OnePlus 11: 16 GB रॅम, 50 MP कॅमेरा, पावरफुल प्रोसेसर आणि… वनप्लसच्या नवीन फोनची किंमत किती?

OnePlus 11 : OnePlus फोन देखील सध्या चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आहेत. वनप्लसचा मोस्ट अवेटेड OnePlus 11 ची प्रतिक्षा अखेर संपली आहे. वनप्लसचा फ्लॅगशिप मॉडेल असलेला OnePlus 11 हा फोन अखेर लाँच झाला आहे. पावरफुल प्रोसेसर आणि जबरदस्त कॅमेरा हे या फोनचे वैशिष्ट्य आहे. शिवाय फोनमध्ये तगडा बॅटरी बॅकअपही देण्यात आला आहे. हा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करेल.  लवकरच हा फोन विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे. 

OnePlus 11 या स्मार्टफोनमध्ये सर्वात पावरफुल असा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये उत्कृष्ट कॅमेरा सेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीने OnePlus 11 फोनमध्ये SONY चा कॅमेरा वापरण्यात आला आहे.  उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये हॅसलब्लॅड कॅमेरा  असणार आहे. बेस्ट साऊंड क्वालीटीसाठी फोनमध्ये स्टिरिओ स्पीकर सेटअप आहे. या फोनमध्ये कंपनीने 3.5mm हेडफोन जॅक काढून टाकला आहे. OnePlus 11 चा बॅटरी बॅकपही अत्यंत तगडा आहे. स्पेस ग्रीन आणि ब्लॅक रंगात हा फोन उपलब्ध आहे. 

OnePlus 11 चे बेस्ट फिचर्स

हेही वाचा :  गॅस सिलेंडर ५० रुपयांनी स्वस्त मिळवू शकता, ऑनलाईन बुकिंग करताना फक्त 'या' स्टेप्स करा फॉलो

OnePlus 11 डिस्प्ले

या फोनमध्ये LTPO 3.0 तंत्रज्ञानासह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 2K अर्थात 3216 × 1440 पिक्सेल रिझोल्यूशन व्हिडिओ क्वालीटी मिळणार आहे. 1300 nits पीक ब्राइटनेस, डॉल्बी व्हिजन, HDR10 प्लसला हा फोन सपोर्ट करणार आहे. हँडसेटच्या सेफ्टीसाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचा वापर करण्यात आला आहे.

OnePlus 11 प्रोसेसर, RAM आणि स्टोरेज

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी OnePlus 11 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 8 जनरेशन 2 चिपसेटसह ग्राफिक्ससाठी Adreno 740 GPU वापरण्यात आला आहे. 12 GB/16 GB LPDDR5X RAM आणि 512 GB UFS 4.0 स्टोरेज स्टोरेज देण्यात आले आहे.

OnePlus 11 कॅमेरा सेटअप

OnePlus 11 या लेटेस्ट फोनच्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या डिवाइसमध्ये कंपनीने हॅसलब्लॅड कॅमेरा सेन्सर वापरला आहे. फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सलचा Sony IMX890 कॅमेरा सेन्सर तसेच 48MP Sony IMX581 अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय  2x ऑप्टिकल झूमसह 32-मेगापिक्सेल Sony IMX709 टेलिफोटो लेन्स आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

हेही वाचा :  Shopping Guide : ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

OnePlus 11 चा बॅटरी बॅकअप

OnePlus 11 फोनमध्ये 5000 mAh अत्यंत तगडा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 100W फास्ट चार्जचिंग सपोर्ट देण्यात आला आहे.  

OnePlus  ची 11 किंमत

OnePlus 11 हा फोन कंपनीने तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला आहे. पहिला व्हेरिंएटमध्ये 12 GB रॅम सह 256 GB स्टोरेज देण्यात आला आहे.  या मॉडेलची किंमत 3999 चीनी युआन (सुमारे 48,103 रुपये) आहे. दुसरे मॉडेल 16 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज असं आहे. या प्रकाराची किंमत 4399 चीनी युआन (सुमारे 52914 रुपये) इतकी आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये 16 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेज आहे, या व्हेरिएंटची किंमत 4899 चीनी युआन (सुमारे 58929 रुपये) अशी आहे.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?

Interesting Facts : विमान प्रवास हा पहिलावहिला असो किंवा मग अगदी सराईताप्रमाणं नेहमीच्या नेहमी केला …

देशभर चर्चेत असलेल्या पोर्श कारची किंमत किती? स्पीड, मायलेज सर्वच जाणून घ्या…

Pune Accident News:  पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोर्श …