पुन्हा दिसली अजय देवगण आणि तब्बूची घट्ट मैत्री, एकमेकांनी केले किस, स्टायलिश अवतारावर खिळल्या सर्वांच्या नजर

सध्या सर्वत्र भोला या चित्रपटाच्या बोलबाला पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून अजय देवगण आणि तब्बूची जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज झाला असून तो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या टीझर लॉन्चच्यावेळी तब्बूने अजयच्या गालावर किस्स केला आहे. त्या प्रसंगाचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावेळी तब्बूच्या स्टायलिश लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या इव्हेंटला तब्बूने निळ्या रंगाच्या मिडी ड्रेस परिधान केला होता. तिच्या या ग्लॅमरस लुकने तिने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या.
(फोटो सौजन्य – Instagram @etimes, @tabu)

तब्बू केले अजयला kiss

-kiss

अजय देवगण आणि तब्बू त्यांच्या ‘भोला’ चित्रपटाच्या टीझर लाँचमध्ये एकत्र दिसले. यावेळी त्यांची निखळ मैत्री पाहायला मिळाली. दृश्यम 2 नंतर दोघेही आता भोला या चित्रपटात दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून खूप चांगले मित्र आहेत आणि ही मैत्री तब्बूने अजयच्या गालावर किस करून त्याच्या मैत्रीचे जणू दाखलेच दिले.

हेही वाचा :  Hairfall Problem: थंड पाण्याने केस धुताय, थांबा! होऊ शकतं नुकसान, कसं ते पाहा

(वाचा :- रॅम्पवर सिंहाची हजेरी, तर कोणी नखशिखांत सजलं ३० हजार क्रिस्टलमध्ये Paris Fashion Week ने वेधले जगाचे लक्ष)​

पहा #BholaaTeaser2

तब्बूचा स्टायलिश ड्रेस

तब्बूचा स्टायलिश ड्रेस

तब्बू या कार्यक्रमात निळ्या रंगाचा स्टायलिश मिडी ड्रेस परिधान करून आली होती. या कॉलर डिझाइनच्या ड्रेसला व्ही-नेकलाइन देण्यात आली असून कमरेला मॅचिंग फॅब्रिक बेल्ट देण्यात आला होता. तर स्कर्टच्या भागामध्ये गडद निळा, आकाश निळा आणि निळा निळा रंगाची रंगसंगती दिसत होती.

असा पूर्ण केला लुक

असा पूर्ण केला लुक

तब्बू या ड्रेसमध्ये खूपच मस्त दिसत होती. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने गोल्डन हूप इअररिंग्स आणि ब्लॅक स्ट्रॅपी हील्स परिधान केल्या होत्या. तर गालाल ब्लश , स्लीक ब्लॅक विंग्ड आयलायनर, स्मोकी आय, लाइट फाउंडेशन लावून तिने तिचा लुक पूर्ण केला. एखाद्या सिंपल कार्यक्रमामध्ये तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता.

(वाचा :- Sai Tamhankar: ब्लॅक ड्रेसमध्ये सई ताम्हणकरच्या दिलखेच अदा, चाहते म्हणतात नाद करा पण सईचा कुठं )​

तब्बूचे कपड्यांचे कलेक्शन

तब्बूचे कपड्यांचे कलेक्शन

तब्बूला नेहमीच साधे कपडे घालायला आवडतात. या सर्व कपड्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसते. या फोटोमध्ये तब्बूने साधा पेस्टल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या सुंदर ड्रेसमध्ये ती खूपच छान दिसत आहे. तर दुसरीकडे तब्बूने साडी देखील नेसली आहे. त्यामुळे पारंपारिक आणि मॉर्डन अशा दोन्ही लुकमध्ये तब्बू खूपच छान दिसत आहे.

हेही वाचा :  commercial planes colour : विमानाचा रंग पांढरा का असतो? 'या' कारणाचा कधी विचारही केला नसेल...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …

‘इतकी प्रगती सुद्धा चांगली नाही’ या देशात लावण्यात आली अशी व्हेंडिंग मशीन… लोकं संतप्त

China Vending Machine : जगाने गेल्या काही वर्षात खूप प्रगती केली आहे. तंत्रज्ञान, वैद्यकीय, अॅग्रो …