हे तेल लावताच छुमंतर होईल गुडघ्यांचं दुखणं, किचनमधील या पदार्थांचा करा समावेश

साधारणपणे वाढत्या वयामुळे सांधेदुखी होते. पण ही समस्या हिवाळ्यात कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. कारण या काळात सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते. तसेच वातावरणात सतत गारवा असल्यामुळे या दिवसांमध्ये गुडघे दुखीचा त्रास जाणवतो. टेंडन्स, मसल्स आणि जवळचे टिश्यू युरिक ऍसिड (High Level of Uric Acid) वाढल्यामुळे सांधे हलविण्यास त्रास होतो.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.इला यांनी घरी बसल्या बसल्या या समस्येवर रामबाण उपाय सांगितला आहे. सांधेदुखी आणि सांधे आखडण्याचा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी तेल तयार करू शकता. याच्या वापराने थंडीत वाढणाऱ्या वेदनांपासून आराम तर मिळतोच पण सांधेदुखीच्या रुग्णांनाही आराम मिळतो. सांधेदुखी दूर करण्यासाठी घरी तेल कसे तयार करावे ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)

घरीच तयार करा सांधेदुखीवर तेल

तेल तयार करण्यासाठी वापरा हे साहित्य

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की घरगुती तेलामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. ते बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारे साहित्य समजून घ्या.

  • 20-30 मिली मोहरीचे तेल
  • 6-8 लसूण पाकळ्या
  • 6-10 कढीपत्ता
हेही वाचा :  गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केव्हा करावी? डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

(वाचा – फॉर्मल ब्लेझर घ्यायला गेल्यावर लठ्ठपणामुळे दुकानदाराने उडवली खिल्ली, दारू सोडून केले 50 Kg Weight Loss))

​मोहरीचे तेल हाडांसाठी फायदेशीर

मोहरीमध्ये सेलेनियम नावाचे खनिज भरपूर प्रमाणात असते. जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.

(वाचा – Diabetes Tips : डायबिटिजमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक, इन्सुलिन बिघडवतात या सवयी))

​लसूणने हाडे होतात मजबूत

लसणाच्या सेवनाने हाडांमधील कॅल्शियमचे शोषण सुधारते. जे मजबूत हाडांसाठी खूप महत्वाचे आहे. तसेच, त्यात असलेल्या सल्फर संयुगेमध्ये दाहक-विरोधी आणि संधिवात-विरोधी प्रभाव असतो. ज्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.

(वाचा – Weight Loss Home Remedy : स्वयंपाकघरातील या ६ गोष्टी खऱ्या Fat Burner, खाताच बर्फासारखी वितळेल चरबी))

​कढीपत्त्याने सूज होते कमी

गुडघ्यांमध्ये सूज आल्याने वेदना ही समस्या असू शकते. अशा परिस्थितीत कढीपत्ता प्रभावी ठरू शकतो. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे सूज कमी करण्याचे काम करतात.

(वाचा – Foods to Control High BP: सायलेंट किलर असलेल्या हाय बीपीला घरगुती उपायांनी करा कंट्रोल)

हेही वाचा :  सोशल मिडीयावर माणूस खोटंच बोलतो... फेसबुकवरून ज्ञान देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

​असे तयार करा पेनकिलर ऑईल

वरील सर्व साहित्य, मोहरीचे तेल, लसूण आणि कढीपत्ता एका भांड्यात मिसळा आणि लसणाच्या पाकळ्या तपकिरी होईपर्यंत 10 मिनिटे उकळा. नंतर तुमच्या सोयीनुसार थोडेसे थंड करून संपूर्ण शरीरावर किंवा सांध्यांवर मसाज करा. रोज असे केल्याने काही दिवसात तुम्हाला त्याचे फायदे दिसू लागतील.

(वाचा – हिवाळ्यात स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याने भारतात मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या))

​अर्थरायटिस रूग्णाला रोज लावा हे तेल

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोहरीच्या तेलाने नियमित मसाज केल्याने सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो. सांधेदुखीच्या रुग्णांनाही यातून आराम मिळू शकतो. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असल्यामुळे ते सांधेदुखीमुळे होणारा कडकपणा आणि वेदना कमी करण्यास मदत करते.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

(वाचा – अरूंधतीच्या गालावर खळी नाही ही तर जखम, मधुराणीकडून मोठा खुलासा, ‘या’ आजाराचे नाव काय?))



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …