Surya Grahan 2023 : या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण कधी दिसणार? गर्भवती महिलांनी काय करावे

Solar Eclipse in India : नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. नवीन वर्षाचं कॅलेंडर समोर येताच गर्भवती महिला किंवा ज्यांच्या घरी गर्भवती स्त्री आहेत ते पाहून घेतात. कारण गर्भवती महिला ग्रहण पाळतात. या दिवसांमध्ये ते स्वतःची विशेष काळजी घेतात. यावर्षी पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या हालचालींमुळे संपूर्ण सूर्यग्रहणासह ग्रहणाची चार रोमांचक दृश्ये जगभरातील खगोलप्रेमींना पाहायला मिळतील. मात्र, तुम्ही भारतात असाल तर इथे फक्त दोनच खगोलीय घटना पाहता येतील. या वर्षी ग्रहणाची प्रक्रिया 20 एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहणाने सुरू होईल. (फोटो सौजन्य – iStock)

भारतात दिसणार का ग्रहण

तज्ज्ञांच्या मते, 20 एप्रिल रोजी नवीन वर्षाचे पहिले ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात दिसणार्‍या चंद्रग्रहणाबद्दल बोलायचे झाले तर 5 आणि 6 मे च्या मध्यरात्री होणारे पेनम्ब्रल चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की पृथ्‍वीभोवती फिरणारा चंद्र पेनम्‍ब्रा (पृथ्वीच्या सावलीचा एक छोटासा भाग) मधून जातो तेव्हा पेनम्ब्रल चंद्रग्रहण होते.

हेही वाचा :  केंद्र सरकारकडून महिलांना 6000 रुपये, लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज !

​या दिवशी चंद्रग्रहण

या दरम्यान, चंद्रावर पडणारा सूर्यप्रकाश अर्धवट कापलेला दिसतो आणि चंद्रावर पडणारी अंधुक सावली दिसते. पेनम्ब्रल चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीवरील लोक पौर्णिमेचा चंद्र पाहू शकतात. परंतु त्याचे तेज त्याच प्रकारे दिसत नाही. देशातील खगोल प्रेमी वर्षातील एकमेव कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यापासून वंचित राहतील कारण ही घटना भारतीय प्रमाणवेळेनुसार 14 ते 15 ऑक्टोबरच्या मध्यभागी होणार आहे. 28 आणि 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणारे आंशिक चंद्रग्रहण देशात दिसेल आणि या खगोलीय घटनेदरम्यान चंद्राचा 12.6 टक्के भाग झाकलेला असेल. २०२२ मध्ये दोन पूर्ण चंद्रग्रहण आणि दोन आंशिक सूर्यग्रहण पाहायला मिळाले.

(वाचा – ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांची पहिली झलक, मुकेश-नीता यांनी आजी-आजोबा म्हणून केल्या ‘या’ खास गोष्टी))

​ग्रहणाचा गर्भवती महिलांवर होणारा परिणाम

सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी जेवण करू नये. असे म्हणतात की ग्रहणाच्या दुष्परिणामांमुळे अन्न दूषित होते, म्हणून आधीच शिजवलेल्या अन्नावर तुळशीची पाने किंवा गंगेचे पाणी घाला. ग्रहणाचा गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होतो. सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घरीच राहावे. यावेळी सूर्यकिरण शरीरावर घातक परिणाम करतात. यामुळे गर्भाचा वेळे अगोदर जन्म किंवा बाळाला काही आजार होऊ शकतात.

हेही वाचा :  Scholarship Result : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इतके'च विद्यार्थी झाले उत्तीर्ण

(वाचा – Meta ने आईला जॉबवरून काढलं, ६ वर्षांच्या मुलीने साजरा केला आनंद, आई-मुलीचं खास नातं))

​सूर्यग्रहणाच्यावेळी गर्भवती महिलांनी काय करावे

  • शक्य असेल तर घरीच राहावे
  • तसेच शक्य असेल तर जागे राहावे, सकारात्मक विचार करावा
  • ग्रहण संपताच गरोदर स्त्रियांनी आंघोळ करावे
  • सूर्यग्रहणाच्यावेळी येणारी किरणे घातक असतात त्यामुळे ते थेट अंगावर पडणार नाही याची काळजी घ्या

(वाचा – खरा रोमान्स म्हणजे काय? सुधा मूर्तींच्या या टिप्स पालकांनी मुलांशी नक्की शेअर कराव्यात))

​काय करू नये

  • गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणाच्यावेळी खाऊ नये
  • ग्रहणाच्यावेळी गर्भवती महिलांनी टोकेरी वस्तू जवळ ठेवू नयेत
  • शिळ अन्न खाऊ नका
  • सूर्य किरणांच्या संपर्कात येऊ नका

(वाचा – लेबरपेनच्या वेळी झाला गर्भधारणेचा खुलासा, महिला गरोदर असल्याचं डॉक्टरांनाही कळलं नाही))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …