Meta ने आईला जॉबवरून काढलं, ६ वर्षांच्या मुलीने साजरा केला आनंद, आई-मुलीचं खास नातं

काही दिवसांपूर्वीच Meta ने ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. अनेक कर्मचाऱ्यांना याबाबत आयडिया देखील नव्हती. नोकरी गेल्यावर कुटुंबामध्ये एक उदासी किंवा नैराश्य असतं. मात्र Meta ची कर्मचारी Shelly Kalish घरी मात्र आनंदाच वातावरण आहे. खास करून Shelly च्या सहा वर्षांच्या मुलीने आनंद व्यक्त केला आहे.

Shelly Kalish ने सकाळी ६.३० वाजता आपला मेल चेक केला. तेव्हा तिला आलेल्या मेलमधून तिची देखील नोकरी गेल्याचं कळलं. तिने तो मेल संपूर्ण न वाचताच पतीला फोन केला. पतीला आणि मुलीला ही माहिती दिल्यावर मुलीने आनंद व्यक्त केला. ‘तुझी नोकरी गेली हे अतिशय वाईट आहे. पण तरी देखील तू खूच चांगली आहेस. तू आता माझ्यासोबत जास्त वेळ घालवू शकतेस’, असं म्हणत Shelly च्या सहा वर्षांच्या मुलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

वर्किंग मदर आणि त्यांची मुलं यांचा कायमच एक संघर्ष सुरू असतो. मुलांना आईचा सहवास हवा असतो पण अनेकदा कामाच्या ओघात हा सहवास फार कमी होतो. आईला बरं नसलं आणि ती घरी असली तरीही मुलांना आनंद होतो कारण ती त्यांच्या नजरेसमोर असणार आहे. अशातच मुलगी आणि आई यांच्यातील नातं खूप खास असतं.

हेही वाचा :  'तुम्ही 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडली होती,' अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर, 'माझा पक्ष...'

​तणावातही सोबत असते हक्काची व्यक्ती

Shelly Kalish ची नोकरी गेली. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. पण या सगळ्यात आपली मुलगी आनंदी असल्यामुळे आई आनंदी होती. Shelly च्या सहा वर्षांच्या मुलीला आईची इतकी मोठी आणि महत्वाची नोकरी गेल्याची जाणीवही नव्हती. पण तिला आई आता आपल्यासोबत अधिक काळ असेल. आईचा सहवास आपल्याला लाभेल याचा आनंद होता.

(वाचा – या ६ गोष्टी करा आणि मुलांना स्मार्टफोन आणि टीव्हीपासून दूर ठेवा, प्रत्येक पालकांसाठी उपयुक्त टिप्स))

​लेक-आईचं खास नातं

लेक आणि आई यांचं खास नातं असतं. अनेकदा मुलीला बरं नसल्यास आई हवी असते. अशावेळी आईचं असणं मुलांसाठी अतिशय खास असतं. वर्किंग मदरसाठी ही तारेवरची कसरत असते. अशावेळी आपल्या कामातून मुलांना बरं नसेल तेव्हा आईने हक्काने त्यांना जवळ घ्यायचं असतं. औषधांसोबतच मुलांना मायेची उब हवी असते. ही मुलं प्रेमासाठी आसुसलेली असतात.

(वाचा – लग्नाच्या १८ वर्षांनंतर अपूर्व-शिल्पाने अनुभवलं पालकत्व, मुलीला दिलं ट्रेडिशनल आणि मीनिंगफुल नाव)

हेही वाचा :  इंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर

मुलीला हवं असतं अटेंशन

मुलं ही कायम पालकांच्या अटेंशन करता किंवा प्रेमाकरता आतुर असतात. अशावेळी तुम्ही वर्किंग मदर असाल तर कामातून थोडा वेळ काढून मुलांना न चुकता फोन करा. त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्या खाण्यापिण्याकडे खास लक्ष द्या. जरी त्यांच्यापासून दूर असाल तरी सतत संपर्कात राहा. कारण मुलांना कायम अटेंशन हवं असतं.

(वाचा – आलिया-रणबीरची मुलगी जन्मतःच ‘या’ गुणांनी समृद्ध, जाणून तुम्हालाही होईल आनंद)

​मुलांसोबत ठरवून वेळ घालवा

अनेक पालक वर्किंग असतात. अशावेळी मुलांसाठी रविवार हा हक्काचा दिवस म्हणून ठेवावा. यादिवशी कोणतीची कार्यालयीन काम न करता तो दिवस मुलांसाठी राखीव असावं. अगदी काहीच केलं नाही तरी मुलांसोबत पालक घरात आहेत ही भावनाच मुलांसाठी खास असते. या दिवशी तुम्ही मुलांकरता खास जेवण तयार करू शकता किंवा मुलांसोबत गार्डनिंग करा किंवा त्यांचा खण लावण्यास त्यांना मदत करा. जमल्यास एखाद्या रविवारी मुलांना घेऊन पिकनिकचा प्लान करा.

(वाचा – अजिंक्य रहाणेने शेअर केलं मुलाचं नाव आणि पहिली झलक, प्रभू रामाच्या अर्थाचे ठेवले नाव)

​शब्दांपेक्षा स्पर्श बोलतो

मुलं ही निरागस असतात. मुलांमधील ती निरागसता टिकवण्यासाठी त्यांना प्रेमाची, आपुलकीची गरज असते. अशावेळी जर वर्किंग मदर असेल तर तिचा स्पर्श मुलांना फार कमी मिळतो. अशावेळी पहाटे उठल्यावर आणि रात्री झोपताना मुलांना जवळ घ्या. खास करून मुलगी असेल तर तिच्याशी संवाद साधा. कारण मुलगी वयात येत असेल किंवा तिचे काही खासगी प्रश्न असतील तर ते आईने समजून घेणे जास्त गरजेचे असते. त्यामुळे शब्दांपेक्षा स्पर्श खूप काही बोलून जातात.

हेही वाचा :  विश्वास पाटील यांनी शेअर केली फेसबुक पोस्ट; म्हणाले, 'अमोल कोल्हेंनी...'

(वाचा – श्रीलंकेचा क्रिकेटर मुरलीधरनने मुलीचं नाव ठेवलं अतिशय दिव्य, मुलीच्या नावासाठी ठरेल प्रेरणादायी))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …