Rishi Shiv Prasanna : याचं डोकं आईनस्टाईनपेक्षा सुपरफास्ट; 8 वर्षाच्या Android App डेव्हलपरचा बाल पुरस्काराने सन्मान

Rishi Shiv Prasanna better IQ level than Einstein : बऱ्याचदा स्कॉलर अथवा टॉपर विद्यार्थांना आईनस्टाईन (Einstein) म्हणून चिडवले जाते. मात्र, आठ वर्षाच्या ऋषी शिव प्रसन्ना (Rishi Shiv Prasanna) या मुलाचं डोकं आईनस्टाईनपेक्षा सुपरफास्ट आहे. या मुलाने  Android Apps डेव्हलप केल्या आहेत. ऋषी याला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. ऋषी याचा IQ लेव्हल थक्का करणारा आहे.  ऋषीच्या बुद्धीमत्तेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

ऋषी हा कर्नाटक राज्याचा रहिवासी आहे. पंतप्रधानांच्या राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित झालेल्या 11 विजेत्यांमध्ये त्याचा समावेश आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऋषीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  आठ वर्षांचा ऋषी हा Android Apps डेव्हलपर आहे. ऋषी याने ‘Elements of Earth’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे.   

यशस्वी वैज्ञानिकांच्या यादीत ज्याचे नाव घेतले जाते ते वैज्ञानिक अल्बर्ट आइंस्टीन यांच्यासब  ऋषीची बरोबरी केली जात आहे.  ऋषी याचा IQ लेवल 180 आहे.  वैज्ञानिक अल्बर्ट आइंस्टीन यांच्यापेक्षा ऋषीचा  आईक्यू लेवल जास्त आहे. आइंस्टीन यांचा IQ Level 160 इतका होता. यावरुनच ऋषी याची बुद्धीमत्ता लक्षात येत आहे. 

हेही वाचा :  कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी, गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ज्या वयात मुलं बोलायला शिकतात त्या वयात ऋषी लिहायला आणि वाचायला शिकला. वयाची दोन वर्षे पूर्ण झाल्यापासून ऋषी अक्षर ओळखायल लागला. वयाच्या पाचव्या वर्षी ऋषी कोडिंग शिकला. वयाच्या आठव्या ऋषीने Android Apps डेव्हलप केले. ऋषीला विज्ञान, अवकाश आणि तंत्रज्ञान या विषयात ऋषीचा इंटरेस्ट आहे. ऋषीला मोठे झाल्यावर शास्त्रज्ञ व्हायचे आहे. देश संरक्षण आणि देश हितासाठी काम करण्याची त्याची इच्छा आहे. 

ऋषी हा मेन्सा इंटरनॅशनलचा सदस्य आहे. उच्च-आयक्यू असणाऱ्यांच्या या टीममधील तो सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहे. वयाच्या अवघ्या साडे चार वर्षात तो मेन्सा इंटरनॅशनलचे सदस्य बनला. ऋषी हा सर्वात कमी वयाचा गुगल प्रमाणित अँड्रॉइड डेव्हलपर्सपैकी एक आहे. 

ऋषीने मुलांसाठी ‘कंट्रीज ऑफ द वर्ल्ड’, ‘आयक्यू टेस्ट अॅप’ आणि ‘सीएचबी’ बनवले आहेत. ऋषीला वाचनाची आणि लेखनाची खूप आवड आहे. त्यांनी मुलांसाठी ‘लर्न व्हिटॅमिन्स विथ हॅरी पॉटर’ हे पुस्तकही लिहिले आहे. याशिवाय एक लाखाहून अधिक शब्दांची सात भागांत लिहिलेली जेके रोलिंगची संपूर्ण हॅरी पॉटर मालिका देखील त्याने वाचली आहे. 

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …