Satyajeet Tambe Education: कॉंग्रेसला ‘दे धक्का’ करणारे सत्यजित तांबे शिक्षणात ‘लय भारी’, जाणून घ्या

Satyajeet Tambe Education Details: कॉंग्रेस पक्षाला घरचा आहेर देणारे नेते सत्यजित तांबेंचे नाव सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पदवीधर मतदार संघात पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. सुशिक्षित तरुण, संवेदनशील व्यक्ती आणि एक महत्त्वाकांक्षी राजकारणी अशी सत्यजित तांबे यांची ओळख आहे. त्यांची राजकीय कारकीर्द अतिशय गौरवशाली आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया.

सत्यजित तांबे हे व्यवस्थापन आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या जॉन एफ केनेडी स्कूलमध्येही त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक जिंकली आणि जिल्हा परिषद निवडणूक जिंकणारे सर्वात तरुण सदस्य ठरले.

२०१७ पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य राहिले. २०१८ मध्ये, सत्यजित यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक जिंकली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी वेगळा ‘युवा जाहीरनामा’ही जारी केला होता.

राजकारणाव्यतिरिक्त शहरी विकास, युवा सक्षमीकरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हे सत्यजित यांचे आवडते विषय आहेत. २०१६ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. त्यांना वाचनाची आवड आहे आणि ते स्तंभलेखनही करतात. त्यांनी ‘आंदोलन’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे, जो भारतातील चळवळी आणि चळवळींच्या संस्कृतीची आणि महत्त्वाची माहिती देणारा ऐतिहासिक दस्तऐवज आहे.

हेही वाचा :  Strike:राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत, 'या' मागणीसाठी आक्रमक

वाइल्डलाइफ फोटोग्राफर ते संयमी शिवसेना पक्षप्रमुख, उद्धव ठाकरेंच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या
नुकतेच त्यांचे ‘सिटीझनविल’ हे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक कॅलिफोर्नियाचे लेफ्टनंट गव्हर्नर गॅविन न्यूजम यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. हे पुस्तक न्यूजमच्या सॅन फ्रान्सिस्कोचे महापौर असतानाच्या अनुभवांवर आधारित आहे. मुळात सुशासन आणि लोकसहभाग हा या पुस्तकाचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशनादरम्यान सत्यजित यांच्यावर आमचा डोळो असल्याचे सूचक विधान फडणवीसांनी केले होते. त्यामुळे ही बंडखोरी अधिक चर्चेत आली आहे.

सत्यजित यांना यावेळी विधान परिषदेची निवडणूक लढवायची होती. परंतु काँग्रेसने त्यांच्या वडिलांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली. सामान्यतः कुटुंबीय काँग्रेस पक्षाच्या आदेशाचे पालन करतात पण यावेळी तांबे कुटुंबीयांनी तसे केले नाही. काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळूनही डॉ.सुधीर यांनी अर्ज भरला नाही. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा सत्यजित यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तांबे पिता-पुत्राच्या कारवाईमुळे विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा एकही उमेदवार रिंगणात राहिला नाही.

Earn and Learn Scheme: विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ

हेही वाचा :  ऑक्टोबर हिटमध्ये ग्राहकांच्या खिशाला चटका; महाराष्ट्रात वीजबील इतक्या पैशांनी वाढणार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …