हे 4 घरगुती पदार्थ खाऊन 98 किलोच्या मुलाने घटवलं तब्बल 33 किलो वजन

28 वर्षीय भरत वर्मा चंदिगडचे रहिवासी आहेत. खराब जीवनशैलीमुळे त्यांचे वजन 98 किलोपर्यंत पोहोचले होते. मित्रांनी त्याच्या लठ्ठपणाची चेष्टा करायला सुरुवात केली होती. इतकंच नाही तर त्यांना स्वत:ला सुद्धा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ते सांगतात की जेव्हा ते नाकरीला लागले तेव्हा बाहेरचे पदार्थ जास्त खाण्याची सवय त्यांना लागली आंनी तिथूनच त्यांचे वजन वाढायला खरी सुरुवात झाली.

जंक फूड, तेलकट पदार्थ आणि मसालेदार नॉनव्हेजचा आस्वाद त्यांच्या जिभेचे चोचेल पुरवत होता पण त्या नादात तब्येतीकडे त्यांचे अजिबात लक्ष राहिले नाही आणि वजन वाढतच गेले. पण आता भरत पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांनी आपल्या चुका सुधारल्या असून अवघ्या 6 महिन्यात त्यांनी तब्बल 33 किलो वजन कमी केले आहे. आता त्यांचे मित्रही फिटनेसचे रहस्य त्यांना विचारतात. आज आपण त्यांचा वजन कमी करण्याचा प्रवास तपशीलवार जाणून घेऊया.

  1. नाव – भरत वर्मा
  2. व्यवसाय – फार्मा क्षेत्रात नोकरी
  3. वय – 30 वर्षे
  4. शहर – चंदीगड
  5. सर्वाधिक वाढलेले वजन – 98 किलो
  6. कमी केलेले वजन- 33 किलो
  7. वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ – 6 महिने

कधी आला टर्निंग पॉइंट

भरत सांगतात की, “लठ्ठपणा वाढल्यानंतर मला पायऱ्या चढताना त्रास होऊ लागला. तसेच वजन जास्त असल्याने मी पुन्हा पुन्हा आजारी पडू लागलो. मित्रही माझ्या वजनावर जोक्स करायचे, खिल्ली उडवायचे. 2021 मध्ये जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा मला जाणवले की हे सर्व टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वजन कमी करणे. हाच माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला कारण आता मी जर काही पाउले उचलली नसती तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.”

हेही वाचा :  Maharastra Politics : 'माझ्या तोंडाला लागू नका, बापाशी गद्दारी...', मोठा खुलासा करत आव्हाडांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर!

(वाचा :- ही चूक करणा-यांनो सावधान, एकाचवेळी होतील 6 आजार व सडवतील आतील पूर्ण शरीर, Ayurveda Dr च्या 3 महत्वपूर्ण गोष्टी)

वेटलॉससाठी केलं हे डाएट फॉलो

वेटलॉससाठी त्यांनी खाली दिलेले एक विशेष डाएट फॉलो केले.

ज्यूससोबत ओट्स, दलिया किंवा ब्राउन ब्रेड

दोन चपात्या आणि कोणतीही एक डाळ व दही खायचे.

दोन चपात्या आणि कोणतीही एखादी हंगामी पालेभाजी सेवन करायचे.

  • प्री-वर्कआउट मील –

पपईचा शेक

  • पोस्ट वर्कआउट मील –

बदाम आणि कोणतेही एक हंगामी फळ खायचे.

पेस्ट्री

  • लो कॅलरी रेसिपी –

पूर्ण आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश करायचे

(वाचा :- Diabetes Symptoms : डायबिटीज झाला असेल तर सकाळी दिसतात ही 7 भयंकर लक्षणं, दुर्लक्ष करत असाल तर मृत्यू आलाय जवळ)

वेटलॉस एक्सरसाईज

आपल्या वजन कमी करण्याच्या पद्धतीचे स्पष्टीकरण देताना भरत म्हणाले की, पूर्वी त्यांची शारीरिक हालचाल नगण्य होती. म्हणजेच अगदी कमी होती. यामुळेच वजन वेगाने वाढले. जेवढी हालचाल जास्त असेल तेवढे वजन नियंत्रणात राहते. एकामागून एक लठ्ठपणाच्या समस्येचा सामना केल्यानंतर त्यांना याची जाणीव झाली असे ते कबुल करतात. पुढे ते म्हणतात की, “मग मी घरी माझ्या दैनंदिन कामात शरीराची क्रिया आणि हालचाल वाढवू लागलो. यासोबतच लठ्ठपणावर मात करण्यासाठी मी सकाळी आणि रात्री खाल्ल्यानंतर 15 मिनिटे चालत असे.”

हेही वाचा :  अंगावर नैसर्गिकरित्या अल्लाह आणि मोहम्मद, अंबरनाथमधील सव्वा कोटींच्या बोकडाचा मृत्यू

(वाचा :- Vicky Kaushal Weight Loss: बर्गर-पिझ्झा खाऊन वेटलॉस करणा-या विकी कौशलवर तुम्हीही जळाल, सिक्रेट वेटलॉस फंडा उघड)

फिटनेस सिक्रेट

भारत सांगतात की, “मला बाहेरच्या खाण्याने खूप त्रास होत होता. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे माझे वाढलेले वजन. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मी पूर्णपणे घरी शिजवलेले अन्न खाण्याचा निर्णय घेतला. मात्र, बाहेरचे अन्न सोडणे इतके सोपे नव्हते. पण जेव्हा जेव्हा मला बाहेरचे खाण्याची इच्छा होत असे तेव्हा मी वाढलेल्या वजनाचे परिणाम आठवायची, होणारा त्रास आठवायचो व पुन्हा एकदा नव्या जोमाने वेट लॉस साठी मेहनत घ्यायचो.”

(वाचा :- Ayurveda Weight Loss: आयुर्वेद डॉ दावा – फक्त तीन आठवड्यांत जळून जाईल शरीरातील सर्व चरबी, फॉलो करा या 5 टिप्स)

कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?

वजन वाढल्यानंतर भरत वारंवार आजारी पडू लागले. ते सांगतात की मला जास्त पायऱ्या चढताही येत नव्हत्या, जॉगिंगलाही जाता येत नव्हते. यासोबतच मित्रही माझी चेष्टा करू लागले. याचा खूप वाईट परिणाम माझ्या मनावर आणि आयुष्यावर झाला. मी खूप हताश झालो. एकवेळ अशी होती की वाढत्या वजनामुळे मी डिप्रेशनच्या तोंडावर पोहोचलो होतो. कारण ही स्थिती अशी असते की संपूर्ण जगच तुम्हाला नकोसे वाटते. जगण्यावरचा विश्वास उडतो.

हेही वाचा :  'हा काय पोरकटपणा...', नकली शिवसेना, राष्ट्रवादी म्हणणाऱ्या PM नरेंद्र मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर, 'उद्या निवडणुकीत...'

(वाचा :- Weight Loss : अँटी-ऑबेसिटी गुणधर्मांनी ठासून भरलेत हे 5 कुकिंग ऑइल्स, जाळून टाकतात पोट, मांड्या व कंबरेची चरबी)

वेटलॉससाठी काय बदल केले?

या प्रश्नाचे उत्तर देताना भरत यांनी सांगितले की, वजन कमी करण्यासाठी त्यांनी पूर्णपणे घरी बनवलेले अन्न खाल्ले. संतुलित आहारासोबतच तेलकट अन्न, जंक फूड आणि बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळले. तर मंडळी तुम्ही सुद्धा’ त्यांच्याकडून आदर्श घेऊन वेट लॉसचा तुमचा संकल्प सहज पूर्ण करू शकता.

(वाचा :- Vitamin K Rich Foods : शरीराचा एक एक अवयव निकामी करते Vitamin K ची कमी, ताबडतोब खायला घ्या हे 6 पदार्थ नाहीतर)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …

VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक …