ग्लॅमवर्ल्डमधील टीना अंबांनींचा साधा पण आकर्षक लुक अजूनही आहे टिकून, पाहा स्टाईल

टीना मुनीमने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह लग्नगाठ बांधली आणि सिनेइंडस्ट्रीतील आपलं काम थांबवलं. चुलबुली, बबली आणि उत्साही टीना मुनीम अंबानी घराण्याची सून झाली आणि तिने सर्वस्वी आपल्या संसाराला वाहून घेतलं. मात्र ग्लॅमरस टीना अंबानी नेहमीच तिच्या आर्ट आणि चित्रकलेच्या प्रदर्शनासाठी चर्चेत राहिल्या. याशिवाय तिची स्टाईल ही अत्यंत साधी आणि तरीही आकर्षक अशीच नेहमी दिसून आली आहे. अनेकदा अंबानीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना टीना अंबांनींची हजेरी असते. तर आपल्या इन्स्टाग्रामवरही सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी टीना अंबानी कनेक्ट राहतात. टीना अंबानीची साधी मात्र तितकीच आकर्षक स्टाईल आपण जाणून घेऊया. (फोटो क्रेडिटः @tinaambaniofficial Instagram)

सफेद शर्ट आणि मोकळे केस

अंबानी आहे तर रोज घरात भरजरी कपडे अथवा जिथे जातील तिथे भरजरी कपडे घालूनच जावं लागत असेल असा अनेकांचा समज असतो. मात्र टीना अंबानीची स्टाईल अत्यंत साधी आणि तरीही तितकीच स्टायलिश दिसून आली आहे. पांढरा शर्ट हा नेहमीच स्टायलिश लुक मिळवून देतो. असाच पांढरा शर्ट घालून मोकळे केस टीना अंबानीने सोडले आहेत. जे सौंदर्यात अधिक भर घालत आहेत. त्यासह करण्यात आलेला न्यूड मेकअप अधिक उठावदार दिसत आहे.

हेही वाचा :  बूब टेप कोणत्या फॅशनेबल कपड्यांसाठी आहे योग्य? काय आहे ही फॅशन

लाल कुरता आणि पायजमा

घरात अत्यंत साध्या लुकमध्ये टीना दिसून येतात. आपल्या सोशल मीडिया पेजवर टीना अंबानीने अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये जवळच्या माणसांप्रमाणेच आपल्या आवडत्या कुत्र्यासहदेखील फोटो शेअर केले आहेत. घरात अत्यंत साधेपणाने राहात असून हीदेखील एक स्टाईल बनली आहे असं म्हणायला हवं. लाल कम्फर्टेबल कुरती आणि त्यासह पायजमा परिधान केला असून घरातील आपल्या आईप्रमाणेच टीनाच्या लुकचा भास होत आहे.

(वाचा – मुलांचा क्रश ठरतेय ही मराठमोळी गायिका, मनाचा ठाव घेणारे सौंदर्य)

मोठी टिकली आणि साडी

घरातील परंपरा अंबानींच्या सुना नेहमीच जपताना दिसून येतात आणि त्याला टीना अंबानीही अपवाद नाही. बरेचदा श्रीकृष्ण जयंती असो, गणपती उत्सव असो अथवा घरातील कोणतेही कार्यक्रम असो टीना अंबानींना गुजराती साडी आणि त्यावर मोजकेच दागिने घालून पाहिले गेले आहे. कोणाच्याही डोळ्याला समाधान देतील अशी साडी आणि त्यावर केवळ मोत्यांची माळ, साधासा मेकअप आणि मोठी टिकली असा हा टीना अंबांनींचा लुक नक्कीच भुरळ घालणारा आहे.

(वाचा – साडी नेसल्यावर जान्हवी कपूर दिसते हुबेहूब आईसारखी, साडीतले ग्लॅमरस लुक पाहून येते श्रीदेवीची आठवण)

हेही वाचा :  Chandrakant Patil : चंद्रकात पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद

वर्किंग वुमन लुक

टीना अंबानीने ग्लॅमरस क्षेत्र सोडलं असलं तरीही आपली आर्टची आवड कायम जपली आहे. विविध चित्रांचे प्रदर्शन टीना नेहमीच भरवत असतात. यावेळी बरेचदा नीता अंबानीलाही पाठिंबा देताना पाहिलं गेलं आहे. नीता अंबानी आणि टीना अंबानी यांचे नातेही खास आहे. टीना अंबानीने आपला हा वर्किंग वुमन लुकही जपला आहे. तुम्ही तिच्या या लुकवरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

(वाचा – मराठमोळ्या ‘नागिन’ने सर्वांनाच लावलंय वेड, नजरेने आणि परफेक्ट फिगरने करतेय घायाळ)

केसात गजरा आणि पारंपरिक लुक

घरातील कार्यक्रमांना अशा पद्धतीचा लुक नक्कची करता येऊ शकतो. गुलाबी साडी, केसात माळलेला गजरा आणि गळ्यात मोत्यांची माळ असा हा सुंदर लुक आहे. इतकंच नाही तर आजही भारतीय परंपरा जपत भांग काढून लावलेले सिंदूर अर्थात कुंकू आणि कपाळावर मोठी टिकली असा साजश्रृंगार टीनाने केलेला दिसून येतो. असा पेहराव बऱ्याच कार्यक्रमाला टीना करताना दिसून येते. त्यामुळे मॉडर्न आणि पारंपरिकता याचा योग्य मेळ आपल्या स्टाईलमध्ये टीनाने घातलेला आहे.

टीना अंबानीनेही आजपर्यंत आपली स्टाईल अत्यंत योग्यरित्या जपून ठेवली आहे. आपल्या संसारात आणि स्टाईलमध्ये उत्तम मेळ साधत नेहमीच चाहत्यांनाही आनंदी ठेवले आहे.

हेही वाचा :  रितेशला मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजायची जिनिलिया, अशी आहे 'वेड' लावणारी लव्हस्टोरी

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या …

महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या सह्याद्रीच्या जन्माची गोष्ट

सह्याद्री आणि छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे महाराष्ट्रा लाभलेला शौर्याचा वारसा आहे. त्याचबरोबर विस्तीर्ण आणि …