तुम्हाला अनावश्यक Calls येतात का? हे छोटे काम करा, रिंग वाजण्यापूर्वीच नंबर होईल Block

Do Not Disturb Service : मोबाईल जसा उपयोगाचा आहे तसा तो त्रासदायकही ठरत आहे. कारण अनावश्यक कॉल्समुळे संताप येतो. आता तुम्हा या त्रासातून सुटका करु घेऊ शकता. आपण घरी निवांत किंवा झोपलेले असतो तेव्हा फोनची रिंग वाजते. मात्र, फोन घेतला तर कळते एक तर तो कंपनीचा असतो किंवा तो अनावश्यक असतो. त्यामुळे आपली चिडचीड होते. आता TRAI ने दूरसंचार सेवा प्रदात्यांना एक आदेश जारी केला आहे. त्यांनी कंपन्यांना वापरकर्त्यांसाठी  Do Not Disturb (DND) सेवा सुरु करण्यास सांगितले आहे. त्यामुळेअनावश्यक Callsमधून तुमची सुटका होईल.

 Spam Calls मध्ये सातत्याने वाढ

आपल्या मोबाईवर  Spam Calls सातत्याने वाढत आहेत. दररोज किमान 4 ते 5 अनावश्यक कॉल येतात. कधी बँकेचे कर्ज तर कधी विमा कंपनीचा तर कधी डिश सेवाबाबत. सर्व प्रकारचे कॉल्स आपल्याला त्रासदायक ठरत असतात. अनेक लोक Truecaller अ‍ॅपच्या मदतीने कॉल आल्यानंतर नंबर ब्लॉक करतात. पण नंतर नवीन नंबरवरुन कॉल येऊ लागतात. अशा स्थितीत अनावश्यक कॉल्सची कटकट संपण्याचे नाव घेत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी ट्रायने दूरसंचार सेवा पुरवठादारांना एक आदेश जारी केला आहे. त्यांनी कंपन्यांना वापरकर्त्यांसाठी डीएनडी (DND) सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. 

हेही वाचा :  Android Smartphone मध्ये 'या' समस्या येत असतील तर, काळजी नको, फॉलो करा टिप्स

DND सेवा दोन प्रकारे सुरु करता येते

सरकारने Do Not Disturb सेवा अतिशय सुलभ केली आहे. DND सेवा दोन प्रकारे सुरु करता येते. एक एसएमएस आणि दुसरा कॉल. या दोन सोप्या मार्गांनी DND सेवा चालू करता येते.

एसएमएसद्वारे Do Not Disturb सेवा कशी सुरु करायची

एसएमएस करण्यासाठी, तुम्हाला मेसेजिंग अ‍ॅपवर जावे लागेल.
– START 0 टाइप करावे लागेल आणि 1909 वर संदेश पाठवावा लागेल. 
असे केल्याने DND सेवा कार्यान्वित होईल. 

कॉल करुन DND सेवा कशी चालू करावी

– डायलर अ‍ॅप उघडा.
– 1909 वर कॉल करा.
– तुम्हाला काही सूचनांचे पालन करावे लागेल.
हे केल्यानंतर, DND सेवा सक्रिय होईल. 

एकदा की ही Do Not Disturb सेवा सुरु झाली की तुम्हाला कॉल्स आले तरी रिंग वाजणार नाही आणि कॉल्स तात्काळ ब्लॉक होईल. त्यामुळे या सेवेचा लाभ घेण्यासाठी वरील प्रमाणे कॉल किंवा एसएमएस करा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

20 जूनपासून बंद होतेय गुगलची ही सर्व्हिस, 4 वर्षांपूर्वीच झाली होती लाँच

Google One Vpn Service: गुगल क्रोम हा आपल्या रोजच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. गुगलने …

Google I/O 2024 Highlights: जबरदस्त! मानवी स्मरणशक्तीला शह देणार Google चं ‘हे’ टूल; हरवलेल्या गोष्टीही शोधणार

Google I/O 2024 : तंत्रज्ञान क्षेत्रात जग बरंच पुढे जात असतानाच गुगल, अॅपलसारख्या कंपन्यांकडूनही नवनवीन …