Google Layoffs: उमेदवाराची मुलाखत घेत असताना गुगलच्या HR ला नोकरीवरुन काढलं

Google HR loses job while interviewing candidate: गुगलने सुरु केलेल्या कर्मचारी कपातीचा (Google Layoffs 2023) फटका जगभरातील 12 हजार गुगल कर्मचाऱ्यांना बसला आहे. अगदी सरळ सांगायचं झाल्यास गुगलमध्ये (Google) काम करणारे 12 हजार लोक बेरोजगार झाले आहेत. नोकरी गेलेल्या अनेकांनी तर आम्हाला यासंदर्भातील कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती असं म्हटलं आहे. एका कर्मचाऱ्याने तर लॉगइन होत नाही अकाऊंट यासंदर्भात आयटी विभागाला कॉल केला असता त्याला कमावरुन काढून टाकण्यात आल्याचं समजलं. असाच काहीसा प्रकार गुगलच्या एका ह्युमन रिसोर्स पर्सन (Google HR) म्हणजेच एचआरबरोबर घडला. कंपनीसाठी एका उमेदवारीची मुलाखत घेत असतानाच एचआरचा फोन कट झाला. त्यानंतर त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा जॉब गेल्याचं त्याच्या लक्षात आलं. गुगलने आपल्या कर्मचारी कपातीसंदर्भात इतकी गुपत्ता पाळली होती की एचआर विभागातील अनेकांना या कर्मचारी कपातीबद्दलची माहिती नव्हती.

नेमकं घडलं काय?

डॅन लॅनिंगन-रेयान असं या नोकरी गेलेल्या एचआरचं नावं आहे. ‘बिझनेस इनसायडर’ला त्याने स्वत:बरोबर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. एका उमेदवाराची मुलाखत घेताना माझा कॉल कट झाला. त्यानंतर कंपनीच्या इंटरनल वेबसाईटवरुन मी या उमेदवाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र हा कॉल लागलाच नाही, असं रेयानने सांगितलं. शुक्रवारी हा सारा प्रकार घडला. अशाप्रकारे कनेक्शन होऊ शकत नसल्याची अडचण केवळ रेयानलाच येत होती असं नाही. त्याच्या टीममधील अनेकजणांची कंपनीची अकाऊंट काम सुरु असताना अचानक लॉग आऊट झाली. या टीमच्या मॅनेजरला हा टेक्निकल इश्यू असल्याचं वाटलं. मात्र ईमेलवरुन त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याचं कळवलं.

हेही वाचा :  Russia Ukraine War : युद्धभूमीत युक्रेनच्या महिला सैनिकाचा अखेरचा श्वास; कुटुंबीय पार्थिवाच्या प्रतीक्षेत

बातम्यांमध्ये कळलं की…

कंपनीच्या वेबसाईटवरुन सुरु असणारा कॉल कट झाल्यानंतर रेयॉनला कंपनीने दिलेला इमेल आयडीही बंद झाला. “माला सगळीकडून ब्लॉक करण्यात आलं. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी बातम्यांना पाहिलं की गुगलने 12 हजार जणांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे,” असं रेयान म्हणाला.

नक्की वाचा >> महिला बॉसने केली शरीरसुखाची मागणी, नकार दिल्यानंतर…; Google च्या कर्मचाऱ्याचा आरोप

सोशल मीडियावर लिहिली पोस्ट

रेयानने त्याला आलेल्या अनुभवासंदर्भातील एक सविस्तर पोस्ट ‘लिंक्डइन’वर लिहिली आहे. गुगल ही माझी ड्रीम कंपनी होती. घरी निवांत बसलेलो असतानाच मला वर्षभरापूर्वी गुगलची ऑफर आली होती, असं रेयानने पोस्टमध्ये म्हटलं आहे. वर्षभरामध्येच रेयानचं हे स्वप्न नोकरी गेल्याने भंग पावलं. 

असं संपेल हे असा विचार केला नव्हता

“मला हे सारं असं अचानक संपेल असं वाटलं नव्हतं. कॉल सुरु असताना अचानक लॉगआऊट होणं हे धक्कादायक आहे. माझा करार एका वर्षांसाठी वाढवण्यात आला होता. मला क्लाऊड सेल्स रिक्युटमेंट टीममध्ये हलवण्यात आलं होतं. आठवड्याभरापूर्वी पगारवाढीची चर्चा झाली होती. मला अचानक हा धक्का बसला आहे,” असं रेयानने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

हेही वाचा :  उर्फी जावेदला देतेय ही गायिका टक्कर, बिग बॉसची माजी स्पर्धक दिसतेय सतत बिकिनी लुकमध्ये

पिच्चाईंनी घेतली जबाबदारी

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिच्चाई यांनी 12 हजार लोकांना नोकरी वाढून काढून टाकण्याची संपूर्ण जबाबदारी स्वत: स्वीकारली आहे. तसेच कमावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी मदत करणार आहे असंही पिच्चाई म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट

Trending News In Marathi: पती-पत्नी यांच्यात अनेक कारणांवरुन वाद होत असतात. कधी कधी याच वादातून …

पहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; ‘या’ कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार

Layoff News : फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांदरम्यान अनेक कंपन्यांमध्ये लगबग पाहायला मिळते ती …