतर काही गोष्टींची खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक असते नाहीतरी पचनाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानंतर शक्यतो अर्धा तास दूध किंवा चहा पिऊ नये.

(वाचा :- Sinus Remedy : सायनस इनफेक्शनमध्ये दिसतात ही भयंकर व वेदनादायी लक्षणं, नाक मोकळं करण्यासाठी घरीच करा हा 1 उपाय)​

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे

पोटाचे विकार दूर होतात
पोटाचे कोणतेही विकार झाल्यास तांबाच्या भांड्यातील पाणी प्यावे. अतिसार, जळजळ असे रोग निर्माण करणारे जीवाणू तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यानं नष्ट होतात. पोटदुखी,गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्टताही दूर होते. यकृत आणि मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होते.

संधिवातासाठी उपयोगी

तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते. तसंच, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळं शरीरातील युरिक अॅसिड कमी होते. त्यामुळं संधिवाताची समस्या दूर होते.

हेही वाचा :  Coronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना

त्वचाविकार दूर होतात!
दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर फोड्या, तारुण्यपीटिका वा सुरकुत्या पडत नाहीत. त्यामुळं सैांदर्य टिकण्यास मदत होते.
वजन नियंत्रित राहते!
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल व अ‍ॅंटीव्हायरल असल्याने जखम भरण्यास मदत होते.
(वाचा :- सडलेल्या व विष भरलेल्या लिव्हरला पुन्हा जिवंत करतात हे 5 पदार्थ, लिव्हर फुटण्याआधी करा डॉक्टरांचे हे सोपे उपाय)​
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …