केसांचा चिकटपणा घालविण्यासाठी सोपा घरगुती उपाय

धूळ आणि प्रदूषणामुळे केसांची काळजी घेणं खूपच त्रासदायक होतं. महिला असो वा पुरूष दोघांनाही सध्या केसगळती, केस लवकर पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे यासारख्या समस्यांना सतत सामोरे जावे लागते. अशा वेळी केसांमधील घाण आणि तेल काढून टाकण्यासाठी शँपूचा वापर केला जातो. कितीतरीवेळी स्काल्पवर इतके तेल साचते की, शँपू केल्यानंतर दुसऱ्या दिवशीदेखील केस तेलकट दिसून येतात. पण रोज शँपू करणंदेखील केसांना कोरडे आणि खराब करू शकते. तुम्हाला तेलकट केसांच्या या समस्येपासून सुटका हवी असेल तर तुम्ही शँपू केल्यानंतर काही सोप्या टिप्सचा वापर करायला हवा. केस धुण्याच्या पाण्यात या नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास, केसातील तेलकटपणा निघून जातो आणि रोज शँपू करण्याची कटकटही राहात नाही. घ्या जाणून.

मेथी दाण्यांचा करा केस धुण्यासाठी वापर

मेथीचे दाणे हे केस अधिक लांबसडक करण्यासाठी उपयोगी ठरतात हे आपण अनेक ठिकाणी वाचलं असेल. साधारणतः मेथी दाण्याचा वापर हा जेवणात फोडणी देण्यासाठी करण्यात येतो हेच अनेकांना माहीत आहे. तसंच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी तर मेथी दाणे वरदान आहे. पण याबरोबरच मेथीचे दाणे हे केसांसाठीही तितकेच पूरक आणि फायदेशीर ठरतात.

  • एक चमचा मेथी दाणे घ्या आणि त्याची पावडर तयार करा
  • पाण्यात एक लहान चमचा मेथीची पावडर मिक्स करून रात्री ठेवा
  • सकाळी उठल्यावर चाळणीच्या मदतीने हे पाणी गाळून घ्या
  • केस धुताना शँपू केल्यानंतर या पाण्याने केस पुन्हा धुवा. या मेथी दाण्याच्या पाण्यामुळे स्काल्प नेहमी स्वच्छ राहते
  • तसंच तुम्हाला केसात खाज आणि इन्फेक्शनची समस्या असेल तर यापासून सुटका मिळायलाही मदत मिळते
हेही वाचा :  पांढऱ्या केसांसाठी हेअर डायची नाही गरज, ठेवा नैसर्गिक पद्धतीने काळे

(वाचा – केस गळणं थांबण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय, केस भराभर वाढतील)

लिंबाचा रस

लिंबाचा रस हा त्वचेमधील चिकटपणा काढून टाकण्यासाठी मदत करतो. मात्र लिंबाच्या रसाचे किती प्रमाण वापरावे याकडे लक्ष द्यावे. शँपू केल्यानंतर लिंबाच्या रसाचा वापर करून तुम्ही केसातील चिकटपणा काढू शकता. मात्र तुम्ही लिंबू वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करून घ्यावी. त्वचा संवेदशील असेल तर लिंबाचा डायरेक्ट वापर करू नका.

  • लिंबाच्या रसात एक मग पाणी मिक्स करा
  • या पाण्याने शँपूने केस धुतल्यानंतर पुन्हा एकदा केस धुवा
  • लिंबाच्या रसाने केस धुतल्याने कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते

(वाचा -५ गोष्टींची काळजी घ्याल तर स्ट्रेटनिंग केल्यानंतर होणार नाहीत केस फ्रिजी, सोप्या टिप्स)

झेंडूची फुले

झेंडूची फुले बाजारात सहज मिळतात. पूजा करण्यापासून ते घराची सजावट करण्यापर्यंत सगळ्यासाठीच या फुलाचा उपयोग केला जातो. केसांसाठीही याचा उपयोग करून घेता येतो हे तुम्हाला माहीत आहे का? झेंडूचे फूल केसांची समस्या सोडविण्यासाठी उपयोग होतो.

  • केसांचा चिकटपणा घालविण्यासाठी तुम्हाला झेंडूची सुकलेली फुले जमावावी लागतील
  • ही फुलं तीन कप गरम पाण्यात घाला आणि साधारण १ तास तसंच ठेवा
  • हे पाणी तुम्ही केस धुण्यासाठी वापरा. यामुळे केसातील तेलकटपणा त्वरीत निघून जाण्यास मदत मिळते आणि त्याशिवाय केसांमधील कोंड्याची समस्याही दूर होईल
हेही वाचा :  पोटात नाही, आतड्याला चिकटतात हे जंत, रक्ताचा प्रत्येक थेंब शोषतील, AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितले ६ भयंकर लक्षणे

अत्यंत सोपे आणि त्रासदायक नसणारे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. केसांची समस्या ही खरं तर सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय असतो. तुम्हीही या सोप्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून नक्की पाहा.

(वाचा – केस खूप गळताहेत ? टक्कल पडण्याची भिती वाटते, काळ्याभोर केसांसाठी आवळ्याचा वापर करा, काही दिवसातच फरक जाणवेल)

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …