शहाजीबापू वयाच्या साठीतही करताहेत डाएट, वर्कआऊट; ९ किलोने वजन घटवलं

‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल… ओकेमध्ये हाय…’ या एका ऑडिओ क्लिपमुळे चर्चेक आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शहाजीबापूंनी तब्बल ८ दिवसांत ९ किलो वजन कमी केलं आहे.

शहाजीबापूंच्या त्या डायलॉगनंतर ते अतिशय लोकप्रिय झाले. यानंतर वेगवेगळ्या कारणांनी ते चर्चेत होते. पण आता चक्क त्यांच्या वेटलॉसमुळे चर्चेत आले आहे. बंगलुरू येथे हॅपिनेस कार्यक्रमात शहाजीबापू यांनी पंचकर्म घेतला आहे. २४ डिसेंबर रोजी शहाजीबापू बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेले होते. (Shahajibapu Patil फेसबुक – iStock)

​शहाजीबापूंनी कसं कमी केलं वजन

शहाजीबापू यांनी आपल्या आहारात पालेभाज्या, कडधान्ये अशा सकस पदार्थांचा समावेश केला. वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करून नऊ किलो वजन कमी केले.

​शहाजीबापूंचा असा होता दिनक्रम

या कार्यक्रमात शहाजीबापू पहाटे पाच वाजता उठायचे. यानंतर दोन तास योगा तसेच दुपारी सुदर्शन प्रक्रिया आणि व्यायाम करायचे. संध्याकाळी मेडिटेशन हा देखील दिनक्रमातील महत्वाचा भाग होता. या दिनक्रमात शाकाहारी जेवणाचा समावेश असायचाय. शहाजीबापूंसारखाच थक्क करणारा वेटलॉस नवीन वर्षात विचार करत असाल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा.

हेही वाचा :  नवी मुंबई पालिकेत दहावी, बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 60 हजारपर्यंत मिळेल पगार

​जेवढे शक्य असेल तेवढे अन्न चावा

नेहमी असा सल्ला दिला जातो की अन्न पूर्णपणे चघळले पाहिजे, ज्याच्या मदतीने आपल्याला जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळतात. वास्तविक, अन्न न चघळल्याने तुमच्या पोटाला ते अन्न पचवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि तुम्ही अन्नामध्ये असलेल्या पोषक तत्वांपासून वंचित राहतात, ज्यामुळे इतर समस्या उद्भवतात.

​जास्त खाऊ नका

बरेच लोक त्यांचे आवडते पदार्थ पाहून तुटून पडतात आणि जर तुम्हीही अशा लोकांमध्ये सामील असाल तर तुम्हाला तुमची ही सवय सुधारण्याची गरज आहे. होय, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे पोट 80 टक्के भरले आहे, तर खाणे बंद करा कारण जास्त प्रमाणात खाणे तुम्हाला आजारांना बळी पडते आणि तुमचे वजन नियंत्रित करणे तुमच्यासाठी कठीण होते.

​हायड्रेशन

उन्हाळा असो किंवा हिवाळा, पाणी पिणे आणि स्वत:ला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू नये हे लक्षात ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फक्त पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही फळांचा रस, भाज्यांचा रस, नारळ पाणी, लिंबू पाणी यासारख्या गोष्टी देखील वापरू शकता, ज्यामुळे तुम्हाला हायड्रेट राहण्यास मदत होईल.

हेही वाचा :  बौद्ध समाजातील कुटुंबाने घरी गणपती बसवल्याने वाद! नवी मुंबईतला बाचाबाचीचा Video चर्चेत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …