Scholarship Result : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, ‘इतके’च विद्यार्थी झाले उत्तीर्ण

फेब्रुवारी 2022 मध्ये राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचे (Fifth and Eighth Class Scholarship Result ) अंतिम निकाल (Scholarship Result ) नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा हे निकाल समोर आले. यामध्ये इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत, तर इयत्ता आठवीच्या 12.53 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.   

राज्यात इयत्ता पाचवीच्या  एकूण 3,82,797  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 91400 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. इयत्ता आठवीच्या 279466 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. 

त्यापैकी 35034 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. अर्ज छाननीनंतर अंतिम निकाल 7 नोव्हेंबरला पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम म्हणजे तात्पुरता निकाल जाहीर करण्यात आला होता. 

ज्यानंतर 7 ते 17 नोव्हेंबर दरम्यान शाळांकडून गुण पडताळणीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर अर्ज छाननी करून मंगळवारी अखेर अंतिम निकाल जाहीर केले गेले. 

कसा पाहाल निकाल 

विद्यार्थी लॉग इन आयडी वापरून परीक्षेचा निकाल पाहू शकतात. तर, पालकही http://www.mscepune.in  आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहू शकतात. 

हेही वाचा :  उसने पैसे परत करायला गेलेल्या महिलेसोबत सामुहिक बलात्कार; मैत्रिणीनेच केले घृणास्पद कृत्य

कधी असते शिष्यवृत्तीची परीक्षा? 

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेतली जाते, त्यासाठी डिसेंबर महिन्यात अर्ज मागवले जातात. यंदा मात्र शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरणं शक्य झालं नाही 

आणि म्हणूनच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. राज्यभरातील अनुसूचित जाती- जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. 

मध्यंतरी कोरोना काळात म्हणजेच 2019- 2021 मध्ये शाळा बंद होत्या पण शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु होता या काळात विद्यार्थी आर्थिक अडचणीतही होते.  

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील 1700 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचं समोर आलं आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होईल. इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. (Maharashtra Board exam)

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …