Sextortion:तिने कपडे काढायला सांगितले, अन् ‘तो’ 3 कोटींना लुटला गेला

Sex Video Call Trap : आजकल व्हिडिओ कॉलचा (Video Call) जमाना आहे. कोणीही कुठूनही आपल्या प्रियजनांशी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो. ते कसे आहेत हे आपण पाहू शकतो. मात्र असाच एक व्हिडिओ कॉल एका बड्या व्यापाऱ्याला महागात पडलाय. कारण या एका व्हिडिओ कॉलमुळे त्याला 2.69 कोटींना लुटले गेले आहे. ही घटना एकूण पोलिसांना देखील धक्का बसला आहे. खरं तर हा व्यक्ती सेक्सटॉर्शनचा (Sextortion) शिकार ठरलाय.  त्याला न्यूड व्हिडिओची धमकी देऊन लुबाडले गेले आहे. नेमकी ही घटना काय आहे व व्यापारी कसा जाळ्यात फसलाय? हे जाणून घेऊयात. 

 असा ठरला सेक्सटॉर्शनचा शिकार

अक्षय ऊर्जा कंपनी चालवणाऱ्या व्यापाऱ्याला (Businessman) एका महिलेचा व्हिडिओ कॉल (Video Call)आला होता. या महिलेने तिचे नाव रिया शर्मा असून ती मोरबी येथे राहत असल्याचे सांगितले होते. या व्हिडिओ कॉल दरम्यान व्यापाऱ्याचे मनात लालसा उत्पन्न होईल असे कृत्य करत महिलेने त्याला कपडे उतरवायला भाग पाडले. महिलेच्या सांगण्यावरून व्यापाऱ्याने व्हिडिओ कॉलमध्येच सर्व कपडे उतरवले आणि तो नग्न झाला. तो व्हिडिओत जी क्रिया करत होता, ती व्हिडिओत कैद होती. त्यानंतर अचानक व्हिडिओ कॉल कट झाला. यानंतर महिलेने फोन करून त्याच्याकडे 50 हजाराची खंडणी मांगितली. ही खंडणी न दिल्यास न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून व्यापाऱ्याने तिच्या खात्यात पैसे टाकले. ही घटना गेल्या वर्षी 8 ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेनंतर देखील त्याला या न्यूड व्हिडिओवरून अनेकदा ब्लॅकमेल करण्यात आले होते. 

हेही वाचा :  इतरांना ऑफिस देणारी कंपनीच दिवाळखोरीत, नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

पोलिसांच्या बनाव करत खंडणी 

महिलेने खंडणी (Sextortion) दिल्यानंतर व्यापाऱ्याला काही दिवसांनी एका व्यक्तीचा फोन आला होता, ज्याने आपण दिल्ली पोलिसातून इन्स्पेक्टर गुड्डू शर्मा बोलत असल्याचा दावा केला गेला. या पोलिसाने त्याची व्हिडिओ क्लिप त्याच्याकडे असल्याचे सांगितले. आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी त्याच्याकडून 3 लाखाची खंडणी मागितली. व्यापाऱ्याने पोलिसात प्रकरण गेल्याने घाबरून त्याला देखील 3 लाख दिले. या घटने दरम्यान व्यापाऱ्याला कळालेच नाही त्याला या घटनेत शिकार केले जात आहे. 

सायबर सेलचा बनाव रचत खंडणी

पोलिसांचा बनाव केल्यानंतर दिल्ली पोलिस सायबर सेलमधून बोलत असल्याचा आणखीण एक कॉल व्यापाऱ्याला आला. या कॉलवर सायबर सेलचा अधिकारी म्हणाला की, संबंधित महिलेने आत्महत्येचा केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या घटनेत तूमचं नाव येऊ नये यासाठी 80.97 लाख रुपयांची खंडणी मागितली गेली. ही खंडणी (Sextortion) देखील व्यापाऱ्याने दिली. 

सीबीआयचा बनाव रचत खंडणी

सायबर सेलनंतर सीबीआयचा बनाव रचत व्यापाऱ्याला लुटले गेले. सीबीआयचा बनाव रचत त्याला फोन केला गेला, यावेळी महिलेच्या आईने सीबीआयशी संपर्क साधला होता आणि केस मिटवण्यासाठी 8.5 लाख रुपयांची (Sextortion) मागणी केली होती, असे सांगण्यात आले. आणि अशाप्रकारे सीबीआयचा बनाव रचत त्याच्याकडून 8.5 लाख लुटले गेले. 

हेही वाचा :  ..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा

दरम्यान व्यापाऱ्याला एका मागो माग एक खंडणी मागून (Sextortion) लुटले गेले होते. मात्र त्याला लुटीचा डाव कळालाच नाही आणि तो या सेक्सटॉर्शनमध्ये फसत गेला. यानंतर व्यापाऱ्याने 10 जानेवारी रोजी सायबर क्राइम ब्रँच पोलिस स्टेशन गाठत 11 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. तसेच या तक्रारीत त्याच्याकडून  2.69 कोटी रुपये उकळल्याचा दावा केला. आता भारतीय दंड संहितेच्या कलम 387, 179, 465, 420, 120B आणि इतर अंतर्गत या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अद्याप तपास सूरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …