हिवाळ्यात मुलांमधील न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये वाढ, काय करावेत उपाय

गेल्या काही आठवड्यांपासून बदलेले हवामान, तापमानातील चढ उतार आणि उच्च आर्द्रता यामुळे लहान मुलांमध्ये न्यूमोनिया आणि श्वासोच्छवासाच्या समस्येत वाढ झाली आहे. फ्लू, पोटातील कृमी आणि इतर संक्रमण वेगाने पसरताय. फ्लू आणि कोविड १९ (ज्याला “फ्ल्यूरोना” असेही म्हणतात) यासोबतच सध्या रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) वाढत आहे. ओमिक्रॉन देशात वेगाने वाढत आहे असे सांगण्यात येते. मात्र याचा परिणाम लहान मुलांवर अधिक दिसून येत आहे. याबाबत डॉ. चेतन जैन, पल्मोनोलॉजिस्ट, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल,घाटकोपर यांच्याकडून आम्ही जाणून घेतले.

काय आहे लक्षणे

तज्ज्ञ डॉक्टर सांगतात लहान मुले, वयोवृद्ध ज्यांना मधुमेह आणि दमा यासारख्या समस्या आहेत त्या मुलांची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपचार करणे महत्वाचे आहे. याच्या लक्षणांमध्ये थंडी वाजून ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, कफ येणे, कोरडा खोकला, सर्दी, थकवा, उलट्या, चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून असतात.

श्वसनाच्या त्रासमुळे होतो न्यूमोनिया

हिवाळा हा श्वसनाच्या आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देतो. हवामानातील सततच्या बदलांमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या बालकांना फुफ्फुसाच्या दीर्घकालीन समस्या जसे की दमा, ब्राँकायटिस, जन्मजात हृदयरोगाचा सामना करावा लागतो. किडनीचे आजार आणि इतर श्वसनाच्या परिस्थितीमुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. हे प्राणघातक ठरत आहे आणि त्यामुळे फुफ्फुसाचे गंभीर नुकसान होऊ शकते. कोणतीही गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी मुलांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  Bruce Lee : जास्त पाणी प्यायल्याने ब्रूस लीचा मृत्यू; 49 वर्षांनंतर अखेर सत्य समोर

(वाचा – मलायकाच्या मॉर्निंग रूटीनमध्ये आहे या खास ड्रिंकचा समावेश, परफेक्ट फिगरसाठी रोज प्यावे)

लसीकरण मोहिमेला चालना

हिवाळ्यात संसर्गजन्य आजार जास्त प्रमाणात आढळतात कारण जेव्हा एखादी आजारी व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा कोरड्या हवेत हे थेंब अधिक सहजतेने पसरतात. बदलत्या वातावरणामुळे लहान मुले विषाणूजन्य साथीच्या रोगांचा सामना करत आहेत. गेल्या महिन्यात, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने कोविड महामारीनंतर प्रथमच बालकांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले. लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी आणि बालरोग तज्ज्ञांना माहिती देण्यासाठी, संस्थेने त्यांचे पहिले पुस्तक देखील प्रकाशित केले, ज्यामध्ये 150 आजारांसाठी प्रमाणित उपचार तसेच लहान मुलांमधील सामान्य आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले.

(वाचा -प्रेगन्सीनंतर चारू असोपाचे ट्रान्सफॉर्मेशन कसे करतेय वजन कमी, पुन्हा दिसली राजीव सेनसह)

काय आहे उपाय?

  • मुलांना जास्त गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे
  • आजारी लोकांशी संपर्क मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा
  • खोकताना तोंड व नाक झाकून घ्यावे
  • हात चांगले धुवावेत
  • संतुलित आहाराचे सेवन करावे
  • न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे श्वासोच्छवासाचे व्यायाम करावेत
  • हिवाळ्यात, मुलांना उबदार कपडे घाला, त्यांना पिण्यासाठी गरम सुप द्या, घरी ह्युमिडिफायर वापरा आणि प्रदूषण टाळा
हेही वाचा :  Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

हिवाळ्यात अनेक आजाराला आमंत्रण आपण देत असतो. पण लहान मुलांना याचा अधिक त्रास होतो. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या या गोष्टींची काळजी घेणे अधिक योग्य आहे.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर! माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला… गुन्ह्यांमध्ये वाढ

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा आवाज कमी करायला सांगितल्याचा राग आल्याने तीन …

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …