गोवा ट्रिप, आक्षेपार्ह Video आणि ब्लॅकमेलिंग…; अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येचं खरं कारण आलं समोर

TV Actress Vaishali Thakkar Suicide: टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येचं (Vaishali Thakkar Suicide) खरं कारण समोर आलं आहे. वैशाली ठक्करचा विवाहित प्रियकर राहुल नवलानीच तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा खुलासा झाला आहे. त्याने असं काही केलं होतं ज्याचा धक्का वैशाली ठक्करला बसला होता. हा धक्का सहन न झाल्यानेच तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. नेमकं वैशालीसह काय झालं होतं? तिने आत्महत्या का केली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण….

काय आहे वैशालीच्या मृत्यूचं कारण?

‘ससुराल सिमर का’ (Sasural Simar Ka) मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणार अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणातील खरं कारण समोर आलं आहे. वैशालीला तिचा विवाहित प्रियकर राहुल नवलानी आणि त्याची पत्नी मानसिक त्रास देत होती असं आतापर्यंत तिने सुसाईड नोटच्या आधारे सांगितलं जात होतं.

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. त्यात उल्लेख केला आहे त्यानुसार, राहुलने गोव्यात सुट्ट्यांदरम्यान वैशालीचा आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केला होता. इतकंच नाही तर त्याने हा व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पती मितेश गौरला पाठवला होता. यानंतर मितेशने लग्न मोडलं होतं आणि वैशालीने घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. 

हेही वाचा :  Ajit Pawar Black and White: ठाकरे सरकारने खरंच फडणवीसांच्या अटकेचा कट आखला होता का? अजित पवारांचा मोठा खुलासा

इंदोर पोलिसांनी दाखल केली चार्जशीट

पोलिसांनी इंदोर कोर्टात याप्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वैशाली आपला मित्र राहुलसोबत ऑगस्ट 2021 मध्ये गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. गोव्यात कासा बुटिक हॉटेलमधील 9 नंबर रुममध्ये दोघे 25 ऑगस्टपर्यंत थांबले होते. यादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होती आणि लग्नासंबंधीही चर्चा करत होते. 

राहुलने शूट केला आक्षेपार्ह व्हिडीओ

राहुल विवाहित असतानाही वैशालीशी प्रेमसंबंधी स्थापित करत लग्नाचं आश्वासन देत होता. गोव्यातील हॉटेल रुममध्ये त्याने वैशालीचा आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केला होता. राहुलने वैशालीशी लग्न केलं नाही, पण तिने दुसरीकडे लग्न करण्याचा प्रयत्न केला असता धमकावण्यास सुरुवात केली.

राहुलने वैशालीला केलं ब्लॅकमेल

वैशालीने 2022 मध्ये आपल्या लग्नाची तयारी सुरु केली असता राहुलने तिला गोव्यात शूट केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर राहुलने इन्स्टाग्रामवरुन वैशालीच्या होणाऱ्या नवऱ्याला तो व्हिडीओ पाठवला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मितेशने कथितपणे वैशालीशी नातं तोडलं आणि लग्नही मोडलं. 

खुलासा नेमका कसा झाला?

यानंतर वैशाली मानसिक तणावात होती. राहुलने ब्लॅकमेल केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी कॅलिफोर्नियात राहणाऱ्या मितेश गौरला चौकशीसाठी भारतात बोलावलं. त्याने पोलिसांना अमेरिकेहून आपले इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ चॅट, फोटो आणि काही स्क्रीनशॉट्स पाठवले. यानंतर संपूर्ण प्रकऱणाचा उलगडा झाला. 

हेही वाचा :  Union Budget 2023: अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं मोदींचं 'सप्तर्षी' मिशन काय आहे?

16 ऑक्टोबरला घऱात गळफास घेत आत्महत्या

ससुराल सिमर का मालिकेत अंजलीची भूमिका निभावणाऱ्या वैशालीने 16 ऑक्टोबर 2022 ला इंदोरच्या साई बाग कॉलनीतील आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांना 12 पानांची सुसाईड नोट सापडली होती. यामध्ये वैशालीने राहुल आणि त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. दोघे कशाप्रकारे आपली बदनामी आणि ब्लॅकमेल करत असल्याचं तिने यात लिहिलं होतं. 

राहुलला अटक

आत्महत्येच्या तीन दिवसांनंतर पोलिसांनी राहुलला अटक केली होती. मात्र त्याची पत्नी फरार होती. दरम्यान राहुलच्या पत्नीने कोर्टात जामीन याचिका सादर करत आपण गुन्हेगार नसून पीडित असल्याचा दावा केलाहोता. आपण दोन मुलांची आई असतानाही या अशा प्रकरणात आपलं नाव गोवलं जात असल्याचा दावा तिने केला. कोर्टाने तिला जामीन दिला आहे. पोलिसांनी याप्रकरणी राहुलसह वैशालीचा फोन आणि आयपॅड जप्त केलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …