कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोशिएशन लि. मध्ये भरती ; 10 ते ग्रॅज्युएटसाठी संधी… | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोशिएशन लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन /ईमेलद्वारे करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२२ आहे. 

एकूण जागा : २१

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) शाखाधिकारी / Branch Officer ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य – ०१) JAIIB / CAIIB / Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management / DCBM / GDC&A उत्तीर्ण ०२) पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM ०३) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका बँकेतील किंवा इतर वित्तीय संस्थामधील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

२) ऑफिसर / सबअकौटंट / Officer/Sub Accountant ०६
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य- JAIIB / CAIIB / GDC&A / DCM तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका बँकेतील किंवा इतर वित्तीय संस्थामधील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक

३) लेखनिक / Clerk ०६
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक. ०३) प्राधान्य JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका

हेही वाचा :  अल्पभूधारक शेतकऱ्याची लेकाने पटकावला UPSC परीक्षेत ३९५वा रॅंक….

४) शिपाई/ ड्रायव्हर / Peon/Driver ०५
शैक्षणिक पात्रता :
१० वी उत्तीर्ण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक तीन चाकी / चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना असल्यास प्राधान्य.

परीक्षा फी : ५००/- अधिक १८% जीएसटी/-
पगार (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ईमेल द्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ डिसेंबर २०२२ 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि;१४५८/ बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२.
E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.kopurbanbank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रीया

१) उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यानंतर बायोडाटा पाठवावा.
२) महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोध्योग विभाग यांचे कडील दि. २१/०१/२०१९ व दि. २९/११/२०२१. सहकार आयुक्त यांचे कडील दि. २४/०३/२०२२ व १४/०६/२०२२ रोजीचे आदेशान्वये सहकारी बँकांतील नोकर भरती प्रक्रिया शासन नियुक्त संस्थेद्वारेच करणे बंधनकारक आहे.
३) वरील पदांची भरती प्रक्रिया सहकार आयुक्तांचे पॅनेल वरील कोल्हापुर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. कोल्हापुर यांचे मार्फत राबविली जाणार आहे.
४) उमेदवारांनी सुरुवातीस फक्त अर्ज (बायोडाटा) [email protected] या ई-मेलवर पाठविण्यात यावेत. सोबत शैक्षणिक व अन्य कागदपत्रांची आवश्यकता नाही. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून पाठवू नयेत. कागदपत्रांची पाहणी प्रत्यक्ष मुलाखतीचे वेळी केली जाईल…
५) परीक्षेचे स्वरुप लेखी व तोंडी स्वरुपाचे आहे.
६) लेखी परीक्षा १०० मार्काची व बहुपर्यायी असणार आहे. गुणानुक्रमे मेरिट नुसार उमेदवाराची निवड केली जाईल. परीक्षेचे स्वरुप व अभ्यासक्रम साधारण IIBF च्या धरतीवर आधारीत आहे. परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडला आहे. परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे ब्रॉशर उमेदवारास त्याच्या मेल आयडीवर पाठविले जाईल. सबब मेल आयडी पाठविताना अचूक पाठवावा. सदर परीक्षेचे आयोजन कोल्हापुर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. कोल्हापुर यांचे मार्फत पुण्यामध्ये केले जाणार आहे.
७) तोंडी परीक्षेचे आयोजन बँके मार्फत केले जाईल.
८) लेखी परीक्षेसाठी सूचनापत्र पाठविलेनंतर रु. ५००/- अधिक १८% जीएसटी या प्रमाणे परीक्षा शुल्क (विना परतीची) आकारले जाणार आहे. उमेदवाराने परीक्षा शुल्क ₹५००/- + ९०/- ( १८% जीएसटी) ५९० /- = दि कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक लि., बँकेच्या Khasbag Kolhapur शाखा IFSC Code: KOLH0000008, MICR Code : 416398008 वर कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी असोसिएशन लि., यांचे बचत खाते (Saving A/c ) क्र. 00081001006060 मध्ये NEFT / IMPS ने पाठवावे.
९) भरलेल्या फी च्या व्यवहाराची माहीती कोल्हापुर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांना [email protected] ई-मेल द्वारे कळवायची आहे.
१०) मागणीनुसार परीक्षा शुल्क न भरल्यास उमेदवारास परीक्षेस बोलविले जाणार नाही.
११) लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी असोसिएशन व बँकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल. उत्तीर्ण उमेदवारांना मेरीटनुसार प्रत्यक्ष मुलाखतीस बोलविले जाईल.
१२)मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल. याबाबत सर्व अधिकार मा. संचालक मंडळाकडे राहतील.
१३) अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २२/१२/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील.
१४) या संदर्भात अन्य कोणत्याही खुलाशासाठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत असोसिएशन दुरध्वनी क्र. ०२३१-२६२७३०७/०८ किंवा मोबाईल क्रमांक ८३८००३३१२८ / ८३८००८९८०१ वर संपर्क करावा.

हेही वाचा :  NCL इंडिया लिमिडेट मध्ये 500 जागांवर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …