थंडीत फुफ्फुसांना असतो इनफेक्शनचा सर्वात जास्त धोका, ऑक्सिजन बंद होण्याआधी करा हे 1 काम

थंडी खूप लवकर फुफ्फुसांना विळख्यात घेते. त्यामुळे फुफ्फुसात कफ जमा होऊन संसर्ग (Lung Infection) होण्याचा धोका असतो. ज्या लोकांची फुफ्फुसे कमकुवत असतात त्यांना न्यूमोनिया, ब्राँकायटिस, सीओपीडीसारखे आजार खूप लवकर घेरतात. फुफ्फुसे मजबूत केली तर गंभीर आजारांपासून त्यांचे संरक्षण करता येऊ शकते.

त्याचवेळी, मजबूत फुफ्फुसे स्वतःच संसर्गास कारणीभूत विषाणू आणि जीवाणूंविरूद्ध लढतात आणि आजारी पडण्यापासून आपले संरक्षण करतात. हठ योग आणि प्री अँड पोस्ट नेटल योग टीचर आणि योगसारच्या फाउंडर एकता योगेश जैन यांनी फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी 3 योगासनांबाबत (Yoga For Strong Lungs) माहिती दिली.

फुफ्फुसे खराब होण्याची लक्षणे

  1. वारंवार खोकला येणे
  2. धाप लागणे
  3. श्वास घेताना अडथळा येणे
  4. कफ तयार होणे
  5. श्वास घेताना छातीत दुखणे आणि आकुंचण जाणवणे

(वाचा :- Cholesterol Exercise : लिव्हर सडल्यामुळे बनतं Cholesterol, हा एक उपाय गाळून फेकतो शरीरातील घाण व विषारी पदार्थ)

तालासन – Talasana Steps

-talasana-steps
  1. सर्वप्रथम, सरळ उभे राहा आणि पायांमध्ये काही अंतर ठेवा.
  2. खांदे फिरवून मागे न्या आणि दोन्ही हात मांड्यांच्या बरोबरीने ठेवा.
  3. श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने आणि टाच वर उचला.
  4. काही वेळ तसेच थांबल्यानंतर श्वास घ्या आणि नंतर श्वास सोडताना हात मागे फिरवत खाली घेऊन या.
  5. यासोबतच टाचा पुन्हा जमिनीवर आणा
  6. त्याचप्रमाणे तालासन 3 वेळा करा.
हेही वाचा :  सरस्वतीच्या हत्येनंतर मनोजने मृतदेहाचे फोटो काढले, नंतर गुगलवर सर्च केले...; धक्कादायक सत्य उघड

(वाचा :- हे 4 घरगुती पदार्थ खाऊन 98 किलोच्या मुलाने घटवलं तब्बल 33 किलो वजन, थट्टा उडवणारेही विचारतत Weight Loss Secret)

कोणासन – Konasana Steps

-konasana-steps
  1. सर्वप्रथम, सरळ उभे राहा आणि पायांमध्ये 2.5 फूटाचे अंतर ठेवा.
  2. खांदे मागच्या बाजूला वळवा आणि हात मांड्यांशी समांतर ठेवा.
  3. श्वास घेत कंबर उजव्या बाजूला वाकवा आणि हात सरळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा.
  4. या स्थितीत काही सेकंद श्वास घ्या आणि नंतर श्वास सोडताना कंबर सरळ करा.
  5. त्याचप्रमाणे श्वास घेताना कंबर डावीकडे वाकवून उजवा हात गुडघ्याकडे न्या.
  6. तिथे काही सेकंद श्वास घेतल्यानंतर पुन्हा कंबर सरळ करा.
  7. अशाप्रकारे कोनासनाचा सराव 3 वेळा पुन्हा करा.

(वाचा :- ही चूक करणा-यांनो सावधान, एकाचवेळी होतील 6 आजार व सडवतील आतील पूर्ण शरीर, Ayurveda Dr च्या 3 महत्वपूर्ण गोष्टी)

पर्स्ड लिप ब्रीदिंग एक्सरसाइज

  1. सर्व प्रथम वज्रासनात बसावे.
  2. कंबर आणि पाठीचा कणा सरळ ठेवावा.
  3. दोन्ही हात मांड्यांवर ठेवून खांदे मागच्या बाजूला रोल करा.
  4. या स्थितीत सामान्यपणे श्वास घ्या आणि डोळे बंद करून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा.
  5. जेव्हा मन पूर्णपणे रिलॅक्स होईल तेव्हा पुन्हा श्वास घ्या.
  6. नंतर ओठ थोडेसे उघडून तोंडातून श्वास सोडा.
  7. अशाप्रकारे 20 ते 25 वेळा श्वास घ्या आणि सोडा.
हेही वाचा :  छातीत बलगम जमा झाल्यास योगासन करा, घाण मुळापासून जाईल निघून, ३ लोकांनी मात्र ही गोष्ट टाळा

(वाचा :- Diabetes Symptoms : डायबिटीज झाला असेल तर सकाळी दिसतात ही 7 भयंकर लक्षणं, दुर्लक्ष करत असाल तर मृत्यू आलाय जवळ)

योगासन करताना घ्या ही काळजी

योग टीचर सांगतात की योगासन किंवा फुफ्फुसाचा प्राणायाम करताना काहीही त्रास होत असेल तर त्याचक्षणी ताबडतोब थांबा. त्याचवेळी, योगासनांचा सराव केवळ योग तज्ञ किंवा प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली केला पाहिजे.

(वाचा :- Vicky Kaushal Weight Loss: बर्गर-पिझ्झा खाऊन वेटलॉस करणा-या विकी कौशलवर तुम्हीही जळाल, सिक्रेट वेटलॉस फंडा उघड)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …